नायगरा आणि शिकागो...
नमस्कार मंडळी,
शुद्धलेखन इतके शुद्ध नाही आहे म्हणून क्षमा असावी...
पहिल्यांदाच अमेरिकेला येण्याचा योग आला आहे... आणि इथल्या जीवन शैली नुसार एका लांब सुट्टी च्या वेळी नायगारा आणि शिकागो जाण्याचा योग आला त्याचेच वर्णन देत आहे...
सर्वात आधी नायगारा ला गेलो... खरच निसर्गचा चमत्कार बघितल्याचा अनुभव आला...(असा बरेचसे ठिकाण बघितल्यावर येतो)...आम्ही अमेरिकेच्या दिशेनेच बघितला बारा का फक्त..(बरेच लोक लगेच विचारतात कॅनडा च्या दिशेने बघितला कि अमेरिकेच्या?? आम्ही तर दोन्ही कडून बघितले आहे बाबा... )
मैड ऑफ द मिस्ट... वरील बाजूने...
मैड ऑफ द मिस्ट... जहाजातून... खरच ह अप्रतिम अनूभव होता.. पहिली वेळ होति ना म्हनून...
अजून एक..दोन
रेनबो पूल... हाच तो जो अमेरिका आणि कॅनडा ला जोडतो...
दुसऱ्या दिवशी शिकागो ला आलो परतीच्या मार्गावरच आहे म्हणून...
२-पानोरामिक...
खालील सर्व चित्र आय फोन ४स वापरून काढले आहेत..
प्रसिद्ध आणि उंच सेअर्स टोवर... १४५० ft... बांधकाम विश्वातील एक चमत्कार
मनोऱ्यावरून शिकागो शहराचा नजारा....
वरतून खाली... चक्कर आली नाही कुणाला नशीब... नाहीतर तिकडे बायकांचा त्यांच्या शैलीत आरडा ओरडा चालूच होता...
तसा मी पदवीधर बरका, नाहीतर तुम्हाला वाटायचा आमची मंडळी पण वरील बायकांमध्ये समाविष्ट होती... :P
हे एक नवीनच पण छान होता... याचे रंग हळू हळू बदल्कायाचा... रंग बदलणाऱ्या कॅप्सूल म्हटला पाहिजे यांना ... पण शहराच्या शोभेला अजून शोभा दिली याने तिथल्या रस्त्यावर...
हा गोळा म्हणजे गम्मतच आहे... सर्वांना वेड लावतो...
मला भटकंती करायला जाम आवडत आणि बराच भटकत पण असतो पण तसा हा पहिलाच धागा टाकत आहे मिपा वर....
प्रतिसाद आणि सल्ला जरूर कळवा...
आभारी आहोत...
वाचने
9766
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
छान आलेत सर्वच फोटो.
सर्व छायाचित्रं मस्त आहेत. अभिनंदन.
फक्त छायाचित्रांचा आकार जरा लहान असावा. छायाचित्रं, सर्व सीमा ओलांडून, शेजारच्या रकान्यात (NAVIGATION, हॉटेलात आलेली माणसं आणि भाषा बदला) घुसून पार धुडगुस घालीत आहेत.
In reply to मस्त. by प्रभाकर पेठकर
एकदम धुडगुसच ;)
नायगराला रात्रीचे फायर वर्क होते म्हणुन आम्ही रात्रीच पोचलो ,पण कसचं काय ,वातावरणामुळे रद्द झाले होते .जाम थंडी होती . रात्रीच्या वेळी लाईटिंच्या झगमटातला सभोवतालचा परिसर आणि फॉल वर पडणारा साधारण फेंट पिंक कलर
म्हणजे डोळ्यांना थंडाइ पाजल्याचा तो मंत्रमुग्ध आभास .
मजा आली ...रात्रीचाहि मस्त दिसतो नायगरा फॉल .:)
In reply to मस्त. by प्रभाकर पेठकर
घुसून पार धुडगुस घालीत आहेत.
लय भारी... :D
आवडेश.
मिपावर स्वागत हो शेठजी.
अर्धवटराव
मस्त...खूप आवडले..
सगळेच फोटो झक्कास. मिपावर स्वागत.
बाकी तुम्हाला "मनोऱ्यावरून शिकागो शहराचा नजारा" असे म्हणायचे असावे, चुकुन नजराणा लिहिले आहे.
In reply to सगळेच फोटो झक्कास. मिपावर by मृत्युन्जय
धन्यवाद
आता ते बरोबर करून टाकला बरं का..
In reply to ............................. by अत्रुप्त आत्मा
चित्रांचा वापर मस्तच आहे...
आवडला बरं का.. तृप्त झालो... :)
तो खालून तिसरा फोटो कसा काय काढला?
In reply to तो खालून तिसरा फोटो कसा काय by कवितानागेश
तेथे एक जाड काचेची खिडकी आहे. तुम्ही त्यात उभे राहून (घाबरल्यानंतरही) अरे वा! कित्ती छान! असे म्हणण्याचा अनुभव घेउ शकता. ;)मला भिती वाटली. एक पाऊल ठेवून मी परत सुरक्षित भागात आले. ;) हे कबूल करायला अज्याबात लाज वाटत नाही. माझा पुतण्या व मुलगा त्या ठिकाणी गोंधळ घालत होते. दिवस मावळून शिकागोमधली विजेची रोषणाई बघूनच खाली येतात लोक (जर संध्याकाळी गेले तर).
सर्वच चित्रे जबरी. सुदैवाने दोन्ही ठिकाणी गेलो असल्याने मला अधिकच छान वाटले.
२ कॅमेरे वापरलेले दिसताहेत. नेमके कोणते?
लेक मिशिगनचाही एखादा फोटो हवा होता.
In reply to वाह!! by श्रीरंग_जोशी
नायगारा चे फोटोस आणि ते पानोरामा मित्राच्या साध्या डीजीकॅम ने काढले आहे..
मिशिगन ला जाईपर्यंत संध्याकाळ झाली आणि उशीर होत होता म्हणून सुटला हो.. परतीच्या वाटेवर असताना दुरूनच बघितला फक्त.. तसा अजून एक दौरा झाला तर नक्कीच बघेल..
चित्रं आवडली मला आवडलं ते आपला ''आय फोन ४स''
-दिलीप बिरुटे
आणि वर्णन पण अगदी बोलत असल्यासारखं केलंय. मस्त!
आमचे एक काका नायगरा पाहिल्यावर उद्गारले होते की आज गंगावतरण पाहिले!
नायगराचे इतकं समर्पक वर्णन, तेही एका वाक्यात, मी तरी अजून दुसरं ऐकलं नाहीये!!
रच्याकने -- उसगावात स्वागत :)
मस्त आहेत सगळे फोटो!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार... पहिला वाहिला प्रयत्न सफल झाला म्हणजे..
आता असा काही प्रकाशित करायला हरकत नाही... अजून चांगल्या प्रकारे प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन..
In reply to सर्वांचे आभार.. by दीपकशेठ
व्हय दीपुकाका जरुर करा :)
" धाग्यार्थी मिपेश्वर " :D
लै भारी!
फोटो सुरेख आले आहेत.
जमल्यास फोटो सोबत प्रवास वर्णन केले तर फोटोंची अजून खुमारी वाढेल.
छान आहेत सर्वच फोटो!!!!!!!
लै भारी!!!!
ZAKKASSSSSSSSSSSSSS!ASCHHA HUVA NAYGARA ME NAY GIRA..NAI TO HAMKU YE DEKHNE-PADNE KA ANAND KAISE MILTA BABA?
मस्त