मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रिय सचिन देवा.....................

मंदार कात्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
देवा तुला शोधू कुठं .................... नाही टिकत तू क्रीज वर .............. नाही चुकवत तू योर्कर................. नाही चालत बॅट तुझी आता............ निराश होती भक्त! देवा तुला शोधू कुठं? pavilion मध्ये तू सदाच दिसतोस फार कमी क्रीज वर टिकतोस क्रिकेट सोडून जाहिरातीत दिसतोस जास्त परम देवभक्त ही झाला निस्तब्ध ............... देवा तुला शोधू कुठं................................? व्हावे रिटायर आता तरी देवा सकल भक्तजन करीती धावा होत नाहीत पूर्वीसारख्या धावा थकलास आता तू चालली थकत ही बॅट....... देवा तुला शोधू कुठं?

वाचने 2367 वाचनखूण प्रतिक्रिया 9

देव ? ? ? मोह, माया ह्यापासून अलिप्त तो देव. येथेतर तर माया जमवण्यासाठी म्हातारपण आले तरी तरुणान्चि सन्धि हिरावून खेळण्याचा सोस ! ! !

अमोल खरे Sat, 12/15/2012 - 09:14
चला सचिनला जाऊन द्या एक वेळ. बाकीचे १० जण काय दिवे लावतायत ते तरी जरा सांगा. बाकी १० जण यॉर्कर चुकवतात का ? बाकी १० जण क्रिझ वर टिकतात का ? जर बाकी सगळे मजबुत खेळतायत आणि एकटा सचिन चुकतोय तर त्यावर बोलणं ठीक आहे. सचिनवर टिका करणं खुप सोप्प आहे हो. पण रन काढताना सचिन ह्या वयात ज्या जोराने धावतो तसं आपल्याला बसस्टॉप पर्यंत तरी धावता येते का ? तो आज कोट्याधीश / अब्जाधीश असुन इतक्या साधेपणाने बोलतो, तसं आपल्याला जमतं का ? विचार करुन बघा जमलं तर.

विचार करुन बघा जमलं तर.
1तुम्ही त्या शेवटच्या मुलीला ओळखतात का?नाही ना तसेच सचीनचे आहे,तो फोकस मध्ये असल्यावर बाकीचे झाकोळुन जातात.मग बाकींच्याच्या यश अपयश याच्याशी कोणालाही घेण नसत.