७.४० कर्जत फास्ट
भे** , साला हरामखोर स्वत : गाडी घेऊन येतो, त्याला काय माहित.. इथे १५ मिनिट जरी उशीर झाला तरी घरी पोचायला २ तासाचा फरक पडतो.. " तो वैतागत बडबडतो ..
हो न यार साला किती ट्राफिक ... आणि हा पाऊस.. त्यात आज ट्रेन पण लेट.. त्याचा मित्र .
साला सगळे भिकारचोट.. रेल्वे वाले तर त्याहून हरामखोर.. "@#@##$.." "मा#$%%.." त्याचा स्वतावरचा ताबा सुटत चाललेला असतो .
अरे काय घाणेरडी लाइफ आहे साली, दिवस भर आपल प्रवासच करत राहा. मुंबईतल्या मुंबईत .. आज हे बिघडल , उद्या सिग्नल तुटला , परवा गाडीच ठोकली .. अरे काय चाललंय काय.. तो बेभान होत असतो . .आजूबाजूचे हसत असतात .. त्याला त्याची पर्वा नसते ..
७.४० ची कर्जतला जाणारी जलद लोकल आज १० ते १५ मिनिट उशीराने अपेक्षित आहे... इति मध्य रेल्वे
हे ऐकून तर तो फुटतोच .... त्याचा मित्र पण चक्रावतो .. अरे शांत राहा .. आपण काही करू शकत नाहीयोत रे.. तू कशाला त्रास करून घेतोस?
अरे त्रास?.. साल्या माझ्या आईचा आज वाढदिवस आहे .. घरी बिचारी एकटी असते.. कधी नव्हे ते आज जरा एक तास वेळेवर जाईन असा विचार करत होतो .. काय फरक पडला ... भे ** ... तो उसळतच असतो .
तेवढ्यात गाडी येते .. प्रचंड गर्दी , माणसं तुडुंब भरलेली .. त्याच्या मित्र कसाबसा लटकत पुढचा डोअर पकडतो.. हा सुद्धा पकडायला जातो.. पण समोरच एक मुलगा त्याच्याच वयाचा . त्याला मागे खेचून घुसतो..
अरे ल ** , कुत्र्या .. हा त्याची कॉलर खेचायला लागतो.. पण तो तोही याला ढकलत असतो .. शेवटी गाडी सुटते ... हा मागे मागे रेटला जातो.. नाही हि गाडी सोडायची नाही .. तो गाडीत चढायचा अविरत प्रयत्न करत असतो ..
शेवटी मागच्या डब्याच्या दरवाज्यात हा उडी घेतो. आधीच ६ माणस लटकत असतात हा सातवा... अरे मर्नेक्या हे क्या ... कोणीतरी खालून किंचाळत.. याला भान नसत ..
आई - वाढ दिवस- ट्राफिक - हलकट बॉस - समोर लटकणारा . आपल्याला ढकलून पुढे घुसणारा हरामखोर... आई - वाढदिवस - हलकट बॉस
डोक्यात ज्वालामुखी फुटत असतात ..
या कुत्र्याला फोडायचा बस्स.... तो कसाबसा लटकत असतो.. स्टेशन भराभर मागे पडत असतात ... कधीतरी गाडी डोंबिवलीला लागते .. समोरचा उतरून चालायला लागलेला असतो...
त्याला बघताच भान हरपत .. कानशील तापतात ... लव* मला ढकलतोस.. हा कमरेचा बेल्ट काढतो ... गाडी हळू हळू वेग घ्यायला लागते .. हा जीव घेऊन त्याच्यावर बेल्ट हाणतो .. साट.. मानेवर फटका बसतो.. दरवाज्यातले याला अडवण्याचा प्रयत्न करतात.. "तो" तिकडेच कोलमडतो .. अजून एक. हा अजून एक हाणतो . पण तो आता त्याचा बेल्ट पकडतो.. आणि गाडीबरोबर धावायला लागतो ... हा बाहेर खेचला जातो.. लोक ओरडतात .. पण गाडीचा वेग वाढतो..
आणि काही कळायच्या आता समोरचा गाडी आणि platform च्या मध्ये खेचला जातो.. बेल्ट तसाच हातात ... विचित्र आवाज होतो ... समोरचा अर्धा कापला जातो... हा डोळे फाडून फाडून पाहत असतो .. लोक ओरडतात ..
