छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.
माझ्या मागील लेखात जगदंबा आणि भवानी तलवार एकच असल्याचे नमूद केले होते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे.
जगदंबा तलवार-
उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण
हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली. (तलवारीच्या पात्यावर I.H.S. हि अक्षरे कोरली आहेत)
छत्रपतींना हि तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली किंवा खेमसावंता वर झालेल्या जप्तीत ती छत्रपतींना मिळाली.
तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील नोंद -
पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे
नोंदणी जीनस - जगदंबा तलवार
जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे
तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही
जगदंबा मेणावर
तपशील - नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १०
एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७
मिळून सबंध तलवार.
जगदंबा तलवार प्रतिकृती
चौथे शिवाजी - प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिल्याचे सांगण्यात येते.
भवानी तलवार - शिवछत्रपतींनी वापरलेल्या अनेक तलवारींपैकी हि एक, परमानंद नेवासकर कृत शिवभारत मध्ये "मी तुझ्या तलवारीमध्ये आशीर्वाद बनून राहीन" अश्या अर्थाचा श्लोक होता, त्याचे नंतर भवानी आईने तलवार दिली असे रुपांतर झाले.असो...
तर हि भवानी तलवार रायगड पडला तेव्हा झुल्फिकार खानच्या हातात पडली असावी.त्याचवेळी शाहू छत्रपती,येसूबाई राणीसाहेब व इतर लोक कैद झाले.औरंगजेबाने येसूबाई आणि शाहू महाराजांची विशेष बडदास्त ठेवली येसूबाई यांना स्वतः चा शिक्का व चरितार्थासाठी काही वतने दिली,तसेच शाहूंना "सरकार राजा शाहू " अशी पदवी दिली.
नंतरच्या काळात शाहू महाराज मोठे झाल्यावर औरंगजेबाने त्यांचे धर्मांतर करण्याचे ठरविले परंतु शाहू आणि येसूबाई राणी साहेबांनी त्यास विरोध दर्शविला त्यामुळे औरंगजेबाने तो विचार सोडून दिला आणि शाहूंचे लग्न बहादुर्शहा च्या मुलीशी लावले
त्या लग्नप्रसंगी औरंगजेबाने भवानी तलवार,अफझलखानची तलवार आणि काही रत्ने शाहूंना भेट दिली.नंतर हीच तलवार
शाहू महाराजांबरोबर सातार्यात आली,तीच तलवार सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर मध्ये आहे.त्यावर
'सरकार राजा शाहू' असे कोरले आहे.
तुळजा तलवार - तिसरी तलवार म्हणजे सिंधूदूर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदीरातील तुळजा फिरंग ही तलवार.सहजी महाराजांनी ती तलवार शिवाजी महाराजांना दिली असे सांगण्यात येते. यापैकी तिसरी तलवार असण्याची शक्यता इतिहास संशोधकांनी वर्तवल्यामुळे या तलवारीचं महत्त्व वाढलं आहे. या तलवारीला जतन कराण्यासाठी ती काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. तसेच पूजेसाठी तिची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
शंभूसाहित्य - छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषण या ग्रंथाची त्यांच्या हस्ताक्षरातील मूळ हस्तलिखित प्रत १ महिन्यापूर्वी मला उपलब्ध झाली
त्यानिमित्ताने या ग्रंथाची ओळख.लहानपणीच कवी कलश,महाकवी भूषण,गागाभट्ट यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा.ग्रंथाचा सुरुवातीला शहाजी राजे,शिवाजी राजे यांची स्तुती आहे.एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत.संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली
या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या.त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद
हे ग्रंथ उपलब्ध आहेत.मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला.(याचे संदर्भ मिळवीत आहे लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील ).
शंभूराजांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन गागाभट्ट यांनी 'समयनय' हा ग्रंथ त्यांना समर्पित केलेला आहे.
श्रीमदभौसल्वन्ष्भुषणे: शम्भोसितच्त्रप् ॥
स्वनन्दाय् सदा ,भवेदशिथिला किर्त्यै प्रसादाय ॥
-भोसलेकुळाचे भूषण असलेले शंभूराजे यांच्या आनंदास आणि कृपेस हा ग्रंथ पत्र ठरतो.त्यांना चिरंतन कीर्ती मिळो.
