देह आत्म्याचे मंदीर
लेखनविषय:
काव्यरस
उभे भक्कम पायावर
एक राजस आहे घर
तेथे भगवंताचा वास,
देह आत्म्याचे मंदीर
देणे लाभले इश्वरी
चमत्कार खरोखरी
त्याचे लोभस रुपडे
काया रेशमी गोजीरी
चार खांबांचा निवारा
दोन नेत्रांचा पहारा
आत्माराम तेजोमय
राही धरूनी पिंजरा
नको भरू ते धूराने
नको माखू काजळीने
प्राणज्योतीचे देऊळ
ठेवी त्याला निगुतीने
देह आत्म्याचे मंदीर
दिव्यतेजाचे ते घर
उरे मूठभर माती
जाता प्राणपक्षी दूर
लक्ष चौ-यांशी फ़े-यांत
आला मानवी देहात
नको घालू रे करंट्या
देणे इश्वरी, कच-यात
वाचने
1888
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
अप्रतिम
आवडेश
In reply to आवडेश by परिकथेतील राजकुमार
@मिपावरच्या डांबिस आत्म्याचे
कविता
In reply to कविता by रणजित चितळे
आवडली मलाही
सुंदर काव्य
सुंरेख कविता
धन्यवाद मित्रान्नो!
साधी सरळ
आम्हाला फक्त
सुरेख...