लवकरच एका सुर्याचा अस्त...!
लेखनप्रकार
'I don't think I have plenty of cricket left in me'--सचिन तेंडुलकर
हि बातमी वाचली आणि डोळ्यात टचकन पाणी आले...
सचिन...सगळ्यांचा "तेंड्ल्या" आपल्याला काही दिवसानंतर कधीच त्या खेळतट्टी दिसणार नाही, या विचरानेच मन बैचेन झाले.
क्रिकेट ते पण तेंडल्या शिवाय विचार ही करवत नाही.
त्याची २३ वर्षांची कारकिर्द डोळ्या समोर आली... १६ वर्षांचा असताना न घाबरता "वसिम अक्रम, वकार युनुस सारख्या बॉलरला सामोरा गेलेला... ते आत्ता मागच्या वर्षी वल्ड्-कप जिंकल्यावर पळत येउन युवराजला मिठी मारणारा सचिन...
सामना चालु असताना...सचिन आउट झाला तर आपण टि.वी बंद करायचो... पण आता सच्या शिवाय क्रिकेट म्हणजे...
सचिन देशासाठी फक्त क्रिकेटच नाही खेळला...तर त्याने हजारो कुटुंबियांना एकत्र आणले आहे... भारताचा सामना चालु असताना आणि सचिन खेळताना एकच जल्लोश व्हायचा.
त्याने सेंच्युरी ठोकली की लोक एक-मेकांना मिठी मारायचे... एक सिक्स मारला की अंपायरच्या आधी आपले हात वर व्हायचे...
सच्या हा नेहमी आपल्याला आपलाच एक मित्र वाटतो... तो लवकर आउट झाला की त्याला मनसोक्त शिव्या द्यायचो...सेंच्युरी मिस झाली आणि भारत हारला तर दुप्पट शिव्या.
सामना जिंकल्या नंतर कट्ट्यावर रंगलेल्या सचिनच्या गप्पा...त्याने खेळलेला एक्-एक बॉल्... आत्ता-आत्ता सचिन लवकर निव्रुत्त व्हावा म्हणून रंगलेल्या गप्पा.
मित्रांनो हजारो कुटुंबियांना एकत्र आणणारा... चार पिढ्यांचा लाडका तेंडल्या.
सचिन एक सांगु तुला...? तु भले कमी सामने खेळ... पण निवृत्त होउ नकोस, आम्ही नाही रे पाहु शकणार क्रिकेट तुझ्याशिवाय.
सचिन एक सांगु तुला...? तु भले कमी सामने खेळ... पण निवृत्त होउ नकोस, आम्ही नाही रे पाहु शकणार क्रिकेट तुझ्याशिवाय.
वाचने
4461
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
सचिनच्या उत्तुंगतेचे सर्वांनाच कौतुक आहे. त्यामुळे त्याचे निवृत्त होणे त्याच्या चाहत्यांसाठी फार क्लेशकारक होणार ह्यात शंका नाही.
पण, व्यक्तिपुजेचे स्तोम न माजविलेलेच चांगले. सचिन नव्हता तेंव्हा सुनिल गावस्कर सर्वांच्या गळ्यातला ताईत होता सध्या सचिन आहे काय सांगा उद्या विराट कोहली असेल. काळ कोणासाठी थांबत नसतो.
In reply to लाडका सचिन...! by प्रभाकर पेठकर
सहमत.
-दिलीप बिरुटे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेठकरकाका आणि प्राडो यांच्याशी बाडीस
In reply to पेठकरकाका आणि प्राडो by मितभाषी
आता आपल्यामध्ये फार क्रिकेट शिल्लक राहिलेले नाही, अशी कबुली दस्तरखुद्द सचिननं दिली होती. पण,
सचिनच्या चाहत्यांना हे फारसं पटत नाही.
आमचे मित्र गणपाची अजून काही प्रतिक्रिया आली नाही, यातच सर्व आलं ;)
-दिलीप बिरुटे
In reply to धन्स हो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या आधी ही म्हणत आलोय आता ही हेच म्हणतो की सच्याला या खेळातल आपल्यापेक्षा जास्त कळतं.