केंव्हातरी गाडी थांबते .. काही लक्षात येण्याच्या आत.. कोणीतरी जोरदार पोटात गुद्दा हाणत. अजून चार पाच जण घोळका करून .. याला तुडवायला लागतात.. सालेने मर्डर किया.. मार सालेको ..
हा नाय, नाय ओरडत असतो. पण परिस्थिती आवाक्याबाहेर गेलेली असते ... याची शुद्ध हरपते ...
रात्रीचे ९.४५ : रेल्वे पोलीस दल ,डोंबिवली .
याला भान येत.. आणि आठवत काय झालंय ते.. प्रचंड ओकारी आल्यासारखं होत.. आपण काय करून बसलो .. समोरचा पोलीस उठून याच्यासमोर येतो ..
"साहेब" मर्डर केलात आज ... कळतंय का ? मर्डर ..
हा त्याच्या थंड आवाज ऐकून हा गळपळतो.. मी नाय , मी नाय अस काहीस बरळतो .. पण तोंडातून काहीतरी विचित्रच आवाज निघतात ..
तेवढ्यात याचा फोन वाजतो .. "AAI calling ... " हा कसाबसा फोन उचलतो ..
अरे कुठेस तू.. १० वाजले अरे "...
हा - "आई.. आई.." अग...
"बाळा अरे तुझ्या आवडीची खीर केलीये मी.. बाहेर काहीतरी खाऊन आलास तर बघ.. किती रे उशीर ... कुठे पोचलास ?"
"आई मी करतो तुला फोन अग .." कट.
स्टेशन अजूनही गजबजलेल . प्रत्येक जण आपापल्याच विश्वात .. हा बघतोय... काही तासांपूर्वी हा त्यांच्यातलाच होता.. आणि आता ??
तेवढ्यात त्याच लक्ष " बाहेर झाकून ठेवलेल्या प्रेताकडे जातं. आता ओकारी थांबत नाही .
वेळ रात्री ११.००
फोन बंद
RPF : बोल का मारलस?
तो : नाही हो साहेब.. मी त्याला ओळखत पण नाही
RPF : मग काय असंच मारलस भाड्या .. आ ?
तो : .....
बोल कि असंच मजेत मारलस का? कुठे कामाला आहेस?
तो : XYZ company ltd
मयताशी काय दुष्मनी ? भडव्या अर्धा कापला गेलाय बरोबर ..
तो : साहेब मी नाय हो.. मी नाय ...
पट्ट्याने मारलस ना..
RPF : पाटील ती बॉडी हलवा लवकर .. आणि हा पट्टा फ्रीज करा .. मेन पुरावा आहे... मगाशी घेतलेल्या लोकांची जी जबानी आहे तिच्या चार कॉप्या तयार करा ... उद्या केस फाईल करू . आज याला कल्याण ला हलवावा लागेल..
तो: साहेब सोडा ना प्लीज मला.. मी काय नाय केल .. आईचा वाढदिवस आहे हो आज प्लीज सोडा ना .. किती हवेत तुम्हाला ...?
RPF : (संणकन कानाखाली पेटवून ) ए सोडा काय ? आ? तुला काय तिकीट नाय म्हणून पकडला आहे कारे भाड्या .. मर्डर केलास आत्ता .. आणि सोडा बोलतोस.. तुला तर फाशीच होणार आता एका तरुण पोराचा जीव घेतलास ...
तो : आई ... आई...... आई कुठेस ग तू....
*******
अभय अरे काय झाल? . उठ उठ...
आई .. आई .. मी नाय .. मी नाय काय केल....
अभय अरे उठ कि ..
तो खडबडून जागा होतो .. अंग घामाने थबथबलेलं असत..
हळू हळू त्याला शुद्ध येते ,, आई बाबा दोघेही बाजूला उभे असतात ... आई प्रचंड चिंतेत असते ..
याच्या घशाला कोरड पडलेली असते.. हा खुणेनेच पाणी मागतो .. आक्खी एक बाटली पाणी प्यायल्यावर याच्या जीवात जीव येतो .. आई विचारते. काय रे कुठलं स्वप्न पडल का ? किती जोरात ओरडलास.. आम्ही दोघेही किती घाबरलो
काही नाही आई .. मला आठवत नाही काय दिसलं ते.. तुम्ही जाऊन झोपा...
