मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कितीक दिवस हे

कौस्तुभ आपटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कितीक दिवस हे दुरुन दुरुन पहाणे मनातिल गुपीते सारीत सारीत बोलणे सोंग हे पांघरुन गुज मनी दडवून उगीच उगीच हासणे कितीक दिवस हे... हले ना ओठ जरी भाषेचा आड काही लपत्ये श्वासांची माळ तुझी कुणाचे नाव उरी जपत्ये,जपत्ये,जपत्ये कसल्याशा कळेला दाबीत दाबीत जगणे कितीक दिवस हे... सुनेसे गाव जसे, मनात भाव तसे दाटले भवती भिड जरी,एकटा जीव असे भासले,भासले,भासले आपुल्याच जीवाला जाळीत जाळीत रहाणे कितीक दिवस हे... फुटु दे बांध आता, मुखाचे बंध से सुटू दे भारला सूर उरी, जाऊ दे पार नभी भिडू दे, भिडू दे, भिडू दे हवे हवे असताना टाळीत टाळीत वागणे कितीक दिवस हे... गीत -- कौस्तुभ आपटे हे गाणे खालील लिंकवर ऐकू शकता http://soundcloud.com/kaustubh-apte/kityek-divas-he-mp3 आवड्ल्यास http://www.facebook.com/AseSphuraveGeet या फेसबूक पेज ला जरू लाईक करा.

वाचने 2593 वाचनखूण प्रतिक्रिया 12

शर्वरी नेने 12/11/2012 - 20:37
बराच वाचन झालेला आहे या विषयावर पण नेहमीच मनाला स्प्रषून जातो हा विषय. आशा करते कि हे दिवस तुमच्यासाठी लवकरच संपतील.

In reply to by १००मित्र

श्री गावसेना प्रमुख 17/11/2012 - 08:57
ही ही ही 1

बॅटमॅन 16/11/2012 - 12:45
एक खुस्पटवजा सूचना- रसभंगाबद्दल आगाऊच माफी मागतो. "लपत्ये", "जपत्ये", यांऐवजी "लपते", "जपते", अशी रूपे वापरल्यास वाचताना जरा बरे वाटेल.

In reply to by अभ्या..

अत्रुप्त आत्मा 18/11/2012 - 06:47
@अपत्ये लै खुपत्ये>>>ए. मी नाही मी नाही मी नाही(पाठिंबा देणार) :-)) हा कवि :-p आमच्या रायगड जिल्ह्यातिल असावा. भाषेचं हे वळण तिथलच ;-)

In reply to by तिमा

बॅटमॅन 18/11/2012 - 19:02
(अपत्ये) लेकुरे उदंड झाली | तों ते लक्ष्मी निघोन गेली || असे रामदासांनी म्हटल्यामुळे देवाघरचा फूलबगीचा नको वाटून र्‍हायला आहे ;)