चान चान म्हणजे छान छान अजिबात नव्हे हे पहिल्या काही दिवसांत मला लक्षात आलं. "ब्वॉर्र" आणि "बरं" मधला फरकही नीट समजला. "मोठे व्हा" याचा आपण मोठे असण्याशी काही संबंध नाही वगैरे हळूहळू कळत गेलं तेव्हा जरा समजून प्रतिसाद वाचणं चालू झालं.
यात गंमत अशी आहे की आपल्याला बर्याच गोष्टी माहीत नाहीत, कळत नाहीत आपण भोट आहोत हे सिद्ध करणं बर्याचदा कठीण जातं. अमुक इतका जुना मेंबर आहे ना म्हणजे त्याला बर्याच "आतल्या" गोष्टी माहीत असणारच अशी समजूत असते. तुलनेत नव्या मेंबराला तर बर्याच प्रतिसादांतल्या चर्चा हाय कॉन्टेक्स्ट अतएव शिरोर्ध्वगामी पडतातच पण काहीशा जुन्या मेंबरालाही त्या भारीच पडतात. हे लोक एकमेकांना डोळे मारत किंवा टाळ्या देत नेमक्या कशाविषयी गूढवार्ता करताहेत याचे संदर्भ लागत नाहीत. अर्थातच त्यामागे काहीतरी जुना संदर्भ असतो आणि तो माहीत असलेले चारपाच लोक त्यावर काव्यशास्त्रविनोद करत राहतात. बरं, काय विषय म्हणून विचारावं तर "अभ्यास वाढवा"..
..मग अशा वेळी व्यनि हा जबरदस्त उपयोगी मार्ग आहे. ज्येष्ठांकडे व्यनिने पृच्छा केल्यास अनेक संदर्भ मिळतात आणि अभ्यास वाढतो.
"अभ्यास वाढवण्या"साठी कट्टा हे स्थान सर्वाधिक उपयोगी आहे. कट्ट्यावर चार भावंडे बसली की ती तो निर्जीव कट्टाही चालू पडतो याचं उदाहरण आंतरजालकालापूर्वी हजार वर्षांपासून आहे. मिपाभावंडांचा कट्टा जिथे बसतो तिथे आजुबाजूचे उठून चालू पडतात..कारण एकतर मिपाकर्स हा उच्चारवात तावातावाने चर्चा झोडणारा समूह असतो आणि त्यात ती चर्चाही महाभारतातल्या द्रौपदीपासून अहाभारतातल्या दारुपर्यंत कशावरही असू शकते. याउप्पर हे सर्व कट्टेकरी लोक जी काही नावं घेत असतात ती आम पब्लिकला शष्प कळत नसणार.. उदा. "अहो भासं लीमाउजेट नाही आली का तुमच्यासोबत, माझीही शॅम्पेन येतोय पाच मिण्टात.. आज मालकही येणार आहेत का, अरे वा.... विमे आणि स्पावड्या तुम्ही त्या साईडचं टेबल पकडा म्हणजे प्रास आणि गवि दोघांना मोठ्या खुर्च्यात बसवता येईल.." वगैरे..
रामदासकाका हे मुंबई ठाणे पट्ट्यातल्या मिपाकट्ट्यांची जान आणि शान.. हे आले की कट्टा एकदम जिवंत होतो. मुंबई शहराची बखर, टाईमटेबल, यलो पेजेस आणि विकीपीडिया असे सर्व मिळून एकग्रंथ असलेले रामदासकाका. भंगारातल्या धातूंपासून ते शेअरबाजारापर्यंत आणि कवितेपासून ते कोणत्या ग्यांगस्टरने कोणत्या हॉटेलात किती साली काय राडा केला इतपर्यंत थरारक कहाण्या त्यांच्या रसपूर्ण कथनशैलीतून बाहेर येतात. कट्ट्याचे कथेकरीबुवाच ते..शिवाय कुठेही पुस्तकप्रदर्शन वगैरेमधे गेले असले की त्यांना सर्व कट्टेकर्यांच्या आवडीनिवडी नीट लक्षात असतात. एखाद्या पुस्तकाने लक्ष वेधलं की ते नेमकं कोणत्या मिपाकराला रोचक वाटेल हे ओळखून ते घेऊन टाकतात आणि कट्ट्याला त्या सदस्याच्या हाती देतात.
