मोहनथाळ
दिवाळी स्पेशल!!
साहित्यः जाडसर दळलेले बेसन पाव किलो, साजूक तूप पावणे दोन वाट्या, साखर अडीच वाट्या, थोडेसे दुध, अर्धा चमचा वेलची पावडर, बदाम काप सजावटीसाठी, चिमुट्भर केशर अगर केशरी रंग.
क्रुती: प्रथम बेसन एका परातीत घ्यावे. दोन चमचे तूप गरम करून त्यात घालावे. थोडया दुधाचा हबका मारावा. पाच मिनिटे पीठ झाकून ठेवावे. त्यानंतर पाच मिनिटानी रव्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे. कढईत बाकीचे तूप घेवून, त्यात बेसन घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे. दुसय्रा पातेल्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करावा. पाक एकतारी पेक्षा थोडा जास्त असावा पण दोन तारी नको.पाक तयार होत आल्यावर त्यात वेलची पावडर, केशर मिसळावे. तयार पाक भाजुन ठेवलेल्या बेसनात मिसळून मिश्रण गैसवर ठेवावे. मिश्रण आळत आले की थाळ्याला तूपाचा हात लावून त्यात ओतावे. थाळा हलवून मिश्रण सेट करावे. बदामाच्या कापानी सजवावे. तासाभराने आवडीप्रमाणे वड्या पाडाव्या.
दिवाळी असल्यामुळे तूपाच्या प्रमाणाचा विचार न करता मनसोक्त खावे.


वाचने
6738
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मस्तं...
In reply to मस्तं... by प्रभाकर पेठकर
माहित नाही.
In reply to माहित नाही. by अनन्न्या
हम्म्म्म.!
छान पाकृ. फोटू चमकदार आलाय.
आली आली दिवाळी आली.
In reply to आली आली दिवाळी आली. by गणपा
एकतारी नंतर...
नर्मदा मैयाचा मिळालेला प्रसाद
In reply to नर्मदा मैयाचा मिळालेला प्रसाद by मदनबाण
परिक्रमेच्यावेळी का?
In reply to परिक्रमेच्यावेळी का? by रेवती
परिक्रमेच्यावेळी का?
अहाहा..............
वॉव ...फोटो एकदम झक्कास आलाय
मोहन थाळ !
In reply to मोहन थाळ ! by Madhubala
खिक्क
मस्त झालाय मोहनथाळ...
मस्त दिसतोय एकदम. पण गोड
मस्त