मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाविन्याची साद

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सुटला पहाट वारा अंतरात सळसळ मन सुगंधी सुगंधी पसरला दरवळ नको स्वप्नातून जाग नको जाग इतक्यात नीज हलके हलके पुन्हा आली पापण्यात कसा मुजोर हा वारा रेंगाळला खिडकीशी पावा मंजुळ मंजुळ जणु कृष्णाचा कानाशी मन सैरभैर झाले वेडावले, खुळावले कृष्ण रंगाने रंगाने चिंब चिंब भिजवले रेशमाच्या सोनसरी आला सोबती घेऊन ओला पाऊस पाऊस ढगातून उतरून सतरंगी झाले नभ धरा पाचूने नटली ऊन कोवळे कोवळे पसरली गोड लाली आज सृष्टी देते हाळी ऐक नाविन्याची साद सुख दारात दारात दे तयाला प्रतिसाद. जयश्री

वाचने 1969 वाचनखूण प्रतिक्रिया 12

तिमा Tue, 11/20/2012 - 10:50
चांगली कविता मिपावर द्यावा प्रतिसाद्,प्रतिसाद|