मिसळपावचा सध्याच्या बॅनरखेरीज एखादा प्रतीकात्मक लोगो बनवायचा झालाच तर एका बाजूला चमचा (खाण्याचा चमचा.. चमचेगिरीशी प्रतीकात्मक संबंध नाही..) आणि दुसर्या बाजूला लेखणी असं काल्पनिक आयुध चितारावं लागेल. मिसळपाव या नावापासूनच मिपाकरांचं खाण्यापिण्याविषयीचं ममत्व दिसतं. बर्याचदा प्रवासवर्णनामधे हिमाच्छादित वर्णनांपेक्षाही तिथल्या बर्फाळ थंडीत चरचरत्या तव्यावरचे गरमागरम आलू पराठे आपल्याला कसे हादडायला मिळाले हेच आधी सांगणारे मजसारखे समानधर्मी इथे भरले आहेत. आजुबाजूची शीनशिनरी फक्त खाद्ययात्रेला "ब्याकग्राउंड" म्हणून असते यावर इथे अनेकांचा गाढ विश्वास आहे. जनातलं मनातलं किंवा काथ्याकुटाइतकाच, किंवा कणभर जास्त पण कमी नाही असा प्रतिसाद पाककृती विभागाला नेहमी मिळालेला आहे.
या पाककृती विभागाचीही गंमतच आहे. पोहे, उपमा वगैरे अशा अगदीच रोजच्या पदार्थांच्या पाककृतीही एक नवा पदार्थ असल्याप्रमाणे येतात. आणि त्यावरही आपले लोक्स "उपमा शब्द बरोबर की उप्पीट", "उप्पीट की उप्पीठ.. ", "उपमा आणि तिखट सांजा यातले फरक","पोहे म्हणजे महाराष्ट्राची देणगी की इंदूरची अस्मिता.." असे अनेक विषय चाखून त्या पाककृतीतच काथ्याकूट विभाग निर्माण करतात. तोंपासु, विकांताला करुन पाहणार, अंडे न घालता कसे करता येईल, अंडे घालून करता येईल का? वगैरे प्रश्न सटासट येतात. त्यावरही "अंडे घालून तुम्हाला किती वेळ झाला आहे त्यावर ते अवलंबून आहे" अशी प्रत्युत्तरं येऊन "जनाची नाहीतर मनाची.." असा नवीन लेखनविभागही तिथे सुरु होतो.
उपमा पोहे हा एक प्रकार झाला. पण कधीही न ऐकलेल्या अनवट रेसिपीजसुद्धा इथे मिपावरच मिळतात. "चिमीचांगा" म्हणजे काय असेल बुवा असा मला नुसता प्रश्न पडला तेव्हा प्रतिक्रिया म्हणून मिपावरच्या साग्रसंगीत "चिमीचांगा" पाककृतीची लिंकच कोणीतरी डकवली. घ्या..
धाग्यांवरचे प्रतिसाद हे एक उपनिषद आहे. यावर काय आणि किती बोलावं. काहींच्या मते कंपूबाजी करुनच प्रतिसाद मिळतात. काहींच्या मते चांगल्या लिखाणाला प्रतिसादच मिळत नाहीत. एखाद्या धाग्याचे ठरवून बारा वाजवले जातात (बाजार उठवला जातो) असंही एक मत आहे. शिवाय अजून एक पेश्शल इफेक्टही असतो. एकदा पहिला प्रतिसाद आला की त्याच्या दिशेने पुढचे प्रतिसाद येतात असं काहीवेळा दिसतं.
पहिला प्रतिसाद "जम्या नही" असा आला की दुसरा:
"+१ नेहमीचं पहिल्या धारेचं लिखाण वाटलं नाही.."
मग :
"+३ अजून रंगवता आला असता.."
अशी लाईन सुरु होते.
याउलट पहिलाच प्रतिसाद:
"भन्नाट.. जमून आलं आहे.." असा आला की:
"+१.. अमुक अमुक रॉक्स.." ,
"+२ लई भारी"
"+३ और ये लगा सिक्सर.."
अशी मालिका सुरु होते.
या सर्वाबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रतिसादच लेखकाला हजार हत्तींचं बळ देतात. अंगावर मूठभर नव्हे, मणभर मांस चढवतात, छाती फुगते, कॉलर टाईट होते..
याठिकाणी मी एक गोष्ट आधीच स्पष्ट करु इच्छितो की स्वान्तसुखाय लिखाण याचा अर्थ लिखाणातून आनंद मिळणं इतकंच मला अपेक्षित आहे. याचा पुढचा अर्थ म्हणजे स्वतःला आनंद मिळाला की बास.. प्रतिसाद आले न आले.. काही फरक पडत नाही.. असा नव्हे.
