प्यार का पहला ख़त - भावानुवाद
लेखनप्रकार
प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता हे |
नए परिंदो को उड़नेमे वक्त तो लगता हे ||
परमेश्वरा , अरे अनादी अनंत बसला आहेस तिथे .. हजारो , कोटी कोटी रूपे तुझी
प्रेमात पडलोय तुझ्या .. किती रुपात पाहू ? कसाही तुला जाणून घ्यायचा प्रयत्न केलास तरी तू अपूर्णच भासतोस रे
तुझ्या प्रेमात पडायची हिम्मत केलीये ... जिथे तुकाराम, ज्ञानेश्वर , मीरा , शबरी यांचा कस लागला .. तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा
तुझी भक्ती करायची.. कशी.. काय .. काहीच ठावूक नाही रे .. मी अगदी नवखा आहे ..
तू नक्की आहेस तरी का , माझी प्रार्थना ऐकतोस का हे हि ठावूक नाही
अज्ञाताची ओढ म्हण , आकर्षण म्हण ... शब्द नाहीत .. तुझ्या प्रेमात पडलोय हे मात्र नक्की, किंवा कदाचित तूच क्षणात मला भेटून जाशील
तस झालं तर मला तुला ओळखता येईल का रे ?
जिस्म की बात नहीं थी , उनके दिल तक जाना था
लंबी दुरी तय करने में , वक्त तो लगता हे
तू सोन्याच्या सिंहासनावर पण आहेस , आणि गावाच्या वेशीबाहेरील झाडीतल्या शेंदरी दगडातही .
किडा - मुंगीत आहेस आणि माणसाच्या हृदयातही .तुझी कोटी कोटी रूपे , आम्हीच निर्माण केली , आमच्याच वेड्या कल्पना असतील सगळ्या
तुझ्या शरीराचा, ह्या बाह्य रूपाचा मोह नाही रे आता, जे संताना गवसलं , ते तुझे अंतरंग
तुझ खर रूप मला सापडेल का? या क्षणभंगुर जगाच्या रंग रंगोटिला भुललेल्या मला तू भेटशील का?
नक्की तू आहेस तरी कोण ?मला वेळ लागेल कदाचित तुझ्या पर्यंत पोचायला, एक काय अनेक जन्म हि लागतील ,कितीही वेळ लागला तरी माझी थांबायची तयारी आहे
गांठे अगर लग जाये तो फिर , रिश्ते हो या डोरी ,
लाख करे कोशिश खुलने में , वक्त तो लगता हे
तुझ्याशी एक नात झालंय रे , अनामिक
निसर्गातही तुझ अस्तित्व जाणवत , हि पंच तत्व तुझ्याच सत्तेने बांधली गेली आहेत
माझा कोणाच्याही नकळत अव्याहत सुरु असलेला श्वास .. तूच पुरवतो आहेस मला , काही ओळख नसताना
मग निसर्गातला तू खरा , पंचतत्वां मधला तू खरा , कि माझ्या श्वासातला .....
एवढ्या जवळ असूनही , मग लांब का वाटतोस ..
या मायेने , या विकारांनी एवढ जखडून ठेवलंय, कि या गाठी सोडवून तुझ्या पर्यंत पोचायला वेळ लागणारच
तू असाच तिथे असशील अनादी अनंत..
आणि मी ... कधी न कधी तुझ्यापाशी येईनच , वचन देतो
____________________________________________________
गझल : http://www.youtube.com/watch?v=u1aRx8Yu__8
गायक : जगजीत सिंग
वाचने
7899
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
सॉरी स्पा . लेकीन दिल तक नहि
ही गज़ल देवाला उद्देशून नाही
हाहा.. माहितेय हो..
In reply to हाहा.. माहितेय हो.. by स्पा
माहितेय हो?
In reply to माहितेय हो? by संजय क्षीरसागर
ओके
स्पावड्या, तुझं मधलं निरुपण
In reply to स्पावड्या, तुझं मधलं निरुपण by गवि
+१
In reply to स्पावड्या, तुझं मधलं निरुपण by गवि
धन्यु हो गवि सेठ
मुक्तक आवडले.
मुक्त केलेला "क" अवडला
गझलेचा भक्तिभावानुवाद आवडला.
आवडले. पण................
फारच सुंदर!!!
हल्ली शिर्षकं देताना अंमळ
प्रेम म्हणजे मनाच्या गाभार्
In reply to प्रेम म्हणजे मनाच्या गाभार् by स्पंदना
+१
In reply to +१ by मूकवाचक
(No subject)
In reply to +१ by मूकवाचक
वाह...
In reply to +१ by मूकवाचक
वाह मुक्या
In reply to वाह मुक्या by स्पा
बाकी सगळे ठीक आहे, पण मुक्या
In reply to वाह मुक्या by स्पा
बाकी सगळे ठीक आहे, पण मुक्या
In reply to बाकी सगळे ठीक आहे, पण मुक्या by विश्वनाथ मेहेंदळे
म्मूव्वा तरी लिवायचं
In reply to +१ by मूकवाचक
अप्रतिम :)
In reply to +१ by मूकवाचक
मस्त जमलं आहे. तप या शब्दाचा
In reply to +१ by मूकवाचक
एक मित्र गझल्सना 'प्रेयसीचे
In reply to +१ by मूकवाचक
छान रे मित्रा.
In reply to प्रेम म्हणजे मनाच्या गाभार् by स्पंदना
स्पा तुमच इंटरप्रिशन अगदीच
In reply to स्पा तुमच इंटरप्रिशन अगदीच by स्पा
आश्चर्य वाटलं ना, आता उतारा
स्पा खूप छान निरुपण,...
बघा!!!
In reply to बघा!!! by सहज
>>बघा आजचा तरणाबांड मर्द
भक्तीगीत आणि भावगीत यात फरक आहे इतकाच मुद्दा आहे
In reply to भक्तीगीत आणि भावगीत यात फरक आहे इतकाच मुद्दा आहे by संजय क्षीरसागर
ओके
साप साप म्हणून भुई धोपटताना
In reply to साप साप म्हणून भुई धोपटताना by बॅटमॅन
--^--^--^--
In reply to साप साप म्हणून भुई धोपटताना by बॅटमॅन
काही लोकांना फक्त एकच शब्द सगळीकडे वापरायची सवय असते
In reply to काही लोकांना फक्त एकच शब्द सगळीकडे वापरायची सवय असते by संजय क्षीरसागर
जिलेबीला शंकरपाळे तरी कसे
In reply to जिलेबीला शंकरपाळे तरी कसे by बॅटमॅन
हि घ्या दिवाळीची जिलबी.
In reply to हि घ्या दिवाळीची जिलबी. by अर्धवटराव
हां ही मात्र गंमत आहे खरी
छान आहे
छान लिहलंय रे स्पावड्या.
In reply to छान लिहलंय रे स्पावड्या. by किसन शिंदे
कोण रे ते ४ लोक? मलापण सांग
चांगला प्रयत्न.
:)
ते बाकीच सोडं, पण तुझ मन