थोडा वेळ आई याच्या केसातून हात फिरवत बसते .. कधीतरी याला परत झोप लागते
*****
दुसरा दिवस
हा ऑफिस मध्ये .. काय भयंकर स्वप्न पडलं काल? एवढ खर.?. आत्ता नुसती कल्पना जरी केली ना . तरी थरकाप उडतोय .. तो मारणारा कोण असेल? त्याला कधी पाहिल्याचं आठवत नाहीये..
त्याची नंतरची अवस्था अतिशय दयनीय होती..त्याच्या आईचं काय झाल असेल ?
आणि जो मेला तो? बापरे .. त्याचा चेहरा पण दिसला नाही......
असल्याच काहीबाही विचार्रांनी त्याचं कामातलं लक्ष उडतं ,
जिभेवर कडू चव रेंगाळत असते .. बाहेर भयंकर पाऊस पडत असतो .. दिवसभर याचे डोळे चुरचुरत असतात .. हा एक तास आधीच निघतो
पण पावसामुळे स्लो लाईन बंद झालेली असते .. हा भयंकर गर्दीतलाच एक असतो .. पुलावर असताना कुठलीशी फास्ट ट्रेन येताना दिसते ..हा जीव घेऊन पुलावरून उद्या मारत खाली उतरतो .
platform वर प्रचंड गर्दी असते हा तसाच सुसाट गर्दीत घुसतो येईल "त्याला" मागे लोटत , धक्का बुक्की करत कसाबसा दरवाज्यात लटकतो
कधीतरी डोंबिवली येत. हा सुखरूप उतरतो आणि चालायला लागतो ... तेवढ्यात मानेवर सणसणीत काहीतरी आपटत .. बाजूने जाणार्या ट्रेन च्या दरवाज्यात एक तरुण हातात पट्टा घेऊन उभा असतो , त्याला एकदम आठवत हाच तो ....
तो अजून एक वार करणार तेवढ्यात हा बेल्ट पकडतो .. पण त्याचं एक टोक याच्या स्लीव्स मध्ये अडकत .. ते निघता निघत नाहीये
********
आता आजूबाजूची लोक ओरडायला लागलीयेत .. गाडीने वेग घेतलाय .. आणि हा फरफटत गाडी च्या दिशेने ओढला जातोय ....
वाचने
15777
वाचनखूण
प्रतिक्रिया
81
प्रतिक्रिया
तोडलसं मित्रा. काटा आला अंगावर.
अवांतर :- नुकताच If only बघितला होतास काय ?
In reply to खल्लास.... by आत्मशून्य
वेगवान कथा. If only ची आठवण झाली.
In reply to +१ by स्वानन्द
सहमत !! If only ची आठवण झाली.
In reply to खल्लास.... by आत्मशून्य
if only पहिला नाहीये , पण आता नक्की पाहीन, धन्यवाद :)
In reply to if only पहिला नाहीये , पण आता by स्पा
जरुर पहा.. मि आताच पाहीला आणी आवडला :-)
--टुकुल
In reply to खल्लास.... by आत्मशून्य
काटा आला अंगावर.
मस्त कथा.
रोज 'मरे' त्याला कोण रडे असं झालेलं असलं तरी लेखाचा पहिला भाग अंगावर आला.
In reply to रोज मरे... by नंदन
पहिलाच भाग नाही, सगळी कथाच अंगावर आली. अगदी मुंबईकरांची जीवघेणी फरफट दाखवणारी कथा!
हा अन तो या जागी काही नावे वापरली असती तर नीट झेपला असता.
डेंजर लिहिलंय एकदम!!
स्पा च्या कथा परत अजिबात वाचणार नाही.

अंगावर आलं :(
भयंकर!
जमलंय रे...
हीचकॉक टाइप शेवट. कथा थ्रीलर आहे. आवडली.
दुसर्या दिवसाची घटना कथेला पूरक आहे. अंगावर काटा आणणारी अनपेक्षितता त्यात ठासून भरली आहे तरी पण ठिगळासारखी जोडल्यासारखी वाटते आहे.
पट्ट्याचं टोक ह्याच्या बाहित अडकलं नसतं आणि त्याला 'ती' भूमिकाही जाणवली असती तर तसा शेवट व्यक्तिशः मला आवडला असता. असो.
छान कथा...
