फ़िस्कल क्लिफ़ आणि त्याचे जगावरचे परिणाम...
गेले बरेच दिवस वर्तमानपत्रांमधून आणि न्यूज चॅनल्सवरून फ़िस्कल क्लिफ़, फ़िस्कल क्लिफ़ वाचत आणि ऐकत होतो.. नाव ऐकून मला पामराला काहीच अर्थबोध होत नव्हता. म्हणून आंतरजालाचा थोडा वापर करून माहिती मिळवली.
एका वाक्यात फ़िस्कल क्लिफ़ म्हणजे २०१२ संपताना अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होणारे वाईट परिणाम. अमेरिकन सरकारच्या बजेट कंट्रोल ऍक्ट २०११ मधील काही परिणाम दृश्य स्वरूपात दिसण्याची ही एक शक्यता आहे. ३१ डिसेंबर, २०१२ च्या मध्य रात्री पासून मागील वर्षापर्य़ंत असणारा "टेंपररी पेरोल टॅक्स" बंद होणार आहे. (ज्यामुळे नागरिकांच्या टॅक्स मध्ये किमान २% वाढ अपेक्षित आहे.) शिवाय बेरोजगार भत्त्यात कपात, क्रेडिट लिमीट्स मध्ये कपात, त्याच बरोबर व्यावसायिकांसाठी असणारे काही टॅक्ससुद्धा वाढण्याची चिन्हं आहेत. मुळात २००१-२००३ मधील "बुश टॅक्स कट" चा हा "रोलबॅक इफ़ेक्ट" म्हटला जातोय. ओबामा सरकारने यावर ब-याच सुधारणा सुचवलेल्या असल्या तरी त्या फ़ार सुखावह नाहीत.
आता मुख्य शंका अशी येईल की अमेरिकेतल्या कसल्याशा फ़िस्कल क्लिफ़ ची चर्चा मराठी मिपा वर का? अमेरिकन अर्थव्यवस्था थोडी जरी डळमळीत झाली तरी इकडं आपलं धाबं दणाणतं. आणि अमेरिकेत जर सध्या चालू असलेले कायदेच पुढे सुरू राहिले, (आणि दुर्दैवाने फ़िस्कल क्लिफ़ अवस्था आलीच) तर त्यांच्या (आणि अर्थात पर्यायाने अख्ख्या जगाच्या) अर्थव्यवस्थेवर अंतर्बाह्य परिणाम होऊ शकतात. सद्य परिस्थितीत अमेरिकेची अर्थव्यवस्था अंदाजे वार्षिक २% या वेगाने वाढत आहे. फ़िस्कल क्लिफ़ मुळे GDP अर्थात Gross Domestic Product (एखाद्या देशात ठराविक कालावधीत तयार होणा-या वस्तू, सेवा, गुंतवणूक, आयात निर्यात इ. सर्वांची एकत्रित किंमत) मध्ये ४ ते ६ % घट होऊ शकते, जी त्यांना मंदीत ढकलण्यासाठी पुरेशी आहे. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे युरोपियन मार्केटमध्ये मंदी, आणि अखेरीस भारत, चीन, ब्राझिल या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्येही मंदीची अवस्था येऊ शकते. शिवाय फ़िस्कल क्लिफ़ च्या शक्यतेमुळे अमेरिकन मार्केट्स कोसळण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. नुकत्याच बॅंक ऑफ़ अमेरिकेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, जवळपास ४२% जागतिक गुंतवणूकदारांच्या मते, फ़िस्कल क्लिफ़ ही सर्वात मोठी "टेल रिस्क" आहे. (टेल रिस्क - एखाद्या वस्तू, सेवा किंवा गुंतवणूकीच्या किंमतीत मूळ किंमतीच्या ३ पेक्षा जास्त वेळेस होणारा आमुलाग्र बदल)
भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये होणा-या गुंतवणूकीकडे नजर टाकली तर लक्षात येतं की ही गुंतवणूक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या अगदी जवळपास आहे. किंबहुना, विकसनशील गुंतवणूकीवर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीचा प्रचंड पगडा आहे. त्यामुळे जर फ़िस्कल क्लिफ़मुळे आंतरराष्ट्रीय मार्केट्स मध्ये घसरण झाली, तर आपल्या स्टॉक मार्केट्स मध्येही प्रचंड उलथापालथ होईल. मंदी, आणि त्या पाठोपाठ येणारी बेरोजगारी आहेच. (याचा मुख्य परिणाम आय.टी., सॉफ़्टवेअर आणि बॅंकिंगवर दिसेल, कारण ही सगळी क्षेत्रं अमेरिकेच्या जबरदस्त पगड्याखाली आहेत.)
