भूक

अरुण मनोहर जे न देखे रवी...
आला तेव्हा होता नंगा, त्याले कपडे घातले सोन कांतीचिये रंगा, त्याचे रुपडे झाकले कपड्यांच्या अंगा अंगा, सदा लागलेली भूक जिव्हा खादाडीचा दंगा, डोया हवे दृष्टीसूख कान मागती सुराले, त्वचा आसुसली स्पर्शा नाक सुवासा हुंगते, सारी शोधताती हर्षा पंचेद्रियांचे चोचले, पुरविता पुरे नाही किती ह्यांना भरविले, देह वखाखला राही कपड्यांच्या अंतर्भागा, वसे सोनेरी झळाळी त्याची भूक भागेना गा, मारी आक्रोशाने हाळी सारे देहाचे चोचले, पुरे होती त्याचे लाड तेज भुकेने गांजले, पाच गजांचिये आड पंचेंद्रिये अंग अंग खाउ खाउनी खंगले जीर्ण होताची तुरूंग तेज मोक्षाशी धावले
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

14 टिप्पण्या 2,416 दृश्ये

Comments

समयांत नवीन

अहिराणी भाषेचा स्पर्श दाद देण्याजोगा आहे. विषय सध्या सगळीकडे चर्चिला जात आहे, त्या अनुषंगाने आपली कविता योग्य वाटत आहे.

परिकथेतील राजकुमार नवीन

झकास एकदम. शब्द शब्द आवडेश.