ह्या कन्नडीगांना आलाय माज
In reply to बीदर-भालकी-कारवारसह... झालाच पाहिजे by विसुनाना
आजच 'द हिंदू' या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार बेळगावी विधानसभा सभागृहाचे बांधकाम महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीने विक्रमी वेगाने पूर्ण केले आहे (एका वर्षात) असे कळते. त्यांचे हार्दिक अभिनंदन करावे किंवा कसे?
मला वाटतं अभिनंदनच करावं, मराठी माणसांच्या भावनांचा इतका व्यवस्थित 'चोळामोळा' मराठी माणसाशिवाय कोणीही करु शकत नाही. :) -दिलीप बिरुटेIn reply to आजच 'द हिंदू' या दैनिकात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीने विक्रमी वेगाने पूर्ण केले आहे (एका वर्षात) असे कळते. त्यांचे हार्दिक अभिनंदन करावे किंवा कसे?
शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीचे अभिनंदनच करायला हवे...
असो खालची लिंक वाचुन झाल्यावर कोणाचे कोणी आणि का ? अभिनंदन करावे ते सांगता येईल का ?
बेळगाववासी जनतेनी देखील बातमी आवडीने पहावी,म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग लक्षात येईल !
http://216.15.199.42/dainiksaamana/epaperimages/15102012/15102012-md-hr-7/1035580.JPGIn reply to भावना पोहचल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कॉलिंग जहालभाषाचिकित्सक by सस्नेह
In reply to हम्म... बेळगाव पाकिस्तानात by नाना चेंगट
In reply to या.... कुठे होतं इतक्या दिवस. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to या.... कुठे होतं इतक्या दिवस. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to या.... कुठे होतं इतक्या दिवस. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हम्म... बेळगाव पाकिस्तानात by नाना चेंगट
बेळगाव पाकिस्तानात गेले असते तर असेच वाटले असते का हो?म्हणजे कर्नाटक राज्य पाकिस्तानप्रमाणे आपला शत्रू आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? बेळगावात मराठी लोक बहुसंख्य असतील तर ते शहर महाराष्ट्रात यायला हवे असे सगळ्यांनाच वाटते पण तरीही पूर्ण काश्मीर भारतात नाही (आणि पाकड्यांनी आपल्या काश्मीरचा बराच भाग गिळला आहे) याचे दु:ख आम्हाला जितके होते तितके दु:ख बेळगाव महाराष्ट्रात नाही याचे नक्कीच होत नाही. कारण कितीही काहीही झाले तरी आपण सगळे भारतीय आहोत. इथे काही कारण नसताना पाकिस्तानचे नाव तुम्ही आणल्यामुळे कर्नाटक राज्य आपले शत्रू आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे असा कोणी अर्थ काढला तर त्यात काय चुकले? बेळगाव महाराष्ट्रात नसल्यामुळे कर्नाटक राज्य तुम्हाला शत्रू वाटत असेल पण इतरांना तसे वाटायचे काही कारण नाही.
In reply to हम्म... बेळगाव पाकिस्तानात by नाना चेंगट
In reply to दफोराव का उगाच त्रास करुन by मदनबाण
मला सांगा इतकीच दगडफेक करण्याची खाज होती... तर तिकडे बेळगावात जाउन करुन दाखवायची होती ना+१. सीमाप्रश्नासाठी 'आम्ही रक्त सांडले' असे बा.ठा. सारखे म्हणत असतात सामनातून. कर्नाटकात गेली ४ वर्षे त्यांच्या मित्रपक्षाचे सरकार आहे. त्या पक्षाचे अध्यक्ष मराठी आहेत. मग त्यांना मातोश्रीवर बोलवून का नाही दम भरत? सीमाप्रश्न केव्हाच ईतिहासजमा झाला आहे.ऐतिहासिक दस्ताऐवज बघितलेत तर बेळगाव कन्नड संस्कृतीला अधिक जवळ आहे.मुंबईत गेले २०० वर्षे असंख्य गुजराती असले तरी मुंबई गुजरातची होत नाही.तसेच येथे आहे.केवळ मराठी बहुसंख्य म्हणून महाराष्ट्रात पाहिजे ह्या मागणीला अर्थ नाही. किर्लोस्कर रस्ता/टिळक वाडी/सोन्या मारुती/शिवाजी नगर्/रानडे कॉलनी अशा अनेक भागांची जशीच्या तशी ठेवली आहेत्.म्हणून स्थानिक कन्नड जनतेचे आभार मानायचे की कन्नडीगांना माज आलाय म्हणून ओरड करायची?
