अपघात
लेखनप्रकार
चंदूचं आयुष्य तसं एककल्लीच! सकाळी उठावं, चहा घेवून बाईकला किक मारावी, गल्लीतल्या किराणा मालाच्या दुकानातून १० गुटख्या च्या पुड्या घ्याव्यात,एक तिथेच फोडून तोंडात टाकावी, आणि दिवसाचा शुभारंभ करावा! मग थोडं चावडीवर भटकून इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात आणि बातम्या काढाव्यात. आणि मग सरळ घर गाठावं. अंघोळ-पूजा उरकून आईने दिलेला डबा घेवून मग कंपनी गाठावी....
कोकणातलं समुद्रकिनाऱ्या वरचं गाव! १५ वर्ष पूर्वीच इथं एक परदेशी कंपनी आली, लोकांनी खूप विरोध केला, पण शेवटी कंपनी राहिलीच! मग चंदू ला कंपनीत मुकादम म्हणून काम लागलं. तसा होता चंदू आयटीआय केलेला ! पण कामासाठी बाहेरगावी जायचं तर आई सोडेना, बाबा लहानपणीच सोडून गेलेला, घरची एवढी मोठी बागायत आणि आंब्या-फणस-काजू ची बाग, गुरे –ढोरे! मग आई घाबरली. चंदुला म्हणाली, “बाबा चंदू, गावाजवळ कुठं काम मिळतं का बघ बाबा, मि नाय तुला मुंबईला पाठवणार. इकडं कोण रं करील इतक्या गुरांचं आणि शेती-भाती? “
झालं, मग चंदू ला आपल्या आळशीपणा ला लपवायचं कारणाच मिळालं कि ! पण त्याच्या दुर्दैवाने ही कंपनी सुरु झाली, आणि आईने एका स्थानिक राजकारण्याचा वशिला लावून चंदू ला तिकडे चिकटवला आणि चन्दूची उंडगेगिरी बंद झाली. मग चन्दूची नोकरी सुरु झाली. सकाळीं ९ ते संध्याकाळी ६, मध्ये १ तास सुट्टी-जेवायला! पगार १५०००/- रुपये.
घरावरून कामाच्या ठिकाणी जायला मध्ये लॉन्चने[होडी] खाडी पार करावी लागायची! मग चंदू घरून सायकल वरून बंदरापर्यंत जायचा, लौंच आली, कि सायकल सकट नंदू आत बसायचा, आणि पलीकडच्या धक्क्यावर उतरून पुन्हा सायकलने कंपनीत जायचा, येताना पुन्हा तसेच!
तर झालं असं की एकदा लौंच ने चंदू कंपनीत जात असतानां एक नवीन मुलगी त्याला दिसली. दिसायला छानच होती. मस्त गुलाबी साडी, दणकट बांधा, आणि खाडीच्या वाऱ्यावर उडणारे लांबसडक केस! चंदू ला तर ती स्वप्नातली परीच वाटली! आतापर्यंत आयुष्यात चंदू ने अशी पोरगी पहिलीच नव्हती! दिसता क्षणी प्रेमात पडाव अशी........एकदा तर चंदुला वाटलं जावं आणि नाव विचारावं. पण ते धाडस त्याच्याने होईना! मग तो तसाच एकटक तिच्याकडे पाहत राहिला ,तेवढ्यात किनारा कधी आला आणि बोट धक्क्याला कधी लागली तेही नाही कळल त्याला!
दिवसभर मग कंपनीत तिचाच विचार! कामात मन लागेना! तश्याच तिच्या विचारांच्या धुंदीतच दिवस गेला, आणि ...............चन्दूचा डोळ्यावर विश्वासच बसेना! परत येताना बोटीत तीच! अरेच्चा! चंदू तर आनंदाने वेडा व्हायचाच बाकी राहिला! स्वारी एकदम खुश! त्याने ठरवलं, हिची माहिती काढायची! त्याची रात्र मग तिच्याच स्वप्नात गेली ,झोप कधी लागली आणि उजाडलं कधी तेही कळलंच नाही, आईने मोठ-मोठ्याने हाका मारून उठवलं तेव्हा कुठे जाग आली ! चंदू मग पटापट तयार होवून कामावर निघाला. आजही बोटीत ती होतीच. मग चंदूने आपला जिगरी दोस्त परश्याला तिची बातमी काढायला सांगितलं, आणि परत येताना संध्याकाळी बोटीत परश्याला तिला दाखवलंही.
परश्या ने २ दिवसात तिची सगळी माहिती काढली, तिचं नाव मोहिनी. ती त्याच्याच कंपनीत नवीनच कामाला लागली होती . स्टोअर डीपार्टमेंट ला . अन् ती राहायलाही चन्दुच्याच गावात होती, भाड्याने खोली घेवून! चंदू आनंदाने वेडा झालां. मग पुढची सगळी सेटिंग चंदू आणि परश्या ने व्यवस्थित केली, आणि एकदा चंदूने धीर करून तिला विचारलंच!
