आंदोलक आणि भविष्य
In reply to वेगळा अँगल आवडला. by गवि
In reply to +१ by मन१
"प्रत्येकवेळी " हा शब्द बदलून "बर्याचदा" असे लिहिले तर सहमत."बर्याचदा" ला पर्याय म्हणून ऑलमोस्ट ऑल्वेज अशा अर्थाने "जवळजवळ प्रत्येक वेळी" शब्द वापरला आहे. पण तुम्ही काय म्हणताय ते कळलं.. हो आमचा मतभेदाचा हक्क आम्ही कायम अबाधित ठेवत असतो.. :)
In reply to वेगळा अँगल आवडला. by गवि
In reply to +१ by नगरीनिरंजन
In reply to सरासरीवर चालणार्या आपल्या समाजव्यवस्थेला by मन१
In reply to खीक्क! by बिपिन कार्यकर्ते
In reply to बाकी श्रामो, बिका आणि इन जनरल सर्व आंदोलक लोकांना विचारावंसं वाट by प्यारे१
कुठल्याही प्रकारचा अन्याय न होता मार्ग काढण्यासाठीचं एखादं मार्गदर्शनपर मॉडेल / जनरल गाईडलाईन्स आपल्याकडे आहे काय जेणेकरुन प्रकल्प सुरु होण्याआधीच सगळ्या गोष्टी सुरळीत होतील? प्रत्येक प्रकल्पाचे आपापले स्वतंत्र मुद्दे असणार आहेतच पण तत्पूर्वी अशा काही किमान गोष्टी असतील ज्या कॉमन असतीलच. उदा. : जमीन अधिग्रहण, जमिनीं ची'योग्य' किंमतीने विक्री, ज्यांच्या जागा जात आहेत त्यांचं पुनर्वसन इ.इ.इ.कायदे आहेत, कायद्यांच्या आधी घटनाही आहे. कायद्यांचे पालन केले तरी बरेच काही होते. अधिक माहिती सार्वत्रिक उपलब्ध आहे. कोणतेही आंदोलन कायद्यांच्या बाहेरचे, किंवा पलीकडचेच, काही मागते आहे, असे या स्वरूपाच्या सोप्या प्रश्नातून सूचीत होत असते. ते आधी दुरूस्त करावे लागेल.
माझ्या मते अशा आंदोलनांमुळे प्रकल्पाला होणार्या उशीरामुळे प्रकल्पाची किंमत अनेक पटींनी वाढते. (कच्चा माल किंमत वाढणे, इतर कायदेशीर बाबी निस्तराव्या लागणे इ.इ.) अशा वेळी आंदोलन कर्त्यांच्या भूमिकांकडे 'स्वच्छ' दृष्टीकोनातून बघणं 'अवघड' होतं. प्रकल्पाचा खर्च वाढणं हा एक मुद्दा झाला, प्रकल्पाच्या त्यानंतरच्या कमिशनिंग नंतर मिळू शकणारा पैसा जो पुढे अनेक कामांसाठी वापरला जाऊ शकतो तो देखील ठप्प. जर प्रकल्पग्रस्त लोकांना माहिती असेल की असे असे होणार आहे तर प्रकल्पाच्या सुरुवातीलाच एक मॉडेल बनणं, त्याची अम्मलबजावणी होणं, हे का होत नाही?प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या आधी (किती आधी त्याविषयी कायद्यामध्ये मुदत आहे) पुनर्वसन झाले पाहिजे असे कायदा सांगतो. ही जबाबदारी प्रकल्पग्रस्तांची नसते. प्रकल्पकर्त्यांची असते. तेव्हा कशातून कसली किंमत किती का कशी वाढते वगैरेची चिंता सर्वांनीच केली पाहिजे, फक्त प्रकल्पग्रस्तांनी नाही. अशा वेळी त्यांच्याकडे स्वच्छ दृष्टिकोनातून पहायचं की नाही हे पाहणाऱ्यावरच अवलंबून आहे. त्याचाही दोष प्रकल्पग्रस्तावर टाकणे का घडते हे मी समजू शकतो. या विशिष्ट प्रकल्पाबाबत बाकीचे मुद्दे थोडे बाजूला ठेवून सुचवतो, मगरपट्टा सिटी याचा अभ्यास व्हायला हरकत नाही. आणि तो करतानाही मगरपट्टा सिटी प्रकल्पासाठीच्या काही परवान्यांसाठी त्यांनाही काय संघर्ष करावा लागला तेही पहायला हरकत नाही. तिथं तर प्रकल्पाचे प्रवर्तकच फक्त होते, 'प्रकल्पग्रस्त' नव्हते!