लोकांनी वाचावं म्हणूनच लिहिलेलं असतं हे मी प्रामाणिकपणे सांगतो. "वाचक" हा एकमेव मूळ ड्रायव्हिंग फॅक्टर लिखाणाला ऊर्जा देत असतो.. माझ्या बाबतीत तरी. त्यामुळे प्रतिसादांची इच्छा आणि आवड ही लेखकाची मूलभूत वृत्तीच आहे यावर माझा विश्वास आहे. वाचक आहेत म्हणून मी आहे.. माझ्यामुळे वाचक नाहीत. यात बेगडी नम्रपणा नसून जमिनीवरचं वास्तव आहे.
बर्याचदा या प्रतिसादप्रेमाला प्रतिसादलोलुप किंवा तत्सम नावं ठेवली जातात. आपलं लिखाण अनेकांनी वाचावं, त्यावर प्रतिक्रिया भरभरुन याव्यात अशीच इच्छा लेखकाची असते आणि असावी. वाचकाला आपल्या लिखाणात समाविष्ट न करुन घेता लिहिणारे "स्वान्तसुखाय" लेखक आपलं लिखाण लिहिण्याचा आनंद मनसोक्त उपभोगून मग ते स्वतःच्या फडताळात ठेवून का देत नाहीत ? प्रकाशित करण्याचा कष्टमय मार्ग का निवडतात? असा प्रश्न पडतो.
(अपूर्ण...)
वाचने
24460
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट.. जमून आलं आहे..
त्यावरही "अंडे घालून तुम्हाला
बाकी हा भागही फक्कड. बरचसं
In reply to त्यावरही "अंडे घालून तुम्हाला by गणपा
एवढा प्रामाणिकपणा आणि तो ही
In reply to बाकी हा भागही फक्कड. बरचसं by किसन शिंदे
मस्त
मुंबई शहराची बखर, टाईमटेबल,
In reply to मस्त by नंदन
मस्त
सही
+१
In reply to सही by मी_आहे_ना
जम्या नही
काय मनोबा...
In reply to जम्या नही by मन१
वैयक्तिक...वैयक्तिक!!!!!! समज
In reply to काय मनोबा... by मोदक
तंतोतंत जमून आलंय!
एकदम भारी. तुमचं लेखन वाचतच
छान की...!
बर्याचदा या प्रतिसादप्रेमाला
मी एका प्रतिसादात अन्यत्र
In reply to बर्याचदा या प्रतिसादप्रेमाला by चिगो
ह्हांगाशी
In reply to मी एका प्रतिसादात अन्यत्र by गवि
आशिर्वादलोलुप किंवा
In reply to मी एका प्रतिसादात अन्यत्र by गवि
शब्दप्रसवबाहुल्य आवडल्या गेले
In reply to मी एका प्रतिसादात अन्यत्र by गवि
(कुंतलत्वग्विच्छेदक) मान गये.
In reply to शब्दप्रसवबाहुल्य आवडल्या गेले by बॅटमॅन
शंका
In reply to शब्दप्रसवबाहुल्य आवडल्या गेले by बॅटमॅन
बाल
In reply to शंका by प्रास
गलविच्छेदक कुंतल मान गये
In reply to शंका by प्रास
पुन्हा एकदा लई भारी, अवांतर -
झकास!
+१
In reply to झकास! by परिकथेतील राजकुमार
मस्त - बुकात दत्त बुक कव्हर दत्त
गवि साहेब लेख मस्त लिहिला आहात.
मस्त मस्त
मस्त!
जोपर्यंत लेखाच्या शेवटी
In reply to मस्त! by पैसा
छान छान!
हा ही भाग खासचं
छान. हे लेखनही आवडले.
(No subject)
भारीच..
विविध
सही!
झक्कास! आधि लेखाच्या खाली
छान छान.
वाचतोय. पुभाप्र.
गवि गवि
खीखीखीखूखूखू
हम्म..
फ क्क ड!!!
खूप मस्त !
गवि, मागचा भाग जास्त चांगला
मझा आहे हो तुमच्या लेखणीत !
अपूर्ण
उत्तम
छान वाटले वाचुन
मिपागाथा जबरी झाली
गवि, आज खुप खुप खुप दिवसानी