राधा
लेखनविषय:
मोरपीस जणू फिरते तनी,
वेणू नाद हा पडता कानी,
काहूर मनात, अन हुरहूर आगळी
मोहरते आठवता, छबी सावळी
थरथरते अधर, लाली गाली
किंचित लाज, अधीर नयनी
ललना साजिरी, नटली सजली
शाम सख्यावर, आणिक भाळली
बावरे मन, अन आशा कोवळी
मिलनास आसुसली, राधा भोळी
पाहून अधीर राधा, बोले सखी
"होईल बोभाटा ग गोकुळी!",
नयनी पाणी, मिटे पापणी
अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!!
... रेघोटी
वाचने
2729
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मस्त
In reply to मस्त by मिसळलेला काव्यप्रेमी
वा..
फारच सुंदर.
आवडली
छान
ऊत्तम
सुंदर. कविता आवडली.
धन्यवाद प्रतिसादा बद्दल आभार
मस्त...मस्त...झक्कास..!
आडौली...
झक्कास रचना!!
In reply to झक्कास रचना!! by किसन शिंदे
+१
अप्रतीम!!! आवडेश
सुंदर
एकदम आवडली
आवडली
राधा.......