मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(काय राव सांगू)

सूड · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काय राव सांगू, कसं मी सांगू? 'पुण्यास भारी आहे माज' काडी अशी सारुन आलोय आज उगीच पिऊनी आलो फूल उगीच मनाला पडली भूल कळफलकाचा अन् शब्दांचा दावियला मी भलता बाज काडी अशी सारुन आलोय आज जरी झिंगलो मारुन 'नीट' लिहीत राहिलो होऊन धीट जमली सारी पोरं कशी ही प्रतिसादांची घुमते गाज काडी अशी सारुन आलोय आज सहज बोलूनि फसलो मी उगाच बरळत बसलो मी पंख लागूनि गेला धागा नाहि चालला काही ईलाज काडी उगा सारुन आलो आज

वाचने 6611 वाचनखूण प्रतिक्रिया 20

पैसा Fri, 08/31/2012 - 23:06
सगळ्या मात्रा मोजून घेतल्या. परफेक्ट्ट!