तेजाळलेल्या रात्रीचे क्षण
लेखनविषय:
काव्यरस
कुठे आहेस तू?
त्या तेजाळलेल्या रात्रीचे क्षण
अजूनही रेंगाळतायत,
तुझी लाल चुटुक टिकली
माझ्या दंडावर घट्ट आहे,
निसटलेला एक चुकार केस चिकटलाय
त्या उशीवर, लांबसडक...
कपाळावर तुझ्या ओठांची
महिरपी मोहर,
घरभर तुझ्या गजऱ्याचा मोगराच दाटलाय,
अन् हातांच्या तळव्यावर
तुझ्या गालांचा सायस्पर्श घुटमळतोय,
-----
पण तू कुठे आहेस?
-----
तू इतकी जवळ आहेस,
कि तुला पाहू तरी कसे?
जरा दूर जाशील तर पाहता येईल ना..
जराशी दूर हो... पाहू तरी
तेजाळलेल्या रात्री मोगरा माळलेला
गुलाब कसा दिसतो....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०१/०१/२०१३)
वाचने
3133
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
ओहोहो
In reply to ओहोहो by स्पा
@जबर्या शृंगारिक का काय ते...
In reply to @जबर्या शृंगारिक का काय ते... by अत्रुप्त आत्मा
+१
जमली आहे.
सुंदर
सुंदर
खूप आवडली कविता..
मोहरलेले काव्य! खुप आवडले.
तु दगड ...