सर्व रसिक खवय्यांना दीपोत्सवाच्या मंगलदायी शुभेच्छा. मौका है दस्तूर भी, तो कुछ मीठा हो जाये? :)
साहित्य :
३ भाग साखर. १ भाग कॉर्नस्टार्च. १ भाग बटर. २-३ चमचे साजूक तूप. ४ भाग पाणी. बदाम. १/२ चमचा वेलची / जायफळ पूड. केसर. खायचा रंग (ऑप्शनल.)
कृती :
नॉनस्टिकच्या काढईत ३ भाग साखर आणि ३ भाग पाणी एकत्र करून मध्यम आचेवर ढवळत राहावे

थोड्या कोमट पाण्यात केशर भिजत ठेवावा. १ भाग कॉर्नस्टार्चमध्ये १ भाग पाणी आणि भिजवलेले केशर टाकावं.

साखरेच्या पाकाला उकळी यायला सुरुवात झाली (तळाला बुडबुडे दिसायला लागले) की त्यात कॉर्नस्टार्च टाकून ढवळावं.

मिश्रण दाट होऊ लागलं की त्यात २ चमचे साजूक तूप घालून ढवळत राहावं. मध्यम आचेवर तूप मिश्रणात एकजीव झाल्यानंतर त्यात १ मोठा चमचा बटर टाकावं. बटर एकजीव झालं की पुन्हा १ चमचा बटर टाकावं.

दरम्यान मिश्रणात हवेचे लहान लहान बुडबुडे तयार झालेले दिसतील. नंतर बदाम/काजू आदी सुक्या मेव्याचे तुकडे टाकून ढवळत राहावं. हे मिश्रण स्वत:हून कडा सोडायला लागेपर्यंत ढवळत राहावं. (साधारण दिलेल्या प्रमाणाला २०-२५ मिनिटे लागतात.)
ताटलीमध्ये हे मिश्रण काढून गार करत ठेवावं. (किमान १-२ तास.)
थंड झाल्यावर हव्या त्या आकारात तुकडे करावे.

वाचने
10705
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिवाळीला जे मिश्र मिठाईचे
आयला सहीच... मला देखील ह्या
भारी
क्या बात है गणपासेठ. पाकृचे
वा, मला खुप आवडतो...पण
जबरी
काय बोलु
अहां!
सही!
खरेच
बदामी हलवा खास
मला हा गव्हाच्या चिकाचा करतात
मस्तच
हा हा मी आजवर याचा जिलेटीनशी
:बदामी" आकाराचा "बदामी हलवा" ;)
माहीम हलवा वेगळा. पुलंनी
In reply to :बदामी" आकाराचा "बदामी हलवा" ;) by मदनबाण
अहाहा!
मुलांची आवडती मिठाई !