मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परधीन

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
चौकोनी मावेल कसे मज सांग पिंजले असे पिसे अवशेष विखुरल्या लाटांचे वाटे झेलावे अलगदसे भंगल्या तनूचे अणुरेणू शोधिती हरवले जसे हसे पंखात नितळ दंव सोनेरी स्पर्शात भाव अस्पर्श असे मोट बांधली मेघाची पण पराधीन घरचे वासे अंदाज न सुटल्या धाग्यांचे क्षण जवळ न येती जराहिसे .....................अज्ञात

वाचने 1077 वाचनखूण प्रतिक्रिया 3

गणेशा Mon, 12/03/2012 - 21:04
मोट बांधली मेघाची पण पराधीन घरचे वासे अंदाज न सुटल्या धाग्यांचे क्षण जवळ न येती जरासे अप्रतिम ओळी खुप खुप आवडल्या... पुन्हा पुन्हा वाचाव्यात अश्या ----------

हारुन शेख Mon, 12/03/2012 - 21:14
पंखात नितळ दंव सोनेरी स्पर्शात भाव अस्पर्श असे या ओळी खासच आहेत.