आज शंभूछत्रपतींचे शौर्य आणि त्यांची प्रतापशाली कारकीर्द अनेक लेखकांनी,इतिहास अभ्यासकांनी मांडली पण त्यांचे साहित्यही प्रकाशात येणे गरजेचे आहे.बुधभूषण चे पहिले पान रॉयल एशियाटिक सोसायटीच्या सौजन्याने इथे जोडत आहे. तेथील सद्य कर्मचारीवर्गाला सुद्धा हे साहित्य त्यांच्याकडे असल्याची कल्पना नव्हती,इतक्या लहान वयात शंभूराजांनी हा ग्रंथ लिहिल्याचे कळल्यावर तेथील लोक चकित झाले ,संभाजी राजांचे हस्ताक्षरपाहण्यासाठी संपूर्ण स्टाफ जमला होता.अभिमानाने उर भरून आला.
संदर्भ साभार - भवानी तलवार ब्लॉग
महाराष्ट्र टाईम्स
रॉयल एशियाटिक सोसायटी
औरंगजेबाचे अखबार
शिवकालीन शस्त्रे - पुरंदरे

वाचने
34812
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुपच महत्वपुर्ण माहिती
मालोजीरावांचा लेख.... म्हणजे
महाराजांना माझा मुजरा
दिल खुश झाला!
संभाजी महाराजांचा गोव्यावर हल्ला
In reply to दिल खुश झाला! by पैसा
उत्तम लेख
व्वा!
धन्यवाद किसनराव ! नवीन
In reply to व्वा! by किसन शिंदे
उपयुक्त आणि मोलाची माहिती.
बहादूरशहा मुस्लीम होता
In reply to उपयुक्त आणि मोलाची माहिती. by प्रचेतस
धन्यवाद सविस्तर
In reply to बहादूरशहा मुस्लीम होता by मालोजीराव
जबरी माहिती दिलित हो
In reply to बहादूरशहा मुस्लीम होता by मालोजीराव
माहिती बद्दल आभार. आणी
चांगली माहिती मिळतेय. वाचतोय.
वा मालोजी राव
उत्तम माहिती. सविस्तर
धन्यवाद बॅटमॅन, यासाठी दोन
In reply to उत्तम माहिती. सविस्तर by बॅटमॅन
अरे यार कमीतकमी ब्रूस वेन तरी
In reply to धन्यवाद बॅटमॅन, यासाठी दोन by मालोजीराव
धन्यवाद मालोजीराजे. गोवा
नावाचाच नाही तर मनाचाही राजा आहे !!!
In reply to धन्यवाद मालोजीराजे. गोवा by इष्टुर फाकडा
हे पहा
In reply to नावाचाच नाही तर मनाचाही राजा आहे !!! by मालोजीराव
त्यांची राहणीच अशी आहे
In reply to हे पहा by इष्टुर फाकडा
ह्म्म्म
In reply to त्यांची राहणीच अशी आहे by मालोजीराव
धन्यवाद !
लेख संग्राह्य आहे.
पुराणवस्तुसंग्राहलयात आजवर
बरीच पाती असलेली मुठीची तलवार
In reply to पुराणवस्तुसंग्राहलयात आजवर by मस्त कलंदर
छान
मोलाजीराव लेख आणि त्यातली
जबरदस्त!
प्रत्यक शब्द न शब्द जपुन
व्वा
भवानी तलवार
मालोजीराजे फार सुंदर लेख लिहिला आहात.
धन्यवाद निश
In reply to मालोजीराजे फार सुंदर लेख लिहिला आहात. by निश
महाबळेश्वर नव्हे ती तलवार
विजुभाऊ हो बरोबर.
मालोजीराजे, हो बरोबर मोहीते सरकारांची तलवार होती ती.
वा...
+११११ मालोजीराव झिंदाबाद!
In reply to वा... by मन१
अत्यंत रंजक, रोचक आणि प्रेरक
लेख मस्तच. मिपा सदस्यत्व
ढालीचे वजन जास्त असू शकते ,
In reply to लेख मस्तच. मिपा सदस्यत्व by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
रत्नजडित तलवारी
In reply to ढालीचे वजन जास्त असू शकते , by मालोजीराव
इथे वजनाविषयी छान माहीती आहे.