कांदासंस्थानाचे चिलखती उत्तर
In reply to कायदे स्ट्रिन्जन्ट (कठोरात by शुचि
In reply to कायदे... by मन१
In reply to हे वरवर ठीक आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
इंटीग्रेशन (मराठी?)काहीही विचारत जाऊ नकोस. गप्प की जरा. त्या मराठी शब्दात 'आत्मा' येतो. चालेल का? ;-)
In reply to हे वरवर ठीक आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to एक उत्तम तिरकस लेख. तिरकस by मृत्युन्जय
In reply to +१ by मन१
In reply to +१ by मन१
In reply to हॅ हॅ हॅ.....एकदा स्त्रिया by बॅटमॅन
गे लोक थैमान घालतील.आत्तापर्यंत त्यांच्या परस्परसंमतीच्या प्रेमसंबंधांना बेकायदेशीर ठरवलं गेलं, संधी मिळाली तर त्यांचा भडका दिसेल यात वरवर आश्चर्य वाटत नाही. त्यासाठी स्त्रियांनी मरण्याचीही आवश्यकता नाही. पण सर्व पुरूष-समलैंगिक पुरूषी वर्चस्ववादाचे गुलाम असतील असं वाटत नाही. या वर्चस्ववादाचा त्रास झाल्यामुळे बहुतेकांची प्रतिक्रिया पूर्णतः विरूद्ध असू शकते. (... वेळ मिळाल्यास प्रतिक्रिया विस्ताराने पूर्ण करेन)
In reply to मनोबा बॅटमॅन, स्त्रियांनंतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्त्रियांनंतर सुंदर पुरूषांआधी बालकांचा नंबर लागेल.अशक्य, स्त्रिया संपुर्ण नश्ट होइ पर्यंत बालके तरूण झाली असतील. व स्त्रिया नश्ट होत असताना लहानमुलांच कोण बघणार म्हणुन जन्मदर शुन्यावरही आला असेल.
आत्तापर्यंत त्यांच्या परस्परसंमतीच्या प्रेमसंबंधांना बेकायदेशीर ठरवलं गेलं, संधी मिळाली तर त्यांचा भडका दिसेल यात वरवर आश्चर्य वाटत नाही. त्यासाठी स्त्रियांनी मरण्याचीही आवश्यकता नाही. पण सर्व पुरूष-समलैंगिक पुरूषी वर्चस्ववादाचे गुलाम असतील असं वाटत नाही. या वर्चस्ववादाचा त्रास झाल्यामुळे बहुतेकांची प्रतिक्रिया पूर्णतः विरूद्ध असू शकते.काय म्हणता ? मग सध्य परीस्थीतीत असा शुरपणा स्त्रिया का दाखवु शकत नाहीत ? का त्या माणुस नाहीत ?
(... वेळ मिळाल्यास प्रतिक्रिया विस्ताराने पूर्ण करेन)नवीनच धागा काढावा अथवा ह्याचा ट्यार्पी असंबध्द होइल. - डॉ़क्टर स्ट्रेंजलव्ह.
In reply to ह्या दिशाहीन प्रतीसादाने by आत्मशून्य
अशक्य, स्त्रिया संपुर्ण नश्ट होइ पर्यंत बालके तरूण झाली असतील. व स्त्रिया नश्ट होत असताना लहानमुलांच कोण बघणार म्हणुन जन्मदर शुन्यावरही आला असेल.वैचारिक प्रयोग असा एक प्रकार भौतिकशास्त्रात असतो. ज्ञानाच्या आणि माहितीच्या इतर शाखांमधेही त्याचा उपयोग होतो. त्याबद्दल अधिक माहिती इथे मिळेल.
काय म्हणता ? मग सध्य परीस्थीतीत असा शुरपणा स्त्रिया का दाखवु शकत नाहीत ? का त्या माणुस नाहीत ?द सेकंड सेक्स या स्त्रीवादाचं बायबल समजल्या जाणार्या पुस्तकात याबद्दल एक संपूर्ण धडा आहे. त्याहून अधिक मूलगामी आणि/किंवा वेगळे विचार माझ्याकडे नाहीत.
In reply to गुडाडगुड.. by मस्त कलंदर
In reply to -१. by प्यारे१
In reply to हसंच होतं दुसरं काही नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, द सेकंड सेक्स या स्त्रीवादाचं बायबल पुन्हा पुन्हा वाचण्याची आणि नीटपणे समजून घेण्याची गरज आहे.त्यावर कुठे लिखाण झालेले आहे का? पुस्तक वाचले, छान आहे. पण त्याचे खंडनमंडन मराठी आंजावरती नाही वाचले.