चंदू तसा दिसायला बऱ्यापैकी होता, त्यात आता प्रेमात पडल्यानंतर त्याने नवीन इस्त्रीचे कपडे, अत्तर इत्यादी छानछोकी करायला सुरवात केली,तो गावात राहूनही आणि वासुगिरी करूनही त्याचं बोलणं गावन्ढळ नव्हतं, त्यामुळे तिलाही तो थोडाफार आवडला होता, पण एकदम होकार देण्या ऐवजी थोडं भाव खावूनच मग तिने होकार दिला.......आणि मग काय मंडळी, पुढच्या दिवाळीतच चंदूच्या लग्नाचा बार वाजला! आईसुद्धा एवढी देखणी आणि नोकरीवाली सून मिळाली म्हणून आनंदात होती! चंदू आता चंद्रावर पोचला होता!
चन्दूचे दिवस मजेत जात होते! असेच ५-६ महिने गेले. पण अलीकडे मोहिनीला कामावरून यायला उशीर होऊ लागला. पूर्वी ते दोघे एकदमच कामावर जात आणि परत येत, आता चंदूने मोटार सायकल पण घेतली होती. पण हल्ली रात्रीचे ८-९ वाजले तरी मोहिनी येत नव्हती, कधी कधी तर ११-१२ सुद्धा .मग उशीर झाला कि कंपनीची बोट तिला सोडायला यायची! चंदूने विचारले तर कंपनीत काम वाढलंय म्हणून संगायची... हळू हळू तिच्या अंगावर अनेक दागिनेही दिसू लागले, चंदूने चौकशी केली तर ओव्हर-टाईम च्या पैश्यातून घेतले आहेत असे सांगायची... तरीही चंदूच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागलीच!
आणि त्या दिवशी तर कहरच झालां, त्या रात्री मोहिनी घरी आलीच नाही. आली ती एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी! आता मात्र चन्दूचा फ्युज उडाला! इतके दिवस जे मनात खदखदत होतं ते बाहेर आलं, चंदूने मग परष्याला विश्वासात घेवून सगळं सांगितलं. परश्याने २-३ दिवसात जी माहिती आणली त्याने तर चंदूच्या हातापायातील बळच गेलं ,संतापाने त्याच्या मेंदूची लाहीलाही झाली, स्टोअर डीपार्टमेंटचा मनेजर शुक्ला तसा हरामीच! पण दिसायला गोरा-गोमटा आणि बोलायला एकदम गोडगोड! या शुक्ला ने मोहिनी ला आपल्या जाळ्यात ओढली होती, तिच्यावर पैश्याची खैरात करून तो तिला रात्री थांबवायचा आणि नको नको ते रंग उधळायचा!
हे समजल्यावर चंदू ला काहीच सुचेनासं झालं, आपल्या बायकोनेच आपला विश्वासघात केला, आणि या हरामखोर शुक्ला पायी? चंदूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि कधी नव्हे ती त्याची पावलं दारूच्या गुत्त्याकडे वळली. १-२-३-४...चंदू ग्लास च्या ग्लास रिते करीत गेला... आणि मग कधीतरी उशिरा रात्री गुत्त्याबाहेर पडून बाईकला किक मारली... परत येताना नेमका शुक्ला जीप घेवून समोरून आला,आधीच चंदू प्यालेला, त्यात या शुक्लाच्या पायीच आपली बायको आपल्याशी बेईमान झाली या विचाराने तो हैराण झाला. आता या शुक्ला ला धडा शिकवायचाच ! चंदूने आपल्या बाईकचा स्पीड तुफान वाढवला आणि मागचा पुढचा विचार न करता सरळ बाईक शुक्ला च्या जीप वर चढवली !
जाग आली तेव्हा चंदू हॉस्पिटल मध्ये होता, उजव्या हाताला आणि पायाला भलेमोठे ब्यांडेज!उठताही येईना ! तेवढ्यात आई, मोहिनी आणि परश्या समोरून खोलीत आले. डॉक्टर जे म्हणाला ते ऐकून त्या दुखण्यातही चंदूच्या जीवाला फार बरे वाटले –
“अरे चंदू केवढा मोठा एक्सीडेंट रे! नशीब म्हणून वाचलास.. तुझी बाइक रस्त्याच्या बाजूच्या खडकावर आदळली! ठोकर चुकवण्यासाठी त्या शुक्ला साहेबांनी गाडी बाजूला वळवली आणि रस्त्यावरून गाडी नदीत पडली, त्यातच त्यांचा अंत झाला रे!”
इकडे मोहिनी डोळे पुसत होती आणि परश्या मात्र चंदू कडे बघत गालातल्या गालात हसत होता!
वाचने
24858
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
जीवनाची त्रीसुत्री
आपलं काय ठरलं होतं?
नवीन च माहीती कि जिप ला
In reply to नवीन च माहीती कि जिप ला by श्री गावसेना प्रमुख
त्ये काय हे...
वा. छानच कथा. मजा आली. कथेची
अरे वा!
In reply to अरे वा! by सर्वसाक्षी
हेल्मेट वापरावे तरी कुणी?
कथा(?) वाचून मनात बरेच प्रश्न
In reply to कथा(?) वाचून मनात बरेच प्रश्न by किसन शिंदे
आहे इथंच आहे, प्रश्नपत्रिका
In reply to आहे इथंच आहे, प्रश्नपत्रिका by ५० फक्त
भलतंच !
In reply to भलतंच ! by सस्नेह
नशीब धड्याखाली प्रश्न असतात
In reply to नशीब धड्याखाली प्रश्न असतात by ५० फक्त
'थरेजा' नाही हो, थेराजा -- B.
कहर
In reply to कहर by स्पा
रजनीकांतची बाईक
In reply to कहर by स्पा
बाकी हा परश्या सीबीआय मध्ये
In reply to बाकी हा परश्या सीबीआय मध्ये by किसन शिंदे
किस्ना, परश्या माहीती काढायचा
सकाळी उठावं , चहा घेवून
In reply to सकाळी उठावं , चहा घेवून by शिद
अहो पंधरा हजारांत एवढं सगळं
In reply to सकाळी उठावं , चहा घेवून by शिद
सायकल स्वत:ची असेल, बाईक
In reply to सायकल स्वत:ची असेल, बाईक by अन्या दातार
आणि मग मोटरसैकल मोहिनीबैंच्या
In reply to आणि मग मोटरसैकल मोहिनीबैंच्या by इनिगोय
आणि मग त्या मोटारसायकलीला जीप
In reply to सकाळी उठावं , चहा घेवून by शिद
शी बी आय
श्या
५० फक्त हो ते
In reply to ५० फक्त हो ते by श्री गावसेना प्रमुख
फक्त??
In reply to फक्त?? by जेनी...
आता त्यांच नाव ते तिथे मि काय
दुस-या धाग्यावरील प्रतिसाद इथे पडल्याने
दिसायला छानच होती . मस्त
In reply to दिसायला छानच होती . मस्त by गणामास्तर
(No subject)
In reply to (No subject) by गणामास्तर
मास्तर. लईच हसताय.. मोहिनीबाई
In reply to मास्तर. लईच हसताय.. मोहिनीबाई by इनिगोय
स्वप्नातल्या परीचे दणकट वर्णन
In reply to दिसायला छानच होती . मस्त by गणामास्तर
इइइइइइइइ .दणकट ?
In reply to इइइइइइइइ .दणकट ? by जेनी...
मंदार मामा ..दणकट मुली कशा
दणकट. बळकट, मजबूत आणि टिकाऊ
In reply to दणकट. बळकट, मजबूत आणि टिकाऊ by अभ्या..
अगंगंगं! अशी ही सुंदरी कोकणात
मग पुढे?
In reply to मग पुढे? by चिगो
तिसरा पर्याय, परश्या र्हायलाच
In reply to तिसरा पर्याय, परश्या र्हायलाच by अन्या दातार
अरे, काय हे..
छे छे छे.. मिपाकरांना या
दणकट
In reply to दणकट by मी_आहे_ना
बनवाबनवीचा लक्ष्या एकदम सहमत
In reply to दणकट by मी_आहे_ना
+१
In reply to दणकट by मी_आहे_ना
"दणकट पायजमा मुलायम बंडी"
.
छे छे...
In reply to छे छे... by अर्धवटराव
छ्या छ्या ...
In reply to छ्या छ्या ... by जेनी...
धन्यवाद :)
निषेध
चन्दूचे दिवस मजेत जात होते!
In reply to चन्दूचे दिवस मजेत जात होते! by वपाडाव
चन्दूचे दिवस मजेत जात होते!
In reply to चन्दूचे दिवस मजेत जात होते! by ५० फक्त
. भारीच .
In reply to चन्दूचे दिवस मजेत जात होते! by वपाडाव
देवाऽऽऽ!
...
In reply to ... by ह भ प
कशाला अंग दाबुन घ्यायला.की
In reply to कशाला अंग दाबुन घ्यायला.की by श्री गावसेना प्रमुख
ए आता बास करा रे ..
In reply to ए आता बास करा रे .. by जेनी...
तुम्हाला लय हसु येवु र्हायल
(No subject)
चंदू कि नंदू
In reply to चंदू कि नंदू by गोमट्या
चंदु हाच नंदु आहे,अन नंदु हाच
छान लीहीलीत कथा !
In reply to छान लीहीलीत कथा ! by ईन्टरफेल
हम्म्म !!
मस्तच
In reply to मस्तच by स्पा
=))
In reply to =)) by पैसा
त्यावेळी बैंचा तास ऑफ्फ होता,
आयो......काय पण अपघाते
ह्या ह्या ह्या
अशक्य काहीच नाही
आयला....
In reply to आयला.... by मुक्त विहारि
कारण तुमची नजर सगा ऐवढी
In reply to कारण तुमची नजर सगा ऐवढी by जेपी
ओके...
कथा वाचायची राहून गेली होती,
पुन्हा
अरे काय आहे हे????
मंदार कात्रे, अपघात खुपच दणकट
मंदार कात्रे, अपघात खुपच दणकट
हा घ्या पुरावा
In reply to हा घ्या पुरावा by मंदार कात्रे
टायटॅनिकचेही भविष्य असेच