झाली माझी गोष्ट
काव्यरस
झाली माझी गोष्ट
एक होतं गाव
तिथं होतं पोस्ट
झाली माझी गोष्ट.
एक होती सासू
ती होती खाष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता नेता
तो झाला भ्रष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होती नणंद
ती होती शिष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होती प्रेयसी
ती झाली रुष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता शेतकरी
त्याने केले कष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता मुलगा
त्याने खाल्ले टोस्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता वक्ता
तो बोलला स्पष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता सिद्धांत
तो होता क्लिष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होतं साम्राज्य
ते झालं नष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होतं बाळ
त्यानं खाल्लं उष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होते नागरिक
ते होते ज्येष्ठ
झाली माझी गोष्ट.
एक होता बैल
तो होता पुष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता ग्रंथ
त्यात होते पृष्ठ
झाली माझी गोष्ट.
एक होता अंक
हो होता अष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता कवी
तो होता श्रेष्ठ
झाली माझी गोष्ट.
एक होती सुंदरी
तिला लागली दृष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता राक्षस
तो होता दुष्ट
झाली माझी गोष्ट.
एकदा आली आपत्ती
ती होती इष्ट
झाली माझी गोष्ट.
एक होता शुक्ल
त्याला लागले काष्ठ
झाली माझी गोष्ट.
एक होती ललना
लाल तिचे ओष्ठ
झाली माझी गोष्ट.
एक होता वेडा
त्यानं सांगितली गोष्ट
झाली माझी गोष्ट.
एक आहे सचिन
त्याने पिलं बूस्ट
झाली माझी गोष्ट.
वाचने
5193
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
एक होता वेडा
एक होता
पंडितांच्या पांडित्याला __/\_
ओव्हन मधे घातली
In reply to ओव्हन मधे घातली by अत्रुप्त आत्मा
ओव्हन मधे घातली
In reply to ओव्हन मधे घातली by किसन शिंदे
काय काय कडक करायला काय काय
In reply to काय काय कडक करायला काय काय by ५० फक्त
कुणाचा टोस्ट मोठया ओव्हनमध्ये
In reply to कुणाचा टोस्ट मोठया ओव्हनमध्ये by धन्या
धाग्याची एकूण लांबी-रुंदी व
In reply to धाग्याची एकूण लांबी-रुंदी व by सस्नेह
अगदी अगदी...
In reply to अगदी अगदी... by धन्या
@यानिमित्ताने "यमक्या वामन">>
गोळा केल्या चिंध्या
दुर्बोध
हम्म्म...
शाब्दिक गमतीजमती
खिक्
माझी एक गोष्ट.
हम्म्मममम....
माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात.हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का? +Dएक होते पंडित
ही गोष्टं छान आहे..
In reply to ही गोष्टं छान आहे.. by मनीषा
सरकारी आदेश आहे....
In reply to सरकारी आदेश आहे.... by ५० फक्त
नाही नाही पन्नासजी ...
मिपाकरांच्या वयाचा अंदाज
हम्म
कविता आनि प्रतिसाद दोन्ही