कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे.
खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही. नीबीड आणि वनश्रीने नटलेल्या गर्द रानवाटेवरून अनेकदा गेल्यानंतर हळूहळू त्या वाटेवरची दडलेली सौंदर्यस्थळे आपल्या लक्षात येऊ लागतात त्याप्रमाणेच बर्याच कविता या पुनर्वाचनानंतर हळूहळू उलगडू लागतात हा अनुभव आहे. जणू काही कवितेला, एखाद्या स्तोत्राला देखील सूक्ष्म"सेल्फविल" (स्वेच्छा) असते. जेव्हा तिला , आपल्यापुढे पूर्ण सौंदर्यानिशी साकार व्हावयाचे असते तेव्हाच ती साकार होते.
रामरक्षा हे स्तोत्र (कविता) बुधकौशिक ऋषींना स्वतः शंकरांनी स्वप्नामध्ये सांगीतले आणि बुधकौशिक ऋषींनी ते आठवेल तसे प्रातःकाळी लिहून काढले असा उल्लेख या स्तोत्रांत आहे. मी लहानपणापासून कितीदा तरी रामरक्षा ऐकली, पठण केली. परंतु खूप उशीरा मला या स्तोत्रांतील काही संदर्भ लागले. जसे - जिव्हां विद्यानिधी: पातु, कण्ठं भरतवंदितः, स्कंधौ दिव्यायुधः पातु या काही ओळी. माझ्या जिव्हेचे रक्षण विद्येचा ठेवा (निधी) करो यामध्ये विद्या आणि जिव्हा हा संबंध भेदक आहे. राम-भरत भेटीमध्ये रामचंद्रांनी , भरतास कडकडून मीठी मारली आणि असा हे भरतास वंदनीय श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो हा गळाभेटीचा आणि कंठाचा अन्वय किती मनोहर आहे. माझ्या स्कंधाचे रक्षण दिव्य आयुधे (खांद्यावर धनुष्य) धारण केलेले प्रभू रामचंद्र करोत. - या प्रत्येक अवयव आणि नामाच्या जोडीमधील अन्वय (संबंध) माझ्या लक्षात आला. करौ = सीतापती: (सीतेचे पाणिग्रहण केलेले राम), शृती = विश्वामित्रप्रियः वगैरे.
तीच गोष्ट विष्णूशोडषनाम स्तोत्राची - भोजने च जनार्दनं (सर्व जनांचे पालन करणारा), विवाहे तु प्रजापतीम (प्रजेचा नाथ), युद्धे चक्रधरं देवं या ओळीत पहा युद्धात रक्षण करण्यासाठी पद्महस्त वगैरे नावाने आठवण न काढता सुदर्शन चक्रधारी रुपाची आठवण काढली आहे. प्रवासे च त्रिविक्रमम (तीन पावलांत पृथ्वी व्यापणारा), संकटे मधुसूदनम (मधु राक्षसाचा वध करणारा), कानने नारसिंहं च म्हणजे वनामध्ये रक्षण करण्यास साक्षात नरसिंह रूप आठविले आहे, पावके जलशायिनम म्हणजे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी क्षीरसागरामध्ये शयन करणार्या रुपाचे चिंतन आहे. प्रत्यक नामाचा अन्वय नंतरच्या चिंतन केलेल्या विशेषणास किती भेदक चपखल लागतो आहे. हे जेव्हा लक्षात आले , तेव्हा मला एक अननुभूत आनंद मिळाला.
तीसरे उदाहरण "हनुमान चालीसा"चे. बरेच दिवस म्हणत असे आणि एके दिवशी एका ओळीचा अर्थ लागला. "कुमती निवार सुमती के संगी" - आहाहा. सुमती म्हणजे शुभ बुद्धी असलेले प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे कळले आणि मला अवर्णनिय आनंद झाला.
एका लक्ष्मीस्तोत्रात , देवीचा उल्लेख श्रीपतीप्रिया आहे. सहज वाचतेवेळी किंवा अन्य कामात असताना स्फुरले अरे याचे २ अर्थ होऊ शकतात श्री जी पतीची प्रिय (लाडकी) आहे किंवा ती जिला श्रीपती (विष्णू) प्रिय आहेत. आणि अवर्णनिय वाटले.
एकंदर आतपर्यंतचा काव्याच्या गोडीचा प्रवास असा आहे. लहानपणी स्तोत्रांचे बोट धरुन बाळपावले टाकलेली आहेत. खूपदा मनात येते मुलीला ही गोडी लावता येत नाही कारण ती इंग्रजी माध्यमातून शिकते, मीदेखील दूर असते आणि मन खंतावते. असो त्या आडरानात नको शिरायला. आपल्याला कधी कोणत्या कवितेच्या ओळीचा अर्थ असा स्फुरला असेल, गवसला असेल, तर तो आनंद या धाग्यावर जरुर शेअर करा.
वाचने
30192
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमची काही फेव्हरीट
लेख आवडला..
In reply to आमची काही फेव्हरीट by बॅटमॅन
वरील स्तोत्रे आमचीही अत्यंत
In reply to आमची काही फेव्हरीट by बॅटमॅन
देव्पराधक्षमापनस्तोत्रम्
In reply to आमची काही फेव्हरीट by बॅटमॅन
कविता समजणे
माझ्या वाचनखूणांमधील एक लेख.