In reply to +१ सहमत. बाय द वे, द सेकंड by बॅटमॅन
In reply to द सेकंड सेक्स बाबत जालावर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपापल्या सोयीचे संदर्भ घ्यायचे आणि पाठीवर शाबासकी मिळवुन घ्यायची इतकंच मला दिसलं आहे.अगदी अगदी. एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ. किमानपक्षी त्यात तरी नावीन्य आणा म्हणावं :) बाकी पुस्तकात स्वतःचे मंडन उत्तम केलेले आहे हे नक्की. (त्या पुस्तकाच्या नावामुळे हातात घेतलं आणि सुरुवातीची निराशा नंतर इंटरेस्ट मध्ये कधी बदलली तेच कळालं नाही.)
In reply to आपापल्या सोयीचे संदर्भ by बॅटमॅन
अगदी अगदी. एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ. किमानपक्षी त्यात तरी नावीन्य आणा म्हणावंमाझ्या डोक्यातही हेच आले होते. अजून कुणालाही जाणवले हे वाचून बरे वाटले. काही लोक केवळ मृत्युंजय वाचून महाभारतावर अधिकारवाणीने बोलतात त्याची आठवण झाली. ८ मार्च च्या काळात आलेल्या लेखांत पण या पुस्तकाचा आणि लेखिकेचा उल्लेख अनेकदा केला होता. तेव्हा मला तेच तेच संदर्भ देणारे काही समीक्षकीय लेखन आठवले होते. इब्सेनची नोरा दरवाजा आपटून गेली त्याची आठवण अशा समीक्षकांना दर तिसऱ्या लेखात होत असते. एके काळी इतके वाचले होते की खुद्द इब्सेन न वाचता मी पण नोरा आणि तिच्या दारावर २ मिनिटे बोलू शकतो असतो. अवांतर :- मार्च मधील मॅडनेस च्या काळात एक विडंबन टाकायची उर्मी मनात दाटून आली होती. तेव्हा मी "द फर्स्ट फोरप्ले" अशा पुस्तकाचा संदर्भ देणार होतो वारंवार ;-)
In reply to अगदी अगदी. एकच एक पुस्तक आणि by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आपापल्या सोयीचे संदर्भ by बॅटमॅन
In reply to इतर by मन१
एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ.'स्त्रीवादाचं बायबल' असं बिरूद या पुस्तकाला इतर अभ्यासकांनी निष्कारण जोडलेलं नाही. सिमोनने मांडलेले आहेत त्याहून अधिक आणि/किंवा जास्त मूलभूत विचार इतर कोणी लिहील्याचं माझ्या वाचनात नाही. कोणाच्या माहितीत असेल तर कळवणे. (हमारी मांगे पूरी करो..., बाप दाखव ... ) अन्यथा स्थानिक आणि/किंवा तत्कालिन संदर्भ, ऐतिहासिक संदर्भ यांच्यासंदर्भात करूणा गोखले (बाईमाणूस), मंगला आठलेकर (महापुरूषांच्या नजरेतून स्त्री, महर्षी ते गौरी) आणि अर्थातच ताराबाई शिंदे (स्त्री-पुरूष तुलना) ही नावं सहज आठवली. राजन खान (बाईजात) यांचं लिखाण फार भडक आणि ऑबव्हीयस (मराठी?) वाटल्यामुळे वाचत नाही. अजून काही पुस्तकं मानवशास्त्रातील लिंगभावाची शोधमोहीम (लीला दुबे, अनुवादः विद्युत भागवत), स्त्री विरूद्ध पुरूष (शिवराज गोर्ले) ही पुस्तकंही तपशील भरण्याचं काम करत आहेत. ---- सापेक्षता म्हटल्यावर आईनस्टाईन सोडून इतर काही नावच काढत नाहीत. अगदी सामान्य सापेक्षतावादाचं गणित सोडवणार्याचं नावही गूगल केल्याशिवाय आठवत नाही. --- 'माय फेअर लेडी' असो वा 'पिग्मॅलियन', ते उच्चारशास्त्रामधलं मूलभूत काम नव्हे. त्यात फक्त तपशील, उपयोजन आहे.