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to असलीच बदललेली मतांच्या by पाषाणभेद
In reply to असलीच बदललेली मतांच्या by पाषाणभेद
In reply to असलीच बदललेली मतांच्या by पाषाणभेद
मग बेळगाव नगरपालीकेने १९५६ मध्येच महाराष्ट्रात राहण्याचा केलेला ठराव का दडपला गेला?माझ्या माहितीप्रमाणे राज्यांच्या सीमा ठरवताना खेडे हा घटक मानून सलगतेच्या दृष्टीने सीमा ठरविल्या गेल्या होत्या. निपाणीमध्ये आणि बेळगावमध्ये मराठी बहुसंख्या आहे हे मान्य.पण आजूबाजूच्या कन्नडबहुल प्रदेशात जर निपाणी आणि बेळगाव ही मराठी बेटे असतील तर मात्र अशी बेटे महाराष्ट्रात सामील होऊ शकणार नाहीत. निपाणीहून बेळगावही ७०-८० किलोमीटरवर आहे.मधल्या खेड्यांमध्ये लोकसंख्येचे भाषिक वर्गीकरण कसे आहे याविषयी माहिती आहे का? याच न्यायाने अक्कलकोट हे महाराष्ट्रातील इतर मराठीबहुल प्रदेशातील कन्नड बेट झाले आणि त्यामुळेच अक्कलकोट कर्नाटकात सामील होऊ शकले नाही/शकणार नाही. तेव्हा अनुक्रमे बेळगाव आणि अक्कलकोट पालिकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात सामील व्हायचे ठराव पास केले तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही.(ही सगळी माहिती मिपावरच जुन्या कोणत्यातरी चर्चेत वाचली आहे. मी गेल्या चार वर्षांमधील मिपावरील सगळ्या चांगल्या चर्चा वाचल्या आहेत).
महाजन आयोगाची बेजबादार विधानेच का ग्राह्य धरली जात आहेत?ही विधाने बेजबाबदार आहेत असे मराठी म्हणून आपल्याला वाटत असेल पण कायद्याच्या दृष्टीने ती विधाने बेजाबदार आहेत का?
सीमाप्रश्नाचे आंदोलन नेहमीच शांततेचे असतांना तेथील जनतेची टाळकी पोलीसांकडून का फोडली जातात?याचे अजिबात समर्थन होऊ शकणार नाही.
लहाणपणी जे शिकतो ते लक्षात राहते. ती मते पक्की बनत जातात.नाही हो. या बाबतीत अगदी पूर्णपणे असहमत.लहानपणी इतरांचे ऐकून पोपटपंची करून तिच आपली ठाम मते आहेत असे अनेकांना वाटत असते.पण मोठे झाल्यावर, जास्त अनुभव घेतल्यावर, जास्त जग बघितल्यावर या तथाकथित ठाम मतांना चॅलेन्ज नकळत केले जाते (आणि असा विचार करणे हेच मॅच्युअर झाल्याचे लक्षण आहे) आणि मग या मुळातल्या ठाम मतांच्या अगदी विरोधी मते बनतात हे अनेकदा बघायला मिळते. घरच्यांच्या प्रभावामुळे मी पण एकेकाळी महात्मा गांधींना टकल्या वगैरे म्हणत असे. माझा जन्म गांधींच्या जन्मशताब्दी वर्षातला.आणि नेमक्या त्याच वर्षी माझा जन्म का झाला असे मला कित्येक वर्षे वाटत असे.एकेकाळचा मी अत्यंत कटटर भारतीय संस्कृतीवाला होतो.तीच मते माझी आजही असती तर मलाही इथे धर्ममार्तंड म्हटले गेले असते.साधारणपणे कॉलेजातून बाहेर पडून नोकरीला लागायची वेळ आली (अयोध्या आंदोनलनाच्या पूढेमागे) तेव्हा हळूहळू माझी मते बदलत गेली. आणि आता पूर्ण विरूध्द मते आहेत. तेव्हा लहानपणची मते ठाम असतात हे मी स्वतः माझ्याच उदाहरणावरून अजिबात मान्य करणार नाही.