In reply to कविता समजणे by सहज
आम्हाला तर हे स्तोत्र
फुटले!
In reply to आम्हाला तर हे स्तोत्र by नाना चेंगट
टोप्या बंद!
In reply to आम्हाला तर हे स्तोत्र by नाना चेंगट
खपल्या गेलो आहे. पाय लागू
In reply to आम्हाला तर हे स्तोत्र by नाना चेंगट
माझी आवडती स्तोत्रे, गणपती
रेवती तू या साईटवर जाऊन बघ.
In reply to माझी आवडती स्तोत्रे, गणपती by रेवती
आभार.
In reply to रेवती तू या साईटवर जाऊन बघ. by शुचि
अथर्वशीर्श
मला ॐ कर्णेभि: .... हा शांती
In reply to अथर्वशीर्श by पुण्याचे वटवाघूळ
लेख आवडला.
ज्योती अश्विनी भीडे ने टाळ
In reply to लेख आवडला. by पैसा
धन्यवाद!
In reply to ज्योती अश्विनी भीडे ने टाळ by शुचि
हे ऐका
In reply to ज्योती अश्विनी भीडे ने टाळ by शुचि
धन्यवाद!
In reply to हे ऐका by निनाद
ऐकतांना तल्लीन झालो.
In reply to हे ऐका by निनाद
आपल्याकडे तर रामरक्षा इतकी
वडवानल स्त्रोत्रंम
मस्त
In reply to वडवानल स्त्रोत्रंम by सुधीर
मस्त...
श्री मधुराष्टकम
In reply to मस्त... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडेसे अवांतर
संस्कृत श्लोकांच्या बाबतीत वाचलेली एक गोष्ट .
In reply to थोडेसे अवांतर by चौकटराजा
हे वेगळ्या पद्धतीने सांगायला हवे होते.
In reply to थोडेसे अवांतर by चौकटराजा
कारण
In reply to हे वेगळ्या पद्धतीने सांगायला हवे होते. by कलंत्री
माझा अनुभव.
In reply to कारण by चौकटराजा
क्या बात है
In reply to माझा अनुभव. by कलंत्री
पाठांतर व अभ्यास मूलभूत फरक
In reply to माझा अनुभव. by कलंत्री
सहमत!
In reply to पाठांतर व अभ्यास मूलभूत फरक by चौकटराजा
अरेरे
In reply to थोडेसे अवांतर by चौकटराजा
शिवतांडव स्तोत्र
अगदी.अतिशय सुनाद पूर्ण असे हे
In reply to शिवतांडव स्तोत्र by टिवटिव
रचना
In reply to अगदी.अतिशय सुनाद पूर्ण असे हे by शुचि
वाह ! छान लेख.
त्रिसुपर्ण...
In reply to वाह ! छान लेख. by तर्री
सर्वात फेवरेट "शिवमहिम्न स्तोत्र".
शिवमहिम्न
In reply to सर्वात फेवरेट "शिवमहिम्न स्तोत्र". by अप्रतिम
माझा आवडता श्लोक
In reply to शिवमहिम्न by चैतन्य दीक्षित
----^----!!श्रीमनाचे श्लोक !!
उत्तम आठवण
In reply to ----^----!!श्रीमनाचे श्लोक !! by ज्ञानराम
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते
अयि क मले क मलानि लये क मलानि
In reply to जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते by निनाद
मंदारमाला
In reply to अयि क मले क मलानि लये क मलानि by बॅटमॅन
यात २३ अक्षरे आहेत.
In reply to मंदारमाला by निनाद
पादाकुलकच्या जवळ
In reply to मंदारमाला by निनाद
हे स्तोत्र अवघड आहे खरे पण
In reply to जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते by निनाद
आणि
In reply to हे स्तोत्र अवघड आहे खरे पण by शुचि
अजून काही...
वेंकटेश्वर सुप्रभातम फारच
In reply to अजून काही... by नंदन
कोणला नर्मदा सुक्त महिती आहे का ?
कॉलिंग खुशितै.
In reply to कोणला नर्मदा सुक्त महिती आहे का ? by तर्री
संस्कृत डॉक्युमेंट्स वर
In reply to कोणला नर्मदा सुक्त महिती आहे का ? by तर्री
छान.......
वाचनखूण साठवली आहे. मला
निर्वाण षटकम्
सुंदर धागा
<<<एकंदर आतपर्यंतचा काव्याच्या गोडीचा प्रवास असा आहे.>>>
धागा आवडला
वा!
मस्त प्रतिसाद!!!
In reply to वा! by मेघवेडा
स्तोत्रम
शुद्ध लेखन
आहेत की बरेच जण. धनंजय हे या
In reply to शुद्ध लेखन by निनाद
सध्या
In reply to आहेत की बरेच जण. धनंजय हे या by बॅटमॅन
मस्त धागा !
खजिना ...
होय खजिना आहे.
In reply to खजिना ... by तर्री
हा धागा
खूप सुंदर चर्चा....मनापासून आवडली.