In reply to व्यक्तिगत बकवास by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे हो, खालच्याच एका प्रतिसादात इतर काही लिंका दिलेल्या आहेत. त्यात कुठेच सिमोनचा संबंध नाही, ना 'सेकंड सेक्स'चा! असे इतर अनेक प्रतिसाद नजरेआड करणं हेतूपुरस्सर आहे का दृष्टीदोष?खालच्या लिंका स्त्रीवादाच्या ओव्हरऑल सीनबद्दल नाही बोलत. एकतर निव्वळ विदा नैतर कायद्याची कलमं अस्लाच कैतरी प्रकार. विदा म्हणजे निष्कर्ष नाही हे सांगायला कोणा महालानोबिसांची गरज नै. त्यामुळे सेकंड सेक्स सारख्या पुस्तकात जे दिलंय तत्सम कंटेंट इथे नाही हे सरळ असतानादेखील त्याचा हवाला देणे हा कसला दोष? इतर काही लेखक लेखिकांची नावे दिलेली आहेत हे चांगलेय. इतर रेफरन्सेस दाखवल्यामुळे स्त्रीवादाचा किती लोकांनी कसा विचार केलाय हे कळण्यास मदत होते, मग तो वरिजिनल असो वा डेरिव्हेटिव्ह असो.
सापेक्षता म्हटल्यावर आईनस्टाईन सोडून इतर काही नावच काढत नाहीत. अगदी सामान्य सापेक्षतावादाचं गणित सोडवणार्याचं नावही गूगल केल्याशिवाय आठवत नाही.मुळात ही तुलनाच गैरलागू आहे. सापेक्षता ही कल्पना त्याने एकट्याने मांडली म्हणून त्याचे नाव घेतले जाते. स्त्रीवादाबद्दल असे म्हणता येईल का?? नसेल तर इतर कोण लोकं आहेत , त्यांचे काय विचार आहेत, हे लोकांसमोर आलं तर नको का? मराठी आंजाच्या माझ्या तोकड्या अभ्यासात मला फारसं काही दिसलं नाही या बाबतीत. चूक असेल तर सप्रमाण दा़खवून द्यावी. मी आनंदाने प्रकाटाआ करेन, हाकानाका :)
In reply to अरे हो, खालच्याच एका by बॅटमॅन
सेकंड सेक्स सारख्या पुस्तकात जे दिलंय तत्सम कंटेंट इथे नाही हे सरळ असतानादेखील त्याचा हवाला देणे हा कसला दोष?या धाग्यावर विचारलेला मूळ प्रश्न स्त्रिया एकजूट का दाखवत नाहीत, असा काहीसा होता. या(ही प्रश्ना)चं उत्तर 'द सेकंड सेक्स'मधे सिमोनने अतिशय खोलात जाऊन दिलं आहे (आणि आठलेकर, गोखले* मंडळींनी दिलेलं नाही), अशा प्रकारचं विधान मी केलं हा जणू माझ्या लिखाणातला दोष आहे अश्या पद्धतीने आरोप केल्यावर तितपतच तर्क देऊन (दोष)साधर्म्य दाखवलं.
सापेक्षता ही कल्पना त्याने एकट्याने मांडली म्हणून त्याचे नाव घेतले जाते.गुरूत्वाकर्षण इत्यादींवर काम करणारे सापेक्षतावाद पुन्हा शोधायला जात नाहीत. ते मॉडीफाईड न्यूटोनियन डायनॅमिक्स, डार्क मॅटर डिस्ट्रीब्यूशन आणि इतर गोष्टींवर काम करतात. गोखले, आठलेकर* वगैरे मंडळीही सिमोनने केलेलं मूलभूत काम पुन्हा करत नाहीत. इतरांची नावं न घेण्याचं कारण एवढंच की गुरूत्वाकर्षणावर केलेलं काम प्रकाशित करताना हायजेनबर्ग, चॅडविक वगैरे लोकांचे संदर्भ निष्कारण दिले जात नाहीत. असो. *१. हीच दोन नावं मुद्दाम घेतली कारण या दोघींच्या तर्कशुद्ध आणि रोखठोक लिखाणाच्या मी प्रेमात आहे. तरीही त्यांचं काम अतिशय मूलभूत स्वरूपाचं आहे असं मला वाटत नाही. अन्यथा मंगला गोडबोले त्यांच्या गोष्टींमधूनही विनोदी शैलीत स्त्रीवादी विचार मांडतात. २. अवांतरः 'बाईमाणूस' संदर्भात राजेशने एक लेख लिहीला होता.
In reply to सेकंड सेक्स सारख्या पुस्तकात by ३_१४ विक्षिप्त अदिती
या धाग्यावर विचारलेला मूळ प्रश्न स्त्रिया एकजूट का दाखवत नाहीत, असा काहीसा होता. या(ही प्रश्ना)चं उत्तर 'द सेकंड सेक्स'मधे सिमोनने अतिशय खोलात जाऊन दिलं आहे (आणि आठलेकर, गोखले* मंडळींनी दिलेलं नाही), अशा प्रकारचं विधान मी केलं हा जणू माझ्या लिखाणातला दोष आहे अश्या पद्धतीने आरोप केल्यावर तितपतच तर्क देऊन (दोष)साधर्म्य दाखवलं.तुमच्या लिखाणातला दोष आधी कोणीच दाखवला नव्हता तर इन जनरल विधान होते ते. असे असून वैयक्तिक आधी जाऊन , मग नंतर वैयक्तिक प्रत्युत्तर आले तर परत गळा काढू नये.
