मिसळ पाव....रस्सा मिक्स....भाग - १

आभिजीत मुळे भटकंती
अतिथी मिसळ हाऊस, पिंपरीगाव अतिथी मिसळ हाऊस, पिंपरीगाव सावतामाळी मिसळ, मोशी सावतामाळी मिसळ, मोशी श्री उपहार ग्रूह..शनिवार वाड्याच्या मागे श्री उपहार ग्रूह..शनिवार वाड्याच्या मागे क्रिष्णा मिसळ, खंबाटकी घाटाजवळ क्रिष्णा मिसळ, खंबाटकी घाटाजवळ मंगला टॉकीजबाहेर टपरीवरील मिसळ मंगला टॉकीजबाहेर टपरीवरील मिसळ

27 टिप्पण्या 14,979 दृश्ये

Comments

कलश नवीन

मिपाकरहो अपग्रेडेशन झाल्यानंतर मस्तपैकी श्रमपरिहार करुन घेउयात लय आवडली बघा सफर :-P

पैसा नवीन

मस्त फोटो! पण फोटोबरोबर प्रत्येक मिसळीची खासीयत लिहिली असतीत तर आणखी मजा आली असती!

आभिजीत मुळे नवीन

In reply to by किसन शिंदे

एखाद्या व्यक्तिच्या उत्तराला प्रतिसाद कसा द्यायचा हे माहीत नव्हत. तुमचा प्रतिसाद पाहुन कळुन गेल....

अत्रुप्त आत्मा नवीन

@मंगला टॉकीजबाहेर टपरीवरील मिसळ>> http://www.sherv.net/cm/emo/happy/pleased-smiley-emoticon.gif अवो,ही आम्च्या मामांकडची http://www.misalpav.com/node/20578 करंट मिसळ कि वो... जरा तर्रीचे फोटू टाकायचे ना राव...!

गवि नवीन

आहा... मिसळपावच्या प्रकृतीशी जुळणारा धागा. येऊ देत अजून मिसळींचे फोटो आणि रसग्रहण.. सॉरी, तर्रीग्रहण.. उदा. मिसळीचे बलस्थानः रश्श्याचा झणझणीतपणा. वाटाण्यांचा कमी वापर. फरसाणाचा तिखटगोडपणा. खोबर्‍याचे वाटण लावलेला रस्सा. उणिवा: कडक आणि कच्चे कडधान्य. अति पौष्टिकतेमधे टेस्टने खाल्लेला मार. पांचटपणा वगैरे.. म्हणजे आपल्या सर्वांना कुठेही गेलो तरी मिसळ खाण्याचा इन्फॉर्म्ड डिसिजन घेता येईल. उदा. इथे खंबाटकी घाटानजिकच्या मिसळीचा फोटो आहे. ती प्रत्यक्ष खाल्ली असता अगदीच पिचकावणी वाटली होती. अशा वेळी फोटोसोबत धागाकर्त्याने त्यावेळचं स्वादाविषयीचं मतही द्यावं. भले सब्जेक्टिव्ह का असेना, अंदाज यायला उपयोग होतो.. धागा उत्तम. इतरांनीही प्रतिसादरुपात इतर मिसळींचे फोटो आणि माहिती डकवावी. एक मिसळोपीडिया तयार होईल.. :)

त्रिवेणी नवीन

In reply to by गवि

माझ्या कडे ही काही फोटो आहेत पण एथे प्रतिसादात कसे अपलोड करायचे ते समजत नाही plz मदत कराल का?

मदनबाण नवीन

कुटबी मिसळ खा... पन कोल्हापुरच्या मिसळीची लज्जत कुटच गावनार न्हाय ! (चोरगे,मोहन अन् फडतरे यांच्या मिसळीचा चाहता.) :)

मोदक नवीन

In reply to by मदनबाण

श्री मदनबाण - कोल्हापूरात मटणाचा (बहुदा शिळा!) रस्सा घातलेली मिसळ कुठेतरी मिळते. त्याबद्दल माहिती आहे का काही?

चित्रगुप्त नवीन

मिसळपाव पैकी मिसळीचेच भारी कौतूक होत असते, अर्थात त्यात गैर काही नाही, परंतु हॉटेलवाले जो पाव बेकरीतून आणतात, तो जर उत्तम दर्जाचा नसेल, तर सारेच मुसळ केरात जाते. उदाहरणार्थ पुण्याला आमच्या मित्राने कोणत्याश्या प्रसिध्ह मिपावाल्याकडून आणलेल्या मिपातील सर्व पावातून किडे निघाले. किळस येऊन सर्वांचा विरस झाला आणि सर्व काही फेकून द्यावे लागले.

प्रसाद१९७१ नवीन

श्री उपहार गृह आणि खंबाटकी घाटाजवळची, दोन्ही मिसळी खाल्ल्या आहेत. श्री उपहार ची मिसळ मस्त च असते, नुस्ते फरसाण आणी तिखट पाणि नाही. त्यांचा रस्सा तर अफलातुन असतो. पण ते दुसरे चितळे आहेत. माल संपून जातो आणि पुन्हा करत नाहीत. त्या दिवसापुरते दुकान बंद.

गवि नवीन

अ‍ॅडिशन... ठाण्यातली गोखले उपाहारगृहाची "उभ्या उभ्या" चटकदार मिसळ.. A कट / रस्सा / सँपलः (एक्स्ट्रा चार्ज पडेल !! ;) A वैशिष्ट्ये: झकास चव (मुख्य).. कांदाबटाटा, मटकी आणि अन्य घटकांचा व्यवस्थित रस्सा, फरसाणाची खुसखुशीत क्वालिटी.. ताजे आणि लुसलुशीत पाव.. कमतरता: कमी जागा, उभ्याने खाणे (अर्थात ही मिसळीची कमतरता नव्हेच), रस्सा एक्स्ट्रा घेतल्यास चार्ज..(६ रुपये) पण वर्थ इट... :)

आप्पा नवीन

यांची पुर्वी स्टेशनसमोर मोठी जागा होती. तेथे कामगारांनि साधारण २० (अंदाजे) वर्षापुर्वी संप केला (बहुतेक सर्व कामगार मराठी होते) नंतर गोखले ती जागा विकुन गेले. नंतर त्यांच्या मुलाने हे होटेल गोखले रोडला चालु केले. (आठ्वणीतील माहीती आहे. कालखंड चुकु शकतो.)

देवांग नवीन

चिंचवड गावातली नेवाळे मिसळ ज्यांनी कोणी खाल्ली असेल … तेच फक्त सांगू शकतील झटका म्हणजे काय असते

दिपस्तंभ नवीन

पिंपरी चिंचवड जवळ कासरवाडी येथे 'मनाली हायवे स्पाट मिसळ'(अल्फा लव्हाल समोर) एकदम झनझनीत.... आणि पिंपरीगाव येथिल जनता भुवन मिसळ' लै बेस्ट...