(रात्रीच्या ८.४० च्या कर्जत फास्ट लोकलला रोज लटकत जायचे दिवस आठवले.....)
जबरा!!!!
अवघड आहे.
बरंचसं अपेक्षित, शेवट जरा ओढल्यासारखा झालाय रे. बाकी छान लिहिलंय.
छान लिहलंय.
खुप दिवसांचा उपास सुटला म्हणायचा आज. ;)
गूढकथा आवडली.
लोकल ट्रेनमधली कथा वाचून रत्नाकर मतकरींची 'मंदा पाटणकरची गोष्ट' आठवली.
पी, भन्नाट लिहिल्या गेले आहे . मतकरी स्टाईल. ऐला, आम्ही डोंविवलीचे जावई असल्यानं गाडीतून ढकल्ले गेल्याचा अनुभव बर्याच वेळा पण असे खेचले गेल्याचा ?? बाबो. यनी वे मी कर्जतला उतरलोय
लवकर घरी गेले पाहिजे आईचा वाढदिवस आहे ना ?
स्पावड्या, लेका लईच भारी. गुंतलो होतो कथा वाचताना.
-(एकेकाळचा लोकल प्रवासी)
छान लिहीलं आहेस. धन्यवाद.
भयानक लिहलयसं
ज ब रा
खतरनाक...
प्रीमॉनिशन हा सिनेमा पाहताना जी हुरहुर आणि विचित्र थरथरल्याचं फीलिंग आलं होतं तसं कथा वाचताना आलं.
जबरा
भन्नाट लेख
--^--^--^--
सुरेख रे स्पा. एकदम आवडेश.
भविष्यातील स्वत:च्या मृत्युची अशीच झलक बघणार्या नायकाची (कथा - सापळा, लेखक - सु.शि.) आठवण झाली. अर्थात ती कथा आणि ही कथा संपूर्ण भिन्न आहेतच.
:(
भिती वाटली.
स्पांडोबा नारायण धारप तुझा ताबा घेतायत का रे ? ;-)
प्रचंड वेगवान वाटली रे कथा - मुंबईतल्या लाईफ सारखी
आणखी लिही..
In reply to स्पांडोबा नारायण धारप तुझा by यकु
+१ सहमत.
-स्पारायण गाळप.
In reply to +१ सहमत. -स्पारायण गाळप. by गवि
+२ :D
In reply to +१ सहमत. -स्पारायण गाळप. by गवि
-स्पारायण गाळप. =)) =)) =))
:D
मस्त.. पन मांजर मिस्सींग्ग..
काय जबरा लिहिलं राव. डोळ्यासमोर घडतंय असं वाटत होतं.
लैच भारी.
-दिलीप बिरुटे
कथानक डोळ्यासमोर घडत आहे अशी जाणीव होते.
दैनंदिन जीवनातील ताण तणाव ह्यामुळे मुंबईकरांचे डोके म्हणजे शिट्टी विना प्रेशर कुकर सारखे असते. खऱ्या प्रेशर कुकर मध्ये शिट्टी असल्याने अतिरिक्त प्रेशर शिट्टी वाजून निघून जाते.
प्रत्यक्ष मुंबईकराच्या डोक्यातील प्रेशर मात्र अश्या रितीने निचरा न झाल्याने कधीही भडका उडून बाहेर पडू शकतो.
शुल्लक कारणावरून रेल्वेत झालेल्या बायका व माणसांच्या डब्यातील रा-डे पहिले आहेत. ह्यामुळेच ही कथा अंगावर काटा आणते
मस्त वाटलं बरेच दिवसानी तुझी कथा वाचून.
अवांतर - विनंतीचा मान ठेवल्या बद्दल विशेष आभार. अजून मोठी कथा येऊ देत.
(हावरट) अमृत
कलाटणी आवडली...
स्पावड्या जबरदस्त मस्त, एकदम वेगवान आणि खिळवुन ठेवणारी कथा.
नेहमी प्रमाणेच स्पावड्या रॉक्स.
पैजारबुवा,
खिळवणारं लिखाण रे धारस्पा
स्पाचकॉक राव मस्त जमली आहे कथा. . आवडेश
माताय "नाही अशी अर्धवट नाही सोडायची - वाच.. वाच शेवटपर्यंत" असं स्वतःला सांगत गोष्ट पूर्ण केली.
_/\_
बाकी काहीच लिहायचं नाही.
जे पी
अपेक्षित शेवट तरीही मांडाणी झकास. म्हणूनच थरारक.
चांगले लिहितोस रे.. जरा अजून लिहित जा की.
एकदम भारी कथा.. अत्यंत वेगवान आणि हादरवणारी.. आवडेश!
लय भारीरे स्पा!
पोटात खड्डा पडल्या सारखं झालं थोडा वेळ :(.
आयला... एके काळी मी गुद्द्याला दोन गुद्दे अशा प्रमाणात वागायचो... तेंव्हा कि कथा वाचली असती तर उगाच पंगे नसते घेतले :(
अर्धवटराव
आज पहिलीच कथा वाचली, आणि......हादरलो
आज पहिलीच कथा वाचली, आणि......हादरलो
जबरा कथा.
--टुकुल
झक्कास..
भान हरपलं.. बेक्क्क्क्क्क्कार गोष्ट !!!
मस्त रे एकदम ज़क्कास लिहिलयस... थरारक कथा वाचताना एक्प्रकर्चा ग्राफ सम्भालायला लागतो आणि वाचकाच मन गुन्ताव असे शब्द अणि वर्णन असाव, जे तू पूर्णपणे उत्रव्लाय्स तुज्या लेखात.. गुड कीप इट अप...
खतरनाक
अगदी डोळ्यासमोर घडतय अस वाटलं
तर म्हणजे दुस-याच्या अशाच रेल्वेप्रति असंतोष व्यक्त करणा-या काही तुरळक आपटीबारछाप स्टेटसेस ना 'ऑ...' 'ओके' 'तुम्ही इथवरच जाता आम्ही इत्त्त्त्कं लांब जातो रोज' इत्यादी प्रतिसाद देता देता... स्पा आपले असे जबर अॅटम बाम धागे काढत असतो. काय !
गुड वन!
च्यायला...पुनरेकवार वाचताना तितकीच मज्या आली.
'डोंबिवली फास्ट' चा प्रभाव वाटला. शेवट, एकच पट्टा बसला मानेवर, पण वाचला, असा काहीतरी हवा होता.
जबरदस्त :)
बेक्कार रे भावा
कथेला स्पीड इतकं जबरी आहे. रत्नाकर मतकरींचीच आठवण आली वाचताना. शेवटची कलाटणी भयानक आहे.
तुझ्या कथा वाचल्या की बराच वेळ मन सुन्नच होऊन जातं.
अंगावर काटा आला.............
पां डुब्बा! आता आपण त्याच लोकल मधूण फिरायचं बर का रात्रि.. ;-)
कधी येऊऊऊऊऊउ??? :-\
मतकरी style शेवट .
पण लोक इतके जीव वर आल्यासारखे ट्रेन ला लोंबकळत प्रवास का करतात ? बस नसते का ?
In reply to मतकरी style शेवट . by तुडतुडी
ऑ अच्च जाल तल
In reply to ऑ अच्च जाल तल by बॅटमॅन
=))
In reply to =)) by अत्रुप्त आत्मा
पां.....डुब्बा!!!! ;)
In reply to पां.....डुब्बा!!!! ;) by बॅटमॅन
पांडु रे पांडू ....
... ........... ...! :-D
In reply to पांडु रे पांडू .... by अत्रुप्त आत्मा
अंमळ लिब***? ;)
कथा वाचताना काटा येत होता अंगावर्.पण हे त्याचे स्वप्न होते ,इथपर्यंत वाचल्यावर खूप छान वाटले.आणि कथा संपली असे वाटले.पण पुढचे तर फारच भयानक.
तुफ्फान कथा !!
स्पारायण धारप जिंदाबाद !
ह्या कथेवर नक्कीच एक अप्रतिम शॉर्ट फिल्म काढता येईल !! :)
बापरे........ ख़तरनाक........
जबरदस्त :)
आज वाचली ही कथा.
टेरर.
आता आजूबाजूची लोक ओरडायला लागलीयेत .. गाडीने वेग घेतलाय .. आणि हा फरफटत गाडी च्या दिशेने ओढला जातोय ....
हुश्श वाचला बिचारा.....
त्या तरूणाच्या हातून बेल्ट निसटलाय.
If only सारखीच कथा .
तुफान सस्पेन्स आहे कथेत... जबराटच...
खल्लास....