मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुरनळ्या

ज्योति प्रकाश · · पाककृती
साहित्यः-एक वाटी जाडे तांदूळ(शक्यतो जुने असावे) एक वाटी आंबट ताक मूठभर पोहे एक वाटी खवलेला नारळ पाव चमचा हळद अर्धा चमचा मेथी दाणे. गूळ चवीप्रमाणे मीठ तूप. कृती :- तांदूळ धुऊन घ्यावे.मेथी व ताक घालून ४-५ तास भिजत घालावे.बारीक वाटून घ्यावे. नंतर त्यात खवलेले खोबरे,पोहे,मीठ्,हळद व गूळ घालून १०-१२ तास झाकून ठेवावे.तव्याला अथवा फ्राय पॅनला तूप लावून जाडसर पीठ पसरावे.जाळीदार सुरनळ्याच्या कडा तांबूस झाल्या की न उलटता काढाव्या.पीठ तव्यावर पसरले की वर झाकण ठेवावे म्हणजे वरील बाजू पण शिजेल. गरम असतानाच तुपाबरोबर खायला द्यावे. (ह्याचप्रमाणे उसाच्या रसाच्या सुरनळ्या पण करतात्.त्यात ताकाऐवजी तांदुळ रसात भिजत घालावे.बाकी कृती वरिलप्रमाणे).

वाचने 5623 वाचनखूण प्रतिक्रिया 10

पैसा Sun, 09/02/2012 - 21:41
मस्त आवडता पदार्थ! जाळी पण अप्रतिम पडलीय आणि या सुरनळ्या अशा जरा खरपूस मस्त लागतात. तुपाऐवजी नारळाच्या रसात गूळ घालून त्याबरोबर पण चांगल्या लागतात.