कायच्या काय
लेखनविषय:
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली
चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली
पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे
झोपी जाती काही काही मोजतात तारे
वकार युनुसचा काही भरवसा नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
सकाळी डोके दुखता हवा एक उतारा
जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा
ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
बाटलीधर,
वाचने
7805
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
=)) =))
_/\_
दंडवत स्वीकारा पैजारबुवा. :)
लै भारी रे आवडेश :) आमुचाही दंडवत घ्यावा ----^----
सलाम,नमस्ते.... हो आमचाही :)
ज्ञापैधरा....
उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
एवढे काय आहे हे ????
मस्त...
पण ओल्ड मॉन्कने डोके धरते हा आरोप करणार्या हुच्चब्रु प्रवृत्तीचा णिषेढ..
बुढ्या साधुचा भक्त..
शैलेंद्र..
बोट बुडाली धर लीला
(चतुर चाणक्य दूधभाते)
In reply to बोट बुडाली धर लीला by सूड
बुडतेय तर वाचीव ना काठावर बसुन टाळ्या आणि कमेंट्स काय टाकतोय्स रे ;)
जय हो , पैजारबुवा !
अगदी मोजून मारले आहेत हं पैजार !
साथिला कोका कोला हवा भाऊ..तो विसरलात
बॅट्या म्हणे ऐशा पैजारा |
वाहवा द्याव्या हजारा!!!!
कायच्या काय!! :D
"कै च्या कै!" पण मग साय चं पण सै करावं लागलं अस्तं की वो!
In reply to कै च्या कै! by पैसा
कै च्या कै सै म्हणजे ताम्हणकरांची का ओ पैसातै...
ओल्डमाँक ,लै जुन्या आठ्वनी जाग्या झाल्या.. :)
आय लव्ह एव्हरीथिंग दॅट इज ओल्ड,
ओल्ड बू़क ,ओल्ड वाइन्,ओल्ड फ्रेंड.. :)
विडंबन जमलय.
वकार युनुस..... :D
बाटलीधर