परवा बाजारात फिरताना उन्हाळ्यात गायब असणारी हिरवीगार ताजी रसरशीत कुडची वांगी दिसली. म्हटलं, चला, होऊन जाऊदे झणझणीत कोल्हापुरी बैंगन मसाला करी ! वांगी घेऊन घरी गेले अन लगेच तयारीला लागले.
मसाल्याचं साहित्य जमा केलं.
,
,
१ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस २ चमचे ओल्या खोबऱ्याचा चव
४-५ लसूण पाकळ्या १ इंच आले
२ चमचे तीळ १ चमचा मगजबी
हे सगळं १ वाटी पाण्यात अर्धा तास भिजत घातलं अन मग मिक्सर मध्ये वाटून घेतलं. (मी हा मसाला जास्त प्रमाणात तयार करून फ्रीझर मध्ये ठेवते. महिनाभर राहतो. कोणत्याही रश्शात घालता येतो.)
मग १ लहान कांदा बारीक चिरला. २ चमचे कोल्हापुरी चटणी (कोल्हापुरी कांदा लसूण मसाला – मार्केट मध्ये तयार मिळतो), पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ अन हळद काढून ठेवले.
आता १/२ किलो वांगी धुवून देठे न काढता मध्ये काप दिला.
मग त्यांना बाहेरून थोडे तेल लावून झाकणाच्या भांड्यात ठेवून ४-५ मिनिटे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हाय मायक्रो करून ठेवली. ३ मिनिटे झाल्यावर बाहेर काढून देठांना धरून फिरवून पुन्हा ठेवली.
आता वांगी अंगच्या पाण्यातच थोडीशी शिजून मऊ झाली.
मग कढईत तेल तापवून कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घेतला. आता त्यात हळद व तयार मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतले.
मग लाल कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी घालून पुन्हा १ मिनिट परतले.
आता गॅस बंद करून वांग्यांची देठे कापून त्यात यापैकी तीन चतुर्थांश मसाला भरला. उरलेल्या मसाल्यात १ कप गरम पाणी घालून उकळले. आता त्यात भरलेली वांगी सोडून झाकण ठेवून मंद गस वर ५-७ मिनिटे ठेवले. (किंवा मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिटे ठेवले तरी चालेल.)
झाली तयार झणझणीत बैगन मसाला करी !

वाचने
24714
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाना चेंगट यांचे
वेलकम तो हेल नान्या !!
In reply to नाना चेंगट यांचे by नाना चेंगट
अगगागागागागाग्गा
अवांतर-@नाना चेंगट यांचे
_/\_ _/\_ _/\_
एकदम झक्कास.
वा.... एकदम सही..... आता
झणझणीत पेशकश
आहाहा...
वाहवा!
ये ग .....
In reply to वाहवा! by पैसा
धन्यवाद!
In reply to ये ग ..... by निवेदिता-ताई
भारी आलेत फोटो!तिसर्या
आई ग्ग !!!! कसली भारी लालेलाल
In reply to भारी आलेत फोटो!तिसर्या by रेवती
वा वा मस्तच.....नक्की
ओक्के! धन्यवादस्. मगज म्हणजे
In reply to वा वा मस्तच.....नक्की by पुष्करिणी
अगदी बरोबर ! मी या मसाल्याचे
In reply to ओक्के! धन्यवादस्. मगज म्हणजे by रेवती
मस्तच !!!
खल्लास...! :-)
झणझणीत !!
जय हो !!!
आधी ती हिरवी वांगी पाहुन जीव
वांग्यात भरपुर तूप आ हा हा
In reply to आधी ती हिरवी वांगी पाहुन जीव by स्पंदना
अहा
पूर आला आहे.. वाचवा..
बायको बोंबल रही हय !
म्हणे ह्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी हवी.
In reply to बायको बोंबल रही हय ! by इरसाल
बरोबर
In reply to म्हणे ह्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी हवी. by चिंतामणी
धन्यवाद
विनयशीलता.
In reply to धन्यवाद by सस्नेह
एकदम झक्कास
अरे वेताळा ! तुला रे कसला
वान्गी जिव कि
क्या बात है !
एक तंगडीची कोंबडी !
एक तंगडीची कोंबडी !
वारलो!
आमच्यासाठी वांगं हीच
In reply to वारलो! by प्यारे१
--^--^--^--
In reply to आमच्यासाठी वांगं हीच by प्रचेतस
हं.......
हिरवीगार ताजी रसरशीत कुडची वांगी
जब्रा.
आम्हाला दिसत का नाहि
काय जीवघेणा पाक प्रकार केलाय.
सहमत
ईक्दम झक्कास झालिये वा!!!!़