In reply to -१ by पुण्याचे वटवाघूळ
In reply to असलीच बदललेली मतांच्या by पाषाणभेद
भले तुम्ही बंगलोरला नोकरी करत असाल पण तेथे तुम्ही मराठी शब्द ऐकले की तुम्हाला प्रसन्न वाटत असेल हे नक्की. उगाच नाही येथील ऑनलाईन मराठी साईटवर मन मोकळे करायला परदेशातूनही लोक येतात ते.काही नाही हो 'वेवलेंग्थ' जुळण्यासाठी भाषा खूप महत्वाची नाहीये. आणि मराठी-मराठीचं काय घेउन बसलात? सीमावासीयांच्या लढ्याला पाठींबा सोडा, आपल्या पुण्या-मुंबईतली लोकं आपल्या पोरांना मराठी मिडीयममध्ये घालायला तयार आहेत का ते सांगा? आणि परदेशी लोकांच्या तर..... ;)
In reply to चिल माडी सार! by दादा कोंडके
In reply to >>>>.....जर निपाणी आणि बेळगाव by पाषाणभेद
In reply to कोकणी ही मराठीची बोलीभाषा by बॅटमॅन
In reply to >>>कोकणी ही मराठीची बोलीभाषा by पाषाणभेद
In reply to >>>>.....जर निपाणी आणि बेळगाव by पाषाणभेद
गोवा आधी महाराष्ट्रात येणार होतो हे लक्षात घ्या.माझ्या माहितीप्रमाणे गोव्यात सार्वमत घेतले होते आणि सार्वमतात लोकांनी राज्य स्वतंत्र ठेवावे असा कौल दिला.त्यामुळे गोवा आधी महाराष्ट्रात येणार होते या बोलण्याला काय अर्थ आहे?आधी म्हणजे नक्की कधी?
सुरत, बडोदा, बर्हाणपुर झालंच तर म्हैसूर, ग्वाल्हेर आदी मराठीबहूल प्रदेश (तुमच्या भाषेत बेटे) काही मागत नाही आहोत.बर्हाणपुर चे माहित नाही पण वरील यादीतील इतर कोणत्याही ठिकाणी मराठी लोकांची बहुसंख्या नाही.बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर या ठिकाणी मराठी लोक बरेच असले तरी बहुसंख्य नक्कीच नाहीत.त्यामुळे तुम्हाला ही शहरे महाराष्ट्रात सामील व्हावी असे लाख वाटत असले तरी ते शक्य नाही.
