मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दारू फुकट झालीच पाहिजे...

अस्वस्थामा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
दारूच्या या गुत्त्यावरचा, गुंता काही सुटत नाही.. किती उधारी दिली तरी ही, हिशेब काही मिटत नाही.. चकन्यामधले शेंगदाणे, मी बारीक्क नजरेनं मोजतो आहे, रोज एक्केक दाणा कसा, कमी कमी भरतो आहे.. एक दिवस एकच शेंग, पाहून आमचा सरकला.. 'म्हागाई माजली न् भौ', संप्या वेटर चिरकला .. आधीच साला बायको आमची, पगार आमचा करीत नाई.. शेट्टी उधारी ठेवीत नाई, अन् आता संप्या चकनापण देत नाई.. डोक्याला हात लावून, बाटलीकडं बघत बघत.. टेबलावर उभा राहून बोलला बाब्या मोडक.. 'सरकारनं आता तरी, गरिबांकडं पाह्यल पायजे.. बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे.. बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे..'

वाचने 3683 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by स्पंदना

अस्वस्थामा Sat, 11/17/2012 - 02:48
'भावा' हाक ऐकून लय बर वाटलं .. तसा या गुत्त्यावर नवाच आहे बगा.. ;) (नावावरून भौ की तै ते काय कळत नै नायतर बसुयात कधीतरी म्हणालो असतो .. :D )

शर्वरी नेने Mon, 11/12/2012 - 21:02
हीच कविता जर एक ग्लास दुधावर असती (आणि दुध फुकट झालंच पाहिजे असं शीर्षक असतं तर.) कवितेला वाईट म्हणायचा हेतू नाही, मला आवडली ही कविता. फक्त मनात विचार आला असं असता तर.

अभ्या.. Tue, 11/13/2012 - 21:14
काय नाय हो हे कॉम्प्लिमेंटरी मिळण्याचे पर्णाम हैत. दारू फुकट मिळाली तर चकण्याबरोबरच फ्री घ्यावी लागेल. ती सुध्दा ब्रांडेड चकण्याबरोबर. आय्बीआरेसआर्सीओएम्बीपी आसल्या नावाने शेंगाच्या पुड्या मिळतील दिड्शे दोनशे रुपयाला. मग चालेल का?

In reply to by बॅटमॅन

अस्वस्थामा Sat, 11/17/2012 - 03:02
अशे कशे ब्याटम्यानराव.. जगात अलिखित नियम आहे की दारू ( आणि मजेच्या गोष्टी जसे की धूम्रकांडी वगैरे ) तेवढीच महाग असावी की लोकांनी विकत तर घ्यावी पण उतमात करू नये.. बाकी सरकार समर्थ.. आमी आपले गंगा वाहात होती दारूबद्दल, म्हणून हात धुवून घेतले.. D (सोत्रींच्या कॉकटेल मालिकेचा फ्यान..)

In reply to by बॅटमॅन

आनंदी गोपाळ Sat, 11/17/2012 - 20:24
तुमच्या मागणीला तथास्तु ;) तुमच्याआमच्यासाठी महागच होईल हो. तिथं बीपिएल-वाल्यांसाठी फुकट झालीच पायजे असं आहे.