नुकत्याच टोकियोमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गंगाजळी समितीच्या बैठकीमध्ये आपले अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं होतं, "अमेरिकेतला फ़िस्कल क्लिफ़चा मुद्दा लवकरात लवकर सोडवायला हवा. मोठी आपत्ती टाळण्यासाठी छोटी छोटी, पण उपयोगी पाऊलं उचलण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने फ़िस्कल क्लिफ़ची परिस्थिती उद्भवलीच, तर अमेरिकेत होणा-या परिणामांपेक्षा भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेवर याचे होणारे परिणाम हे कित्येक पटींनी जास्त भयंकर असतील. "
वाचने
15601
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
परिस्थीती कठीण आहे.
In reply to परिस्थीती कठीण आहे. by मदनबाण
नाही.
In reply to नाही. by दादा कोंडके
काही पुंगी-बिंगी वाजली नाहीये
काही पुंगी-बिंगी वाजली नाहीये बाणा. संगणकीकरणामुळे आणि इकॉमर्सच्या लाटे मुळे प्रचंड मनुक्षबळ आणि त्यातल्यात्यात बरं इंग्रजी येत असल्यामुळे भारतात आयटीची मश्रूम ग्रोथ झाली होती. आता तो बुडबुडा फुटलाय त्यामुळे फक्त लंबी रेसके घोडेच टिकणार या स्पर्धेत.माझ्या कंपनी सकट इतर अनेक आयटी कंपन्यांनी त्यांच्या ऑनसाईट मंडळींची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. ऑफशअरवर सुद्धा जवळपास प्रत्येक प्रोजेक्ट मधुन मनुष्यबळ कमी करण्याचा रेटा सुरु झाला आहे.मी स्वतः रिसेशन जवळुन पाहिले आहे (अमेरिकेतले /हिंदुस्थानातले) २००७ पासुन हा सगळा खेळ पाहतो आहे,आणि तो माझ्या वर्क कल्चरचा एक भागच झाला आहे. सध्या माझ्या प्रोजेक्ट मधे सुद्धा या बद्धल चर्चा चालु आहे. अमेरिकेची अवस्था बेक्कार असुन फिस्कल क्लिफमुळे मोठ्या प्रमाणात तिथे रिसेशन येईल अशी शक्यता आहे,त्याचा परिणाम हिंदुस्थानात चालणार्या प्रोजेक्टवर होणार हे काही वेगळे सांगायची गरज नाही. अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग S&P ने एएए वरुन एए+ केले होते,तेव्हाच जगाचे डोळे विस्फारले गेले होते. आठवा जरा देवेन शर्मा यांना त्यावेळी ही स्पष्टोक्ती केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. (संदर्भः- S&P chief Deven Sharma resigns ) माझ्या विचार आणि मता नुसार अमेरिकेच्या सध्याची अवस्थेचे वर्णन करायचे झाले तर...मंद अर्थव्यवस्थेच्या वादळात अडकलेले बुडते जहाज, ज्याचा आधार इतरांना वाटत असल्याने त्याचे बुडणे अशक्य आहे अशी (खोटी) वदंता सध्या सगळीकडे पसरवली जात आहे. या विषयावर अधिक इथे वाचता येईलः--- 'Fiscal Cliff' Could Trigger Recession Just Explain It: Why the Fiscal Cliff May Trigger a Recession US Senate leader Harry Reid voices fiscal cliff fear http://www.brillig.com/debt_clock/ http://www.usdebtclock.org/ https://www.youtube.com/watch?v=eNloZxUCcgkIn reply to काही पुंगी-बिंगी वाजली नाहीये by मदनबाण
हिंदुस्थानातल्या आयटी
In reply to हिंदुस्थानातल्या आयटी by मदनबाण
म्हंजे निम्मी बेंच स्ट्रेन्थ
हम्म.
काहीच नाही बरं, जगबुडीसारखा
फिस्कल क्लिफ ही संकल्पना
आयला
बक स्टॉप्स...
In reply to बक स्टॉप्स... by विकास
खरं आहे!
In reply to खरं आहे! by पिवळा डांबिस
तुम्हीतर माझ्याही आधीपासून
In reply to तुम्हीतर माझ्याही आधीपासून by मदनबाण
अमेरिकेशी आतापर्यंतचा
In reply to अमेरिकेशी आतापर्यंतचा by निनाद मुक्काम …
अमेरिकेशी आतापर्यंतचा
In reply to अमेरिकेशी आतापर्यंतचा by मदनबाण
तर इथे वाचा तुम्हाला अंदाज
In reply to तर इथे वाचा तुम्हाला अंदाज by मदनबाण
लहानपणी आपण पत्ते खेळत असू
In reply to तुम्हीतर माझ्याही आधीपासून by मदनबाण
पिडांकाका हलके घ्यालच...
In reply to पिडांकाका हलके घ्यालच... by पिवळा डांबिस
अबाबा.. फुटलो !
In reply to पिडांकाका हलके घ्यालच... by पिवळा डांबिस
हा.हा.हा... तुझं कुठलंच लिखाण
In reply to खरं आहे! by पिवळा डांबिस
सहमतच
In reply to सहमतच by विकास
वास्तवीक हे ओबामासारखे म्हणणे
In reply to वास्तवीक हे ओबामासारखे म्हणणे by पिवळा डांबिस
किंचित स्पष्टीकरण...
फिस्कल क्लिफवर अपडेट :--
आपल्याला फिस्कल बिस्कल कळत
In reply to आपल्याला फिस्कल बिस्कल कळत by मालोजीराव
ज्या भारतीय आयटी कंपन्यांनी
In reply to ज्या भारतीय आयटी कंपन्यांनी by मदनबाण
बाँड डम्पिंग
In reply to बाँड डम्पिंग by क्लिंटन
चीनने असे बाँड डम्प केले तर
In reply to बाँड डम्पिंग by क्लिंटन
-"If China dumps bonds
आवं पावणं, त्यांच्याकडं पण
In reply to आवं पावणं, त्यांच्याकडं पण by नानबा
पैसा के पैसा!
In reply to पैसा के पैसा! by पिवळा डांबिस
नॅशनल कर्ज
मुळात प्रश्न असा आहे की खरंच
चीन्-जपान-अमेरिका
आर्थिक घडी
In reply to आर्थिक घडी by नंदन
.
In reply to आर्थिक घडी by नंदन
जरूर
In reply to जरूर by पिवळा डांबिस
तुम्हीच सांगा
प्रत्येक देशाला स्वतःच्या
In reply to प्रत्येक देशाला स्वतःच्या by निनाद मुक्काम …
प्रतिसाद उत्तम पण अस्थायी. हा
अमेरिकेच्या आऊटसोर्सिंगवर
In reply to अमेरिकेच्या आऊटसोर्सिंगवर by नगरीनिरंजन
ननि
In reply to अमेरिकेच्या आऊटसोर्सिंगवर by नगरीनिरंजन
नैसर्गिक स्रोत
In reply to नैसर्गिक स्रोत by प्रदीप
होय.
काही प्रतिक्रिया बघुन शोले
काय सांगता काय?
In reply to काय सांगता काय? by परिकथेतील राजकुमार
फक्त
In reply to काय सांगता काय? by परिकथेतील राजकुमार
फिस्कल
अमेरिकेच्या दोन्ही सदनात
In reply to अमेरिकेच्या दोन्ही सदनात by निनाद मुक्काम …
-
अमेरिकेच्या दोन्ही सदनात