त्यामुळे हा सर्वस्वी त्याचा निर्णय असावा, तुमच्या माझ्या सारख्या चहात्यांचा वा सो कॉल्ड क्रिकेट तज्ञांचा नाही.
है का नै डॉक ? :)
In reply to या आधी ही म्हणत आलोय आता ही by गणपा
>>>>> सच्याला या खेळातल आपल्यापेक्षा जास्त कळतं.
त्यामुळे हा सर्वस्वी त्याचा निर्णय असावा, तुमच्या माझ्या सारख्या चहात्यांचा वा सो कॉल्ड क्रिकेट तज्ञांचा नाही.
है का नै डॉक ?
हम्म,सविस्तर प्रतिसादासाठी जागा धरुन ठेवतो.
-दिलीप बिरुटे
In reply to क्रिकेट मधुन कारणांशिवाय कोणी निवृत्त झालं आहे काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म,सविस्तर प्रतिसादासाठी जागा धरुन ठेवतो.बघा हं. मागील काही काळापासुन आमचे निरीक्षण आहे की प्रॉ.डॉ. त्यांच्या लिहील्या शब्दाला जागत नाहीत. देवोंके देव(महादेव नाही) सचिन बद्द्ल लवकरच लिहाल ही अपेक्षा.
लेखाचं शिर्षक वाचलं तेव्हाच अंदाज आला होता कोणाविषयी असेल ते.
बाकी सचिन विषयीची तुमची कळकळ पोहचली पण.....
ममित्रांनो हजारो कुटुंबियांना एकत्र आणणारा... चार पिढ्यांचा लाडका तेंडल्या.>>>>
यासारखी वाक्य पटली नाहीत.
तुम्ही सचिन तेंडुलकरला सुर्याची ऊपमा दिलीत .. ते ठीक. पण त्याने सुर्यास्ताच्या निस्तेज सुर्याप्रमाणे निवॄत्त होऊ नये ही माझी मनापासून इच्छा आहे. निवृत्त व्हावे तर सुनील गावस्कर प्रमाणे, राहूल द्रविड प्रमाणे .. जेव्हा चाहत्यांना वाटत असते की अरेरे .. आणखी काही सामने खेळला असता तर..
सचिनने निवृत्त व्हावे, जरूर व्हावे, पण चाहत्यांना आणि क्रिकेट-प्रेमींना हवेसे वाटत असे तोपर्यंन्त.
आता पुरे असे होऊन त्याला जा असे सांगावे लागू नये हीच प्रार्थना आणि इच्छा.
ज्याप्रमाणे डॉन ब्रॅडमनने आपले स्थान अढळ केले आहे, त्याचप्रमाणे सचिननेही आपले स्वतःचे स्थान केलेलेच आहे.
अनेकानेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. कित्येकांना त्याने क्रिकेटचा आनंद दिला आहे. अनेकांना त्याने क्रिकेटकडे वळवले आहे.
त्याचे नाव व किर्ती पुढे शतकानुशतके राहो.
सचिनच्या या मुलाखतीमध्ये हे विधान जरी केलेले असले तरी या मुद्द्यावर बरेच विचार व्यक्त केले आहेत. त्यातून मुख्य संदेश निघतोय की सचिनने सार्वजनिकरीत्या प्रथमच उघडपणे मान्य केले आहे की आता निवृत्तीबद्दल अधिक गांभीर्याने विचार करायला हवा.
पण त्याचा अर्थ हा नक्कीच नाही की लौकरच सचिनची निवृत्ती बघायची वेळ येईल. त्याने अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की या घडीला निवृत्तीबाबत ठाम असे काहीच नाही. यापुढील प्रत्येक मालिकेनंतर त्या मालिकेतील कामगिरीचे मूल्यांकन करून तो निवृत्तीबाबत निर्णय घेईल.
त्यामुळे या भावना आजच मांडणे घाईचे ठरेल असे वाटते. बाकी तो जेव्हाही निवृत्त होईल ती घटिका क्रिकेटप्रेमींसाठी क्लेशदायक असणारच.