त्यांच्या पराकोटीच्या भाषाभिमानाचा त्रीव निषेध. (किंवा तसला भाषाभिमान आपण कधी जपायला शिकणार?)म्हणजे आपलाही तीव्र निषेध कधी होणार याची वाट बघत आहात का? बेळगाव महाराष्ट्रात यावे हे मलाही वाटते.पण आपला वाद आपल्याच लोकांशी आहे कोणा परक्याशी नाही हे विसरून चालायचे नाही.तेव्हा महाराष्ट्र सरकार कोर्टात गेले आहे तो मार्ग योग्य आहे आणि त्याच मार्गाने जाही, उगीच बंद, तोडफोड करून आपल्याच मालमत्तेचे नुकसान करू नये. कर्नाटक सरकार बेळगावमध्ये दुसरे विधानभवन बांधत आहे ही माहिती महाराष्ट्र सरकारला किंवा कोणालाच नव्हती का?ती माहिती असेल तर वेळीच कोर्टात जाऊन त्या बांधकामाला स्थगिती मिळवायचा प्रयत्न का झाला नाही? एकीकरण समितीकडे समजा कोर्टात जायला पैसे नसतील पण राज्य सरकारकडे तर होते किंवा शिवसेनेकडे तर होते. मग तो प्रयत्न का झाला नाही?की कर्नाटक सरकारने एका रात्रीत बांधकाम उरकले?
In reply to समजले नाही by पुण्याचे वटवाघूळ
In reply to हम्म by पैसा
ते खरे मराठी भाषेचे प्रेमी. आमच्यासारखे आंजावर चर्चा करत बसत नाहीत. की मराठीचा उद्घोष करत स्वत;च्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालत नाहीत.
१००% सहमत !
जर कर्नाटक सरकार बेळगाव आणि इतर भाग त्यांचा आहे असा दावा सांगुन कानडीची सक्ती करत असेल तर त्यात त्यांचे काय चुकले ? महाराष्ट्रात मराठी शाळांची दुरावस्था सगळ्यांना माहित आहे.मध्यंतरी असेही वाचनात आले होते की मुलींच्या शाळेत स्वच्छतागॄहेच नाहीत !‘अशा शाळांपेक्षा जनावरांचे कोंडवाडे बरे’
तेव्हा कर्नाटकात लोक सुखी आहेत यात काही तथ्य नसावे.
जरा हे देखील वाचावे मग... महाराष्ट्रात दुष्काळ हटत नसेल तर कर्नाटकात जाण्यात गैर काय?In reply to हम्म by पैसा
त्याच वेळी सरसकट कानडी सामान्य लोक वाईट असेही म्हणवत नाही. कितीतरी चांगले कानडी लोक भेटले आहेत.लोकं वाईट नसतात. स्वार्थी राजकारणी प्रत्येक घटनेला, विचारांना वेगळा रंग देऊन हेच सत्य आहे असे सतत भासवत राहतात. ह्या क्लुप्तीला अनेक सर्वसामान्य फसतात आणि दोन प्रदेशात वैमनस्य निर्माण होतं.
In reply to पाभे तुमच्या भावना समजु शकतो. by इरसाल
In reply to अभिमान by मी_आहे_ना
In reply to हा हा हा by पाषाणभेद
In reply to मान्य by मी_आहे_ना
In reply to महाराष्ट्राने स्वतंत्र by नितिन थत्ते
महाराष्ट्राने स्वतंत्र विदर्भाची मागणी बोथट करण्याच्या उद्देशाने नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला, तिथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरते. साधारण तशीच कृती कर्नाटक सरकारने बेळगावी लोकांच्या मागणीला बोथट करण्यासाठी (बेळगावी लोकांचे लांगूलचालन करण्यासाठी असे म्हणत नाही) केली आहे. तिला माज म्हणणे आणि विधान भवन तोडून टाकू असे म्हणणे जरा जास्तच वाटते.शू...काहीतरी काय बोलता थत्तेचाचा. आम्ही मराठी आणि ते कन्नड. म्हणजे आमचे ते योग्यच आणि त्यांचे ते चुकीचेच.काय समजलात? (हा उपहास आहे हे सांगायलाच नको).
In reply to ಆದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ by बॅटमॅन
In reply to आदरे by चिरोटा
बाकी बेळगावी विधानसभा सभागृहाचे बांधकाम करणार्या महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या केवळ मराठी कंपनीला काम देण्याचा कर्नाटकी कावा दिसतोच्या मारी. काम दिले नसते तर- मराठीद्वेषामुळे ते काम शिर्केंना मिळाले नाही असे बोलायला आपण मोकळे होतो.काय?
