नाटकांवरुन कविता

रसायन जे न देखे रवी...
"नकळत सारे घडले" माझे मन तुझ्यावर जडले तु माझी "ती फुलराणी" कधी झालीस? हे माझे मलाच न कळले प्रेमामध्ये रुसवा-फुगवी अन् "हसवा फसवी"नेच जम्मत आहे प्रेम एकदा करुन तर बघ "हिच तर प्रेमाची गम्मत आहे" प्रेमाचा पुर्वार्ध वाटेल "कुर्यात् सदा टिंगलम्" प्रेमाचा उत्तरार्ध असेल साक्षात् "लग्नम् गोंधळम्" "यदाकदाचित" माझ्या प्रेमाला प्रथम म्हणशील तु नाही रे नाही प्रेम माझ्याशी करुन तर बघ ,नक्की म्हणशील " सही रे सही"
वर्गीकरण

35 टिप्पण्या 8,398 दृश्ये

Comments

परिकथेतील राजकुमार नवीन

मला आवलली कविता परा इयत्ता दुशली तुकली ब

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by जेनी...

@पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत?? >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif @पूजा इयत्ता पैली तुकली अ>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing005.gif =================================================================== आत्मू......... प्ले ग्रुप http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

५० फक्त नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

अरे अरे कसे हो तुम्ही, तुम्हाला ते बिटविन द वर्डस, प्ले आणि ग्रुपच्या मध्ये बॉय लिहिलेलं दिसलं नाही का ?

प्यारे१ नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

पर्‍या लेका, नंबरं लागल्यात हितं लायनी माराया आन त्वा काय सांगायलाहेस... ;) 'पूजा का स्वयंवर' नाम की सीरियल लवकरच आने वाली है... पूजा तू लाव शेंड्या सगल्यांना! ;)

अगोचर नवीन

नाटकांचे रसायन चांगले जमवले आहे .. पण लेकुरे उदंड झाली पर्यंत न्यावा कि राव पुढील लेखनाला ऑल द बेस्ट ! - अगोचर तो मी नव्हेच

स्पा नवीन

मस्तच लिहील आहे रसायन राव.. अशीच उत्तमोत्तम कला येथे पेश करत राहा आम्ही आस्वाद घेऊच

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by स्पा

मस्तच लिहील आहे रसायन राव.. अशीच उत्तमोत्तम कला येथे पेश करत राहा आम्ही आस्वाद घेऊच
येवढा गोग्गोड प्रतिसाद ? कोणा 'अधिकार्‍याने' सत्यप्रतिसाद दिल्याबद्दल व्यनीतून हाग्यादम भरला का काय ?

पैसा नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

हल्ली त्यांचे हृदयपरिवर्तन झाले आहे अशी बातमी ऐकली.

तिमा नवीन

मराठी सिनेमांची नांवे घेऊनही कविता लिहावी ही विनंति!