Quail Fry (होला मसाला)
फ्रान्स, जपान, माल्टा, पोर्तुगीज, पोलंड तसेच भारतात देखिल आवडीने खाल्ला जाणारा हा पक्षी आकाराने अगदिच लहान, शिजण्यास सोप्पा व चवीला उत्कृष्ट असतो. ह्यालाच भारतात "होला" असेही म्हटले जाते.
मागच्याच महिन्यात इथल्या एका indian shop मधुन मी हा quail घेउन आले आणि एक साधीशी पाकृ try केली. चव एकदम मस्त होती, म्हणुन म्हटले मिपा वर देखील ह्याची पाकृ टाकावी. तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा आहे. ;)
हा पक्षी जास्तकरुन आख्खाच केला जातो. आकारने लहान असल्यामुळे त्याचे तुकडे करणे अवघड जाते. मी सुद्धा ते आख्खेच केले होते. त्यामुळे photo थोडा funny आहे, पण चव मस्त आहे. ;)
साहित्यः
Quail (होला) - २ आख्खे
दहि - १/२ वाटी
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हळद - १ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
तेल - २-३ चमचे
लिंबुचा रस - १/२ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. होले स्वच्छ धुवुन घ्यावे व tissue ने पुसुन घ्यावेत.
२. त्यांना वरतुन थोडेसे मिठ, १ चमचा आले-लसुण पेस्ट, १/२ चमचा हळद व १ चमचा लाल तिखट लावुन १-२ तास marinate करावे.
३. कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात marinate केलेले होले टाकावेत व ३-४ मिनिटे सर्व बाजुने परतुन घ्यावेत.
४. त्यात उरलेली हळद, लाल तिखट, गरम मसाला, १/२ वाटी दही व चवीप्रमाणे मिठ टाकुन ५-१० मिनिटे झाकण ठेवुन शिजवावे. मिठ टाकताना लक्षात ठेवावे, कि marination मधेही मिठ टाकले होते.
५. हे होले पुर्ण कोरडे होई पर्यंत परतावे. सर्वात शेवटी लिंबुचा रस टाकुन निट हलवावे व गॅस बंद करावा.
६. हे होले गरम असतानाच फस्त करावेत. ;)

वाचने
13589
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
वा. छान.
In reply to वा. छान. by गवि
होला म्हणजे जंगलातले (पाळीव
यातला डाविकडचा हाताची घडी
In reply to यातला डाविकडचा हाताची घडी by अत्रुप्त आत्मा
ऑब्सर्वेशन ..ऑब्सर्वेशन ..
Mrunalini, ह्या पक्ष्याच्या
In reply to Mrunalini, ह्या पक्ष्याच्या by यशोधरा
खाण्यासाठी अन अंड्यांसाठी
In reply to खाण्यासाठी अन अंड्यांसाठी by गवि
हो परवाना आहे खरा.
लई भारी... पण आकार बघून
हम्म...
फोटोत
In reply to फोटोत by अँग्री बर्ड
कोंबडी बकरे पापलेटे तरी
In reply to फोटोत by अँग्री बर्ड
वांगी बटाटे कारली सुद्धा
लाव्हर्या
नॉन व्हेज खाणारा असून सुद्धा
इथे मिळतो, पण येवढुसा
सगळ्यांचे धन्यवाद!!! मी आधीच
तित्तर??
In reply to तित्तर?? by प्रभाकर पेठकर
लावरी हा तित्तराच्या
In reply to लावरी हा तित्तराच्या by गवि
खुपच छान माहिती साठी धन्यवाद
मला खरच नक्की माहित नाही,
In reply to मला खरच नक्की माहित नाही, by Mrunalini
होलाहो
सॉरी दी
In reply to सॉरी दी by पियुशा
तसे मला पण खाण्या आधी वाटले
छान!
In reply to छान! by दादा कोंडके
मला नाहि पण माख्या नवर्याला
In reply to मला नाहि पण माख्या नवर्याला by Mrunalini
आयला, एकदा कधीतरी तुमच्या नव
In reply to आयला, एकदा कधीतरी तुमच्या नव by ५० फक्त
आहो, ते माझे नशिब चांगले
In reply to आयला, एकदा कधीतरी तुमच्या नव by ५० फक्त
साहेब ...या माणसाला मी
In reply to साहेब ...या माणसाला मी by nishant
हाहा गुड वन
In reply to साहेब ...या माणसाला मी by nishant
हा प्रश्न आहे की धमकी ?
In reply to हा प्रश्न आहे की धमकी ? by ५० फक्त
:)
In reply to :) by nishant
मंग बेस ,पण तुमाला कुटुन येळ
In reply to मंग बेस ,पण तुमाला कुटुन येळ by ५० फक्त
पुढच्या सुट्टीत नक्कि मिपा
आई गं
वर चित्रात होलाच आहे
खायला छान आसेल पण दिसायला नाही!
गवि यांनी अतिशय अचूक माहिती