In reply to महागाईने त्रस्त by मि.इंडिया
In reply to शिक्षणाचं माध्यम कोणतं by गवि
शिक्षणाचं माध्यम कोणतं याच्याशी मराठी भाषाप्रेमाची सांगड कशी घातली जाते असा प्रश्न नेहमी पडतो.अगदी अगदी.मला मराठी भाषा आवडते म्हणून त्या भाषेवरचे प्रेम दाखवायला शिक्षणही त्याच भाषेतून घ्यायला हवे हा अट्टाहास चुकीचा आहे. इंग्रजी भाषा अवगत असल्यामुळे भारतीयांचा किती फायदा झाला आहे हे चिनी-कोरियन लोकांशी बोलल्यावर समजते.आणि मराठी भाषेवर माझे प्रेम आहे याचा अर्थ इंग्रजी किंवा अन्य भाषांचा द्वेष किंवा विरोध आहे असा अजिबात नाही. खरं सांगायचे तर इंग्रजी भाषा परकी आहे असे अजिबात वाटत नाही.
तेव्हा पुढची करियर शास्त्र / इंजिनीअरिंग वगैरे मधे करायची असेल आणि कितीही मराठी माध्यमात शिकलेली चमकती उदाहरणं डोळ्यासमोर असतील तरी इंग्रजी माध्यमातच पोरांना शिकवावं.याला +१ खर्व किंवा +१ महापद्म. एकूणच या धाग्यामध्ये "आपण" विरूध्द "ते" हा सूर जाणवत आहे तो नक्कीच खटकतो.
In reply to +१ महापद्म by पुण्याचे वटवाघूळ
In reply to शिक्षणाचं माध्यम कोणतं by गवि
शिक्षणाचं माध्यम कोणतं याच्याशी मराठी भाषाप्रेमाची सांगड कशी घातली जाते असा प्रश्न नेहमी पडतो.किंचीत दुरुस्ती सुचवतो. इथं फक्त शिक्षणाचं माध्यम नसून शाळा इंग्रजी माध्यमाची असं हवं. मी सेमी इंग्रजी माध्यमतून शिकलोय. त्यामुळे शास्त्र आणि गणित वगळता इतर सगळ्या विषयांची पुस्तकं मराठी माध्यमातल्या सारखीच होती. त्यावेळी इंग्रजी माध्यमात शिकणार्याच्या मराठीचा पुस्तकात मराठी माध्यमातले तब्बल ४-५ वर्षे मागच्या इयत्तेतले धडे होते! आणि वर सगळेच विषय इंग्रजीतले असल्यामुळे मराठीचा संबंध फक्त घरी बोलली जाते म्हणून एव्हडाच उरतो. त्यांना वाचनाची गोडीच लागू शकत नाही. [हे बहुतांशानी खरं आहे. उगाच एक-दोन उदाहरणं तोंडावर फेकून मारू नयेत :)] वाचन-व्यासंग तर सोडाच पण इंग्रजी माध्यमातली मुलं त्यांच्या पालकां एव्हडं मराठी बोलतात तरी का? एका पिढीत होणारा एव्हडा बदल मराठीसाठी नक्कीच पोषक नाहिये. शेवटी काय, जवळ चांगली मराठी/सेमीइंग्रजी शाळा नाही म्हणून मग इंग्रजीचा पर्याय निवडला जातो (परदेशात तर तोही पर्याय नाही). आणि तो त्या पालकांचा प्रश्न आहे. त्यांनी स्वतःला सोईचं जातं/आवडतं म्हणून मराठी पुस्तकं लिहावीत/वाचावीत, कविता वाचाव्यात/कराव्यात, संकेतस्थळं काढावीत, संपादक व्हावं :) पण हे सगळं करतोय म्हणजे त्यांनी मराठी संवर्धनाचा झेंडा हाती धरलाय असं समजण्याचं मुळीच कारण नाही.
बीदर-भालकी-कारवारसह... झालाच पाहिजे