सचिन बरोबरच खालील लोकानीही निवृत्त व्हावे.
मनमोहन सिंग
लालकृष्ण आडवाणी
शरद पवार
सुशिलकुमार शिंदे
मुरली मनोहर जोशी
सोनिया गांधी
मनोहर जोशी
व राज्य शकट तरूणांच्या हातात द्यावे.
अरे देवा म्हणजे पुन्हा एकदा ते सांख्यिकी विश्लेषणे,वय वर्षे २.४५६ पासुनचे फोटो, आणि बरंच काही पुन्हा एकदा मिडियावाले आदळणार, आणि काही वर्षानी हाच महान माणुस मॅच फिक्सिंगच्या केंद्रस्थानी होता याची चर्चा करणार. चला गॅस डिझेल दरवाढीप्रमाणे सामान्य जनता या नात्यानं तयार राहिलंच पाहिजे,
"You either die a hero, or you live long enough to see yourself become the villain".
-Harvey Dent (The Dark Knight (2008))
गलबलतंय उगाच.. आता हे असं होतच असतं.. बादवे, विराटने तुलनेत त्याच्या वयाच्या कुठल्याही खेळाडूपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं वाचलंय.. म्हंजे नवा सूर्य तोच का?
ऊन्मुक्त चंद .....
>>हि बातमी वाचली आणि डोळ्यात टचकन पाणी आले...
हे वाक्य वाचले आणि जुन्या मालकांची आठवण येऊन भडभडून आले. मग डोळे डबडबले.. मग कंठ दाटून आला... मग अश्रुधारा वाहू लागल्या... मग भोकांड पसरले... मग ढसाढसा रडलो... मग ओक्साबोक्शी रडलो......
त्यानंतर.. जाऊदे मरो, कंटाळा आला.
In reply to >>हि बातमी वाचली आणि डोळ्यात by विश्वनाथ मेहेंदळे
बाकी भारतीय लोकांना स्त्रिभृणहत्या करताना किंवा शेतकर्यांच्या आत्महत्या बघताना काही वाटत नसो, पण असल्या बातम्या वाचल्या की डोळ्यात टचकन पाणी येतं!
In reply to >>हि बातमी वाचली आणि डोळ्यात by विश्वनाथ मेहेंदळे
आय पी एल मधले कितीसे करोड रुपये त्यात किती शून्य असतात ती आधी मोज बघू विमे, म्हणजे तुला रडू येणार नाही हां! त्याचा पण कंटाळा आला तर दुसरं काम नंतर सांगते. ;)
In reply to >>हि बातमी वाचली आणि डोळ्यात by विश्वनाथ मेहेंदळे
:D
त्याने आय पी एल खेळू नये
म्हणजे अजून काही काळ कसोटी क्रिकेट खेळता येईल.
मुकेश भाईने मोठे मन करून त्याला करारातून मुक्त करावे
पैसा वसुलीसाठी ह्या ना त्या मार्गाने त्यास संघाशी निगडीत ठेवावे पण मैदानात उतरवू नये.
आय पी एल क्रिकेट नसून बिग बॉस सारखा करमणुकीचा कार्यक्रम आहे.
In reply to त्याने आय पी एल खेळू नये by निनाद मुक्काम …
आय पी एल क्रिकेट नसून बिग बॉस सारखा करमणुकीचा कार्यक्रम आहे.> - अगदी अगदी... पहिल्या पर्वापासूनच आयपीएलचा वीट आलाय नुसता. काय ते पूर्वी पहाटे उठून द्रविड / सचिन ने गाजवलेले ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड दौरे बघणे, अन् काय हे आयपीएल!
शेवटी माणुसच !
भावी , नवोदीतांनी आत्तापासूनच सचिन च्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख तय्यार ठेवावेत ..
चांगला टीआर्पी मिळेल
In reply to लेख तय्यार ठेवा by कपिलमुनी
कित्येकांनी तर ते दशका पासून तयार ठेवलेत आहात कुठं मुनीवर्य? ;)
लाडका सचिन...!