आलेल्या अडचणींचं स्वरुप जाणून घेऊन त्या त्या प्रकारची आंदोलनं सुरु करणारे/करवणारे (इनिशिएटर) कमी संख्येने आहेत, सगळीकडे जाता येत नाही इ.इ. गोष्टी मान्य आहेत पण ह्यामुळे 'करदात्या' जनतेच्या पैशातून जे काम १ रुपयात होणार होते त्याला (खरे २-३ लागत असतील पण होणार्या उशीराच्या नावाखाली असेल )जर ५ रुपये लागत असतील तर ह्याला 'फक्त' सरकार जबाबदार आहे का?सरकारने सरकारची जबाबदारी नीट पार पाडली तर बाकी ठिकाणी सरकारला जबाबदार राहण्याची वेळ येत नाही. साधं-सरळ आहे हे. सरकारची पहिली जबाबदारी असते पुनर्वसन. ती पार पाडावी.
प्रकल्प सुरु झाल्यावर, एखाद्या क्रुशल पॉइंटला असताना काही कार्यवाही ( अडथळे म्हणत नाही कारण प्रकल्पामुळे परिणाम होणार्या लोकांसाठी प्रकल्प हाच अडथळा असतो) होण्याऐवजी प्रकल्प सुरु होण्या आ धी हे हे मुख्य मुद्दे क्लिअर झाल्याशिवाय काही होऊ देणार नाही अशी भूमिका का घेतली जात नाही? अशा गोष्टींचा विचार का होत नाही? ह्यासाठी काही 'काँक्रीट' केलं जाऊ शकतं का?वर म्हटलं तसं प्रकल्पाआधी पुनर्वसन झालं पाहिजे असे कायदाच सांगतो. ते प्रकल्पग्रस्तांनी स्वतंत्रपणे सांगण्याची गरज असेल तर प्रकल्प आखणाऱ्यांच्या निर्बुद्धपणाची नोंद घ्यावी लागेल आणि ते निर्बुद्ध असतील तर असल्या प्रकल्पांनी होणाऱ्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित होतीलच. ते प्रकल्पग्रस्तांनी केले तर त्याकडे अ-स्वच्छ दृष्टीने पहायचे किंवा कसे हा ज्याचा-त्याचा प्रश्न. असो! :-)
In reply to प्रतिसाद by श्रावण मोडक
In reply to अहो कायदा आहे पण अम्मलबजावणी by प्यारे१
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to आंदोलन कदाचित यशस्वी होणारही by कवितानागेश
In reply to थत्ते थत्ते थत्ते ! अहो by नाना चेंगट
In reply to थत्ते थत्ते थत्ते ! अहो by नाना चेंगट
In reply to नानांशी बाडिस by नितिन थत्ते
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सॉरी by नितिन थत्ते
In reply to मनःपूर्वक आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मनःपूर्वक आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धाग्यावरच्या गंमती जंमती by नाना चेंगट
In reply to संपादन by श्रावण मोडक
In reply to हा हा हा खरे आहे. +२ -२ by नाना चेंगट
In reply to ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to च्च च्च च्च अहो तुम्ही by नाना चेंगट
कोण रे तिकडे आजकाल डॉक्टरेटचे प्रबंध सुद्धा कॉपी पेस्ट असतात असं म्हणत आहे ? देऊ का रट्टा !!मी नाही... ;-)
In reply to च्च च्च च्च अहो तुम्ही by नाना चेंगट
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ७० वर्षांपुर्वी by विकास
In reply to ७० वर्षांपुर्वी by विकास
In reply to सविस्तर प्रतिसाद आवडला. by नितिन थत्ते
हे फुटकळ विचार सामाजिक आंदोलनांविषयी नाहीत. पक्षी १९४२ चे आंदोलन, अण्णा हजारे यांचे नुकतेच झालेले आंदोलन या फुटकळ विचारांच्या मागे नाहीत. व्यवस्थेकडून काहींवर होणार्या वैयक्तिक अन्यायाविरोधातील आंदोलनांविषयी हे लिहिलेले आहे.अच्छा. वैयक्तिक आंदोलन म्हणजे काय हे या लेखातून स्पष्ट होत नाही. केवळ उदाहरणासाठी, धरणग्रस्त वैयक्तिक आंदोलन करतो, असे म्हणायचे आहे का? कामगाराचे नव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीसाठीचे आंदोलन हे वैयक्तिक आंदोलन म्हणायचे का? म्हणायचे असू शकते. ते तुमचे मत आहे. पण ते मत समजून घेण्यासाठी त्याची मांडणी लेखातून पुरेशी स्पष्ट होत नाही. यासाठीच मी इतरत्रही म्हटले होते की लेखनावर तुमचे नाव पाहून या लेखाची रोचकता वाढली. मला वाटते की, सवडीने तुम्ही अजूनही नीट, तपशीलवार मांडणी करा. हा विषय चांगल्या चर्चेचा आहे.
In reply to अच्छा by श्रावण मोडक
In reply to -१ by सहज
In reply to -१ by सहज
In reply to अच्छा by श्रावण मोडक
In reply to वैयक्तिक by नितिन थत्ते
In reply to एक थोडं वेगळं मांडू का? by आनंदी गोपाळ
दुसरी बाजू