व्यथा
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सारे ओळखीचे डोळे पुसून गेले!
होते अनोळखी ते गाली हसुन गेले!
ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की,
माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले!
माझ्या पराभवाची चर्चा कुठे न झाली
घायाळ काळजाला विंचू डसून गेले!
डोळ्यात चाहत्यांच्या मी बांधल्या हवेल्या
कळले मला न केंव्हा घरटे बसुन गेले!
जे काल जाहले ते मी आठवू कशाला?
डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले!
सुरताल
वाचने
2772
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
चांगला प्रयत्न
सुंदर
व्वा.
फार छान
सगळ्याचे आभार
:अरेरे:
मस्त