गुरूत्वाकर्षण इत्यादींवर काम करणारे सापेक्षतावाद पुन्हा शोधायला जात नाहीत. ते मॉडीफाईड न्यूटोनियन डायनॅमिक्स, डार्क मॅटर डिस्ट्रीब्यूशन आणि इतर गोष्टींवर काम करतात. गोखले, आठलेकर* वगैरे मंडळीही सिमोनने केलेलं मूलभूत काम पुन्हा करत नाहीत. इतरांची नावं न घेण्याचं कारण एवढंच की गुरूत्वाकर्षणावर केलेलं काम प्रकाशित करताना हायजेनबर्ग, चॅडविक वगैरे लोकांचे संदर्भ निष्कारण दिले जात नाहीत.बरं. स्त्रीवादाबद्दल आमचं सेकंड सेक्स पलीकडे जास्त वाचन नाही. त्यामुळे याबद्दल अन्य काही वरिजिनल युरोपियन /भारतीय/ अमेरिकन/अन्य वैग्रे लोकं असतील आणि त्यांनी कैतरी लिहिले असेल तर ते समोर यावे म्हणून म्हणालो. तर भौतिकशास्त्र मध्ये आणलेत. आणण्यालाही हरकत नाही, पण त्याची उपमा/शिरा इथे बरोबर लागू होत नाही. कारण सापेक्षता वैग्रे मध्ये मूलभूत काम फक्त ऐन्स्टैनने केले तसे स्त्रीवादात मूलभूत काम फक्त सिमॉन ने केले आहे का? साधे विकीपांडित्य दाखवले तरी बर्याच लोकांची नावे दिसतात. भैतिकशास्त्रात नवनवीन थेर्या मांडणारे स्ट्रिंगवाले, लूपवाले वैग्रेंची नावे मधूनमधून का होईना कानावर आदळत असतात. पण त्या लिंकेतले लोक मात्र आम्ही नै ऐकले ब्वॉ कधी. आमचा सिलेक्षन बायस असेल तो, पण स्त्रीवादात इंट्रेस्ट असणार्यांनी तरी मराठी आंजावर अथवा वाङ्मयात यांची दखल घेतलेली आहे, असे नै दिसले. त्यामुळे जर कोणी म्हटले, की "एकच एक पुस्तक आणि त्यातले तेच ते संदर्भ ," तर त्यात चूक असे काहीच नाही. बाकीच्यांचे नामोनिशान न दिसल्यामुळे हे विधान केले गेले आहे, मूलभूत काय आणि उपयोजित काय वैग्रेंच्या अज्ञानामुळे नाही. त्याला उत्तर म्हणजे निव्वळ जे झाले / होते आहे त्याचे रॅशनलायझेशन करणे असे नसून इतर रेफरन्स देणे किंवा स्वतः कैतरी लिहून बाकीच्यांची ओळख करून देणे हे आहे.
In reply to व्यक्तिगत बकवास by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नेहमीची ( तिरकस) रडारड असली by सुहास..
In reply to चिलखत ऑनलाईन बुक करा by चित्रगुप्त
या चिलखताचे रिमोट कंट्रोल घरी पालकांकडे ठेवण्याची सोय, तसेच त्याची एक कळ दाबल्यावर चिलखत कार्यरत होऊन आतील व्यक्तीसकट घरच्या दिशेने चालायला लागून सातच्या आत घरात पोचण्याची गॅरंटीही सूचना अगदी मान्य आहे. मुलींच्या हातात पासकोड दिला तर त्या त्याचा दुरूपयोग नाही करणार? आणि हो, भारतीय संस्कृतीचे महान पाईक, हे अध्यात्मिक गुरू, यांच्याबद्दल काही बोलू नका. त्यांच्याकडून चिक्कार मटेरियल मिळतं! ;-)
In reply to हे काय आहे? by रामपुरी
यापैकी नक्की कसला प्रयत्न आहे?इथे या लेखाचा मुख्य उद्देश बरोब्बर पकडला आहे. (दुवा ऐसी अक्षरेवर जातो. आपापल्या जबाबदारीवर उघडावा.) मला न जमलेला आणि अधिक भर घालणारा खोचकपणा इथेच चित्रगुप्त काकांनी दाखवला आहे. १-६ या गोष्टी भारतात कायद्याने गुन्हा नाहीत. रेव्ह पार्टