मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मा़झ्या चारोळ्या

अविनाश लोंढे. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!

वाचने 16712 वाचनखूण प्रतिक्रिया 104

मी_आहे_ना Wed, 11/21/2012 - 10:26
फुल नव्हे हो, फुलं (फुल आणि कॅपिटल एम) अर्थ बदलतो म्हणून सांगतोय, आगाऊपणे नव्हे.

माझ्या काही चारोळ्या चोरलेल्या काही जोडलेल्या बागेतली ती दोन फुलं ... गुंतलेली एकमेकात , जसे ओलेचिंब आपण दोघ .... श्रावणाच्या पावसात...!!!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सूड Wed, 11/21/2012 - 23:56
श्रावणाच्या पावसात...!!! श्रावणात पाऊस फार नसतो हो. त्यात ओलेचिंब होणं तितकं लॉजिकल वाटत नाही. भादव्याच्या पावसात म्हणा हवं तर. सूचक वाटेल. ;)

In reply to by सूड

श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 11/22/2012 - 09:19
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे आमच्या कडे भादव्याच उन चटके देत हो,त्यामुळे श्रावणाच्या पावसातच ठीक आहे,तस तुम्हाला योग्य वाटले तर दुरुस्ती करुन नवीन लिहुन टाकु शकतात.

जेनी... Wed, 11/21/2012 - 20:17
तेरी आठवन मेरेकु टीरेन के डब्बे मे आयी झुक्झुक करके मेरे दिल्कु धडका गयी लोंढे साब मस्त चारोळ्या :)

अविनाश लोंढे. गुरुवार, 11/22/2012 - 09:53
विषय : आई आईवरती चारोळी ... ठरवूनही करता आली नाही, आईच्या प्रेमाची माळ.... शब्दानाही ओवता आली नाही....

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अविनाश लोंढे. गुरुवार, 11/22/2012 - 13:28
विषय : प्रेम तुझ्या चुम्बनात... एका वेगळ्याच नशेचा ध्यास आहे .... अजुनही माझ्या श्वासात... तुझ्याच श्वासान्चा वास कसा आहे.....?

In reply to by अविनाश लोंढे.

सर्वसाक्षी गुरुवार, 11/22/2012 - 16:13
अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. श्वासातली नशा उतरेपर्यंत वाहन चालवु नका. पकडले गेलात तर भामोका १९८८ कलम १८५ अन्वये पकड्ले जाल आणि न्यायाधिश सटकिल असेल तर दोन वर्षे आत जावे लागेल. मग बसा आपलेच उश्वास मोजत.

In reply to by सर्वसाक्षी

श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 11/22/2012 - 17:00
अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. काय हुंगतात हो लोक.(त्यांच्या कैच्या कै सवयी असतात ना म्हणुन)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सर्वसाक्षी गुरुवार, 11/22/2012 - 17:14
शनिवारी रात्री मुंबैतल्या रस्त्यावर फेरफटका मारा. विशेषतः नामांकित बारच्या परिसरातल्या रस्त्यांवर.

In reply to by सर्वसाक्षी

श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 11/22/2012 - 17:36
आमच्या आवाक्यात नाय हो म्हणुन इचारल्,आम्हाला नुसते हुंगने बघायला जायला एक दिवस खर्च करावा लागेल्,त्यापेक्षा तुम्हीच सांगाव म्हणुन लिहील

In reply to by श्री गावसेना प्रमुख

५० फक्त गुरुवार, 11/22/2012 - 17:49
एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम आहे काय तो ?

In reply to by ५० फक्त

श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 11/22/2012 - 18:21
मी जास्त कोणी पडत नाही असे म्हणालो,कोणी जास्त पडत नाही असे थोडेच बोललो फक्त दोघच पडतातच हो,पण प्रेमात न पडणारेही आहेतच की.

In reply to by ५० फक्त

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/22/2012 - 23:01
@एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif ....................................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif @जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gifआहे काय तो ?

अविनाश लोंढे. Fri, 11/23/2012 - 10:36
भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद.....!!! .असो....;) विषय : विरह . उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " अन त्याच पावसात "तुझ्याविना" मी "चकोर" तहानलेला..!!!

In reply to by अविनाश लोंढे.

५० फक्त Fri, 11/23/2012 - 10:42
आमच्या अर्धवट अज्ञानानुसार चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलेला असतो पाण्याला नाही, तो 'निट'च घेतो, सोडा वॉटर नाही लागत त्याला. असो, 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद. तुम्हाला भेटलेले प्रतीसाद हे उपहासात्मक नाही हो,एकमेकाची खेचाखेची करताहेत

In reply to by ५० फक्त

प्रतिसाद भेटतात का मिळतात(मी अज्ञानी)(काही व्य नी मार्गे,काही आपला म्हणुन्,काही तु दिला म्हणुन्,कधी उडवायची म्हणुन्,कधी जिरवायचीच म्हणुन असे असतात ना)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अविनाश लोंढे. Fri, 11/23/2012 - 11:58
तसही "मिसळ्पाववरील" तत्वज्ञ हे "उच्चतेत" जरी " वर - खाली" असले तरी " निचतेत" एकाच रेषेत आहेत ...!!! कुणीही वैयक्तिक घेऊ नका हो.....:)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अविनाश लोंढे. Fri, 11/23/2012 - 12:09
साहेब ..काय हो..तुम्ही तर "serious " झालात....!!! अहो, गम्म्त म्हणुन लिहल , तस सर्वन्चा आदर आहे हो..!!!

In reply to by ज्ञानराम

अभ्या.. Fri, 11/23/2012 - 11:10
अगम्य प्रतिसादाच्या "पावसात" निरागस नवकवी "बावरलेला " अगम्य प्रतिसादाच्या "पावसात" आमचापण प्रतिसाद ठरलेला.!!!

सुहास.. Fri, 11/23/2012 - 10:44
लिही, लिही अजुन लिही , पाने टराटरा, संपली वही ! ( तिसर्‍या ओळीमध्ये शिवशिवित असुन हात आवरता घेतला आहे ;) )

अविनाश लोंढे. Fri, 11/23/2012 - 13:35
चला असा कसा झोपू देइल मी तुम्हाला....!!! विषय : नाती "ह्या" वेड्याला मोजता नाहित ग येत ..... हवेप्रमाणे वळणार्‍या "चक्रान्ची " पाती ... मला निभवता नाहित ग येत... खोट्या " हास्यान्ची" ही खोटी नाती...!!!!

ह भ प Fri, 11/23/2012 - 13:43
माझ्या मनातील भाव या कागदावर व्यक्त करतो.. आता मला समजून घेणारा तोच फक्त उरतो.. (विथ ड्यु परमिशन फ्रॉम माय फ्रेंड अजय शेरे)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Fri, 11/23/2012 - 15:31
कॅपॅकिटी गुर्जी कॅपॅकिटी... तुमचं पाणी संपलं. अफसोस! म्हणून म्हटलं उठा! अधिक/वजा साठी व्यनि ख व आहेच. ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

५० फक्त Sat, 11/24/2012 - 13:19
रामायणात का महाभारतात तो बाणाचा अक्षय भाता होता किंवा रजनिकांत / अक्षयकुमार / मिथुन च्या बंदुका असतात ना तसल्या बाटल्या आहेत वाटतं. ८-१० तास झाले अजुन पहिलीच चालु आहे.

अविनाश लोंढे. Sat, 11/24/2012 - 10:25
शुभप्रभात .....!!! विषय : तुझ्यातील तेजाचा तो .... ईश्वरच "हस्तक " आहे..... माझ्यातील सगळा " पुरुषार्थ " तुझ्यातील "पद्मिनि" ला "नतमस्तक" आहे....!!!!!

In reply to by दादा पेंगट

पडेल पाडलेला आय.....डी.... http://www.sherv.net/cm/emo/futurama/hypnotoad-smiley-emoticon.gif असा प्रतिसाद फक्त पाडलेला आय....डी....च देऊ शकतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif सरळ बोलायची हिंमत हरवली आय...डी...पाडून फुरफुरला जे बोल लावी दुसर्‍याला त्याच गुणानी तो गुरगुरला http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif ================================================================================= http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif