मस्त धुकं होत त्या रात्री
दुधाळलेल्या रंगाची वस्त्रे अंगावर लेवून तू आलीस..
शुभ्र मोगर्याचा गजरा केसात माळून
मोगरा लगेच धुक्याशी सलगी दाखवत त्याला बिलगला
त्या क्षणावर फक्त तुझा आणि तुझाच हक्क होता
------
त्या सुगंधी धुक्यात आपण असे होतो
जणू आजूबाजूला उगवलेली दोन रोपटी...
एक तुळस आणि एक.....
तुझ्या कर्णफुलांवर दोन दोन मंजीर्या होत्या..
गोजीरवाण्या.. तुझ्याचं सारख्या...
------
तू बोलत होतीस
जणू आपल्या खट्याळ ओठांनी चांद्रप्रकाश शिंपून
गूढ कोलाज चितारत होतीस
तिकडे चंद्र चूर चूर होत होता
चंद्र आणि धरती मध्ये पण काही ओढ असते कां गं?
-------
चूर चूर चंद्राचे चांद्रकण
मी परत एक एक करून गोळा करु लागलो
-------
या धक्क्यातून मी सावरलोही नव्हतो..
अन् तू बोलता बोलता त्याच सुगंधी धुक्यावर पाय ठेवून निघालीस...
तिला जावे लागणार हे तिलाही माहीत होते...
ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही
तेवढे गोळा केलेले चांद्रकण घेऊन जा..
विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०२/१०/२०१२)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3516
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास.
मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, अतिशय सुंदर कविता.
क्लास
In reply to मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, अतिशय सुंदर कविता. by निश
छान आहे
ठीक
छानुस्का......
तात्यांची आठवण आली कारे बाबा?
In reply to छानुस्का...... by ज्ञानराम
kavitene madhech ghetaleli
मस्त !!
विखुरलेले चांद्रकण चटका देऊन
मस्त !!!!