अन्यथा
लेखनविषय:
काव्यरस
जीवना, भेट केव्हातरी
अंतरीच्या उमाळ्यापरी
आसवांच्या उधाणातही
पापण्यांच्या रित्या घागरी
भांडणावाचुनी व्हायची
भेट माझी-तुझी का खरी?
नाव मी भोवर्याला दिली,
साद देती किनारे जरी
जीवघेणा कडाका इथे,
सांत्वनाच्या तिथे चादरी !
पाचवीलाच मी पूजिली
शब्द झेलायची चाकरी
अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!
वाचने
5337
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
शेवटच्या ओळी वाचून अंगावर काटा आला.
मस्त कविता गं तै.
सुरेख!!
प्रत्येक शब्द अर्थपूर्ण.
अंत पाहू नको रे सुखा, साथ दे, अन्यथा जा तरी!जबरदस्त हुकुमत आहे शब्दांवर.... बाकी कवितेच्या गाभ्याबद्दल काय बोलणार, खरोखर "निव्वळ आहे" म्हणजे एकदम "निव्वळच आहे"!
सुंदर. :)
कविता आवडली.
गजल आवडली.
अंत पाहू नको रे सुखा, साथ दे, अन्यथा जा तरी!-वा! मस्त.
जीवना, भेट केव्हातरीहा मिसरा 'जीवना, भेट आतातरी' असाही वाचून पहिला.
नाव मी भोवर्याला दिली, साद देती किनारे जरीइथे 'साद देई किनारा जरी' असे हवे होते का? अलामत..!?
छान कविता..भावस्पर्शी.
सुरेख कविता!
क्रांती, सुरेख लिहिलं आहेस.
मस्त.. आवडली
In reply to मस्त.. आवडली by शैलेन्द्र
+१
सुरेख गझल !
छान..!
मस्त :-)
तरल कवितेला सलाम!
आणि येताना एक सुरेख काव्य आमच्या साठी आठवणिने घेउन आलात, खुप खुप धन्यवाद
मंडळी. मध्यंतरी बर्याच इतर उचापतींमुळे इकडे प्रत्यक्ष वावर कमी झाला होता, पण वाचन सुरू होतं. [कोणत्याही कारणांनी अस्वस्थ वाटत असेल, कसलाही त्रास होत असेल, डोकं फिरलं असेल, तर ते जागेवर आणण्याचा रामबाण उपाय म्हणजे मिपावर चक्कर मारणे! खमंग, खुसखुशीत पाकृ, अप्रतिम फोटो, सुंदर कलाकृती, भन्नाट धागे आणि अफाट प्रतिसाद म्हणजे मिपा!]
विसुनाना, आपण म्हणता त्याप्रमाणे किनारा हा बदल मूळ संहितेत केला आहे. अलामत पाहिलीच नव्हती त्या द्विपदीत. मतल्यात 'आतातरी' हे जास्त प्रभावी वाटतंय :)
अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!
हे विशेष आवडलं !!
असं लिहीता यायला हवे.
इतक्या कमी शब्दात इतकं सांगता यायला हवे.
इतकी सुंदर शब्दांची गुफंण जमायला हवी.
अशी बैठक पक्की बसायला हवी.
असं मी स्वताला बजावतोय....
अंत पाहू नको रे सुखा साथ दे, अन्यथा जा तरी!__/\__
In reply to आहाहा by मिसळलेला काव्यप्रेमी
असं लिहीता यायला हवे...
सहमत
मस्त कविता!
नाव मी भोवर्याला दिली, साद देती किनारे जरीआवडले!!!
अप्रतिम !
नाव मी भोवर्याला दिली,
साद देती किनारे जरी
आह!