आई, अशी कशी ही दिवाळी
येते पटकन, सरते झटकन,
अभ्यासाला पुन्हा जुंपते
दहा दिवस का जाती चटकन !
फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या
गोड गोड का तसेच उरते ?
चकली चिवडा चट्टामट्टा
पोटामध्ये भरकन जिरते !
भुईचक्र अन् टिकल्या आता
कंटाळा मज येइ उडवता -
धमाल दिसते मोठया हाती
बॉम्ब नि रॉकेट आवाज करता !
सुट्टी असते किती ग हट्टी
ठरल्या दिवशी येते जाते -
मित्रमंडळी गोळा होता
धमाल अमुची मनीं रहाते !
दिवाळी संपुन सुट्टी संपता
जुनाट दिसती नवीन कपडे...
आई, सांग ना दिवाळीस ग
बारा महिने थांब, तू इकडे !
.
.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3272
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूपच छान , बालगीत...
घ्या आता रडु नका
आँ ? आणि चकली चिवडा कुठाय ?
In reply to घ्या आता रडु नका by श्री गावसेना प्रमुख
घ्या तुम्ही नका नाराज होउ
In reply to आँ ? आणि चकली चिवडा कुठाय ? by सस्नेह
मला बेसन लाडू
तुम्हीही घ्या
In reply to मला बेसन लाडू by ज्ञानराम
एकदम निरागस बालगित...आवडले..
ऐसाइच बोल्ता है....! येकदम
In reply to एकदम निरागस बालगित...आवडले.. by अविनाशकुलकर्णी
खुप मस्त गाणं, पोराला शिकवेन
बालगीत आवडले आणि गासेप्रंचे
सुंदर