परिक्रमा ही एक थोर अध्यात्मिक साधना आहे याची बालंबाल खात्री झाल्यानं नवग्रह ती करायला निघाले. आत्मझिरो हा `परिक्रमाकिंग' खरं तर लीडर होणार होता पण त्याची आता अशी परिस्थिती झाली होती की `आपण प्रदक्षिणा करतोय का दोन परिक्रमांच्यामधे कुठे तरी थांबलोय' हेच त्याला कळायचं नाही, त्यात तो एकटा मधेच सटकून भलत्याच मार्गानं जाण्याची शक्यता होती. पुन्हा बर्याचदा त्याला काय म्हणायचय ते कुणालाच नक्की समजायचं नाही, तर असा लिडार काय कामाचा? त्यामुळे त्याचा पत्ता कट झाला आणि मतदान घेणं क्रमप्राप्त झालं.
किटेकरबुवांना आपला क्लेम लागेल असं वाटलं होतं कारण ते उदासबोधप्रवीण होते पण त्यांना फक्त मूर्खाच्या लक्षणांशिवाय काही माहिती नसल्यानं ते बोलायला उभे राहता क्षणी त्यांना बसवण्यात आलं, तरीही बसता बसता त्यांनी श्लोक टाकलाच : सर्वांस आहे स्खलन ! म्हणोनी राखावे दडपण! यावर सर्व ग्रुपनं एकच कल्ला करुन हा श्लोक कोणत्या अध्यायात आहे? असा सवाल केला, त्यावर हा अध्याय अप्रकाशित असून तो फक्त खाजगीत सांगितला जातो असं म्हणून त्यांनी पटकन बसून घेतलं.
आत्मगुप्त एकदम मौन राखोन होते त्यांचा कुंडलिनीपासून ते गंडवलिनीपर्यंत अध्यात्माचा दांडगा व्यासंग होता, नुकतेच ते कुठूनसे शक्तीपात वगैरे पण घेऊन आले होते. त्यांच्या मागे त्यांचे गुरु आणि त्यांच्या मागे त्यांचे गुरु अशी थोर परंपरा होती पण अशी परंपरा सांगणारे अनेक असल्यानं त्यांची वर्णी सहज लागण्याची चिन्ह नव्हती. त्यांचं नॉमिनेशन झाल्यावर, "त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तकं निव्वळ फुकट वाटून देखील कुणी घेत नाही की वाचत नाही" अशी चर्चा उसळल्यानं त्यांना तिकीट मिळालं नाही.
बॅडमॅन आणि हाराकिरी हे अंडरवर्ल्डचे दोन रिटायर्ड सदस्य नवग्रहात होते, चंबळच्या खोर्यातून जाताना त्यांचा उपयोग होणार होता पण बॅडमॅनला बालपणापासून अॅसिडिटीचा त्रास होता, जरा कुणाचं बरं दिसलं की त्याचा पोटशूळ उठे. आता परिक्रमेत खायचे हाल त्यात हा अॅसिडमॅन काय कामाचा म्हणून सर्वानुमते तो बाद ठरला. हाराकिरी नुसता नामधारी होता, नांव सोडता त्याच्या कशालाच धार नव्हती त्यामुळे तो नाराज झाला तरी ग्रुपला काय पण फरक पडणार नव्हता सो हराकिरीला ऑईलकॅन बहाल करुण्यात आला. यावर तो उसळला, "मायला म्हणजे आम्ही गेलो का तेल लावत?" यावर किटेकरबुवांनी त्याला "सर्व परिक्रमी दमल्यावर त्यांचे पाय रगडून देण्याचं सेवाव्रती काम तुला देण्यात आलंय" असं समजावलं . आता हे पुण्याकर्म कसं नाकारणार? काय करतो बिचारा, लिडरशिप फार पुढची गोष्ट झाली, प्रदक्षिणेतूनच पत्ता कट व्हायचा म्हणून झक मारत हो म्हणाला!
सगळ्यांना आशा सर्किटची होती कारण गुंतागुंतीच्या कुणालाही न कळणार्या बेफाम थियरीज मांडण्यात त्याची कमालीची तयारी होती. आता सर्किटचा आतला प्रॉब्लम (बीनभाषी सोडता) कुणालाच माहिती नव्हता. नको त्या कॉंप्लिकेटेड थिअरीज डोक्यात बसल्यानं सर्किटचा `आतला सर्किट' शॉर्ट झाला होता; त्यामुळे सर्किट इतका सर्किट झाला होता की चारचौघात तुम्ही कोण? विचारलं तर स्वत:ची ओळख तो खरं नांव सांगण्या ऐवजी `मी सर्किट' अशी करुन द्यायचा. अशा माणसाला लिडर करणं ही ग्रुपची हेटाई होईल हे ओळखून त्याला बाद करण्यात आला.
सर्किटची शेवटार्यंत बीनभाषी आपल्याला नॉमिनेट करेल अशी आशा होती पण त्यात स्सॉलिड गोची होती. सर्किटचा आतला प्रॉब्लम बीनभाषीला माहिती असला तरी बीनभाषीचा आतला प्रॉब्लम सर्किटला माहिती नव्हता. बीनभाषीनं मौनाचा अती दीर्घ अभ्यास केल्यामुळे `आपलं मन बोलतय की आपण बोलतोय' हेच त्याला कळायचं नाही. कधी कधी तर तो मनातल्या मनात इतकं स्पष्ट बोलायचा की आपलं बोलून झालयं असं त्याला वाटायच!
नॉमिनेशनची मुदत संपली तरी आपल्या नांवाला आपल्या सख्या मित्रानं अनुमोदन दिलं नाही हे बघून सर्किट खवळला, त्यानं बीनभाषीला फैलावर घेतला. त्यावर बीनभाषी म्हणाला `आयला मी तुझ्या नांवाला इतकं जोरदार अनुमोदन दिलं आणि कुणालाच ऐकू आलं नाही?' सर्किटनं कपाळावर हात मारुन घेतला! तरीही त्याला नवीन थिअरम सापडलाच "शॉर्टसर्किट आणि न बोलता बोलल्यासारखं वाटणं हे ट्वीन, मीन आणि सीनमधे बसवले तर नक्की काय स्पीन होईल ?" मग त्या आनंदात त्यानं बीनभाषीला माफ करुन टाकला!
आता खरं तर दोघंच उरले होते, ड्युप्लिकेट सह्या मारण्यात नांव कमावलेला बोरू आणि कशीबशी नोकरी सांभाळत जगणारा अशिक्षित. एकाला मंत्री आणि दुसर्याला उपमंत्री करुन परिक्रमेची वाजंत्री वाजली असती पण आपल्याला पद नाही म्हटल्यावर दुसर्याला ते सहज कसं मिळू द्यायचं या भावनेनं सगळे इरेला पेटले तशात त्यांच्यात नव्यानं सामिल झालेल्या कान्यानं त्यांना निवडणूक व्हायलाच पायजेल अशी नैतिक तंबी दिली. नान्या प्रदक्षिणेला येणार नव्हता आणि तो बेभरवश्याचा असल्यानं नक्की ग्रुपमधे आहे की नाही याची कुणाला खात्री नव्हती पण त्याचा पूर्वी दबदबा वगैरे होता म्हणून मंडळी राजी झाली.
अशिक्षितनं मोक्याच्या टायमाला मुद्दा काढला, "हा बोरू इतक्या ड्युप्लिकेट सह्या करतो की आता स्वत:ची पण ड्युप्लिकेट सही ठोकायला लागला आहे, तस्मात हा इतर मेंबरांच्या ड्युप्लिकेट सह्या मारुन परिक्रमाफंडाचा घपला करणार नाही कशावरुन?" झालं! बोरुचा मोरु झाला. आपलं कौशल्यच आपल्याला दगा देईल असं त्याला कधी वाटलं नव्हतं पण अशिक्षित नोकरदार आहे आणि बॉसला टरकून असतो त्याची मिरासदारी दुसरी नोकरी मिळेपर्यंतच आहे हे बोरुला माहिती होतं म्हणून तो गप बसला. अशा तर्हेनं अशिक्षितकडे परिक्रमेची लिडरशिप आली.
परिक्रमा मोहिमेचा सॉलिड गाजावाजा करुन प्रसिद्धी मिळवायची आणि ती पूर्ण झाल्यावर प्रत्येकी वेगवेगळे अड्डे खोलायचे, कुणी कुणाशी पंगा घ्यायचा नाही यावर ग्रुपच एकमत झालं. चौकात उभे राहून त्यांनी आपल्या मोहिमेचे बॅनर उंचावले आणि मोठ्या अभिमानानं ते लोकांच्या प्रतिसादाची वाट बघायला लागले. दोन दिवस झाले, तीन दिवस झाले एकमेकांना धीर देऊन ते थकले, पण कुणी बघायला देखील तयार नाही.
शेवटी सर्किटनं नवा थियरम काढला तो म्हणाला "आयला परिक्रमा परिक्रमा म्हणजे शेवटी काय गोलगोल फिरणंच ना? धरा एकमेकांचे हात, करा रिंगण, म्हणा `नर्मदे हर' आणि करा सुरु प्रदक्षिणा, साला हाय काय आणि नाय काय! "
यावर आत्मझिरो खवळला, आयला म्हंजे आम्ही इतके दिवस येडे होतो की काय परिक्रमा करायला? आत्मगुप्त म्हणाला आयला झक मारली तुमच्यात येऊन, इतक्या वेळात माझी कुंडलिनी जागृत झाली असती. किटेकर बुवांच्या मनात तत्क्षणी मूर्खांची सर्व लक्षणं उचंबळून आली पण मोठ्या संयमानं त्यांनी श्लोक मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली. बॅडमॅन आणि हाराकिरीला "साली ही शहाणी माणसं एकदम ग्रुपचा बल्या कशी करायला निघाली" ते कळेना. बीनभाषीला आतला आवाज ऐकावा का बाहेरचा असा गहन प्रश्न पडला. बोरुकडे वरिजिनल काही नव्हतच त्यामुळे "आपण लिडरशिप घेतली नाही ते बरं झालं" असं आत्मिक समाधान करुन घेऊन तो गप्प झाला. अशिक्षितची ज्याम गोची झाली, मायला कशीबशी रजा टाकून हे परिक्रमेचं जमवलं आता उद्या जॉइन होऊ तेव्हा बॉसला काय सांगायचं? या धसक्यानं तो आपल्या अष्टमित्रांकडे उत्तराच्या अपेक्षेनं पाहू लागला.
वाचने
9782
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त मस्त मस्त...
ऐला बॅडमॅन!!! छान नामकरण हो
हा हा हा !!
हा लेख परिक्रमेवरच्या लेखांचा
परिपाक!
:)
परिक्रमेला मंडळातल्या काही लोकांनी पण दाद दिली त्यांच्या
In reply to :) by आत्मशून्य
रात्री उशीरानं लेख पोस्ट
In reply to परिक्रमेला मंडळातल्या काही लोकांनी पण दाद दिली त्यांच्या by संजय क्षीरसागर
झकास ...
एक विडंबन ओशोंची पुणे -
जय साध्वाभास !!
येस! मात्रा लागू एकदम लागू पडलीये
In reply to जय साध्वाभास !! by चैतन्य दीक्षित
हे बरंय
In reply to येस! मात्रा लागू एकदम लागू पडलीये by संजय क्षीरसागर
होना, आमच्या भाषेत याला
In reply to हे बरंय by चैतन्य दीक्षित
पडी तो पडी
In reply to होना, आमच्या भाषेत याला by संजय क्षीरसागर
दादा, गोडगैरसमज सोडा
In reply to पडी तो पडी by चैतन्य दीक्षित
हा आणखी एक विनोद
In reply to दादा, गोडगैरसमज सोडा by संजय क्षीरसागर
आता मात्र तुमची बीनभाषी सारखी स्थिती झालीये!
In reply to हा आणखी एक विनोद by चैतन्य दीक्षित
अरे अरे संजय भाउ असं वाटतय की
In reply to आता मात्र तुमची बीनभाषी सारखी स्थिती झालीये! by संजय क्षीरसागर
असु दे रे मित्रा !!!
In reply to अरे अरे संजय भाउ असं वाटतय की by आत्मशून्य
हा हा हा.... मस्त लेख्..अशा
किती मज्जाये पाहा
In reply to हा हा हा.... मस्त लेख्..अशा by Dhananjay Borgaonkar
..वा पुढं वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता असं वाटल्याने
In reply to किती मज्जाये पाहा by संजय क्षीरसागर
क्षीरसागर भो, अध्यात्म 'जगता'
ह्या विडंबनाला, मत्सराची छटा
भिकार लेख.
अरे! माझ्याविरुद्ध कुणीही काही पण लिहायचं आणि बाजी उलटली की
In reply to भिकार लेख. by स्पा
भिकार लेख. स्पावड्या हा लेख
In reply to भिकार लेख. by स्पा
लिखाण आवडले.
आता अध्यात्म म्हणजे काय हे
In reply to लिखाण आवडले. by प्रचेतस
पण मुळात अध्यात्म हाच एक भास
In reply to आता अध्यात्म म्हणजे काय हे by सूड
>>पण मुळात अध्यात्म हाच एक
In reply to पण मुळात अध्यात्म हाच एक भास by बॅटमॅन
हीहीही
In reply to >>पण मुळात अध्यात्म हाच एक by सूड
हो ना राव. उगा काम धाम सोडून
In reply to आता अध्यात्म म्हणजे काय हे by सूड
+१ असेच म्हणतो
In reply to हो ना राव. उगा काम धाम सोडून by प्रचेतस
अगदी बरोबर. कधी येतोय शाजीत?
In reply to +१ असेच म्हणतो by आत्मशून्य
शाजी काऽये? (निरागस +
In reply to अगदी बरोबर. कधी येतोय शाजीत? by प्रचेतस
अरे ये वटवाघूळम्यान शाजी नै
In reply to शाजी काऽये? (निरागस + by बॅटमॅन
ऐला भारी! जायलाच पाहिजे एकदा
In reply to अरे ये वटवाघूळम्यान शाजी नै by प्रचेतस
नारायण ! नारायण ! एव्हढच
कोनि परिक्रमा केलि तर तुम्हाला त्रास आहे का?
दादा, लेखाच्या नांवावर जाऊन तुम्ही नाराज होऊ नका
In reply to कोनि परिक्रमा केलि तर तुम्हाला त्रास आहे का? by सुजित पवार
प्रतिक्रियेला उत्तर दिल्याबद्दल आभार
In reply to दादा, लेखाच्या नांवावर जाऊन तुम्ही नाराज होऊ नका by संजय क्षीरसागर
अरेच्चा! .... अरेरे!!
ओ उमा जेट ली
जमाडी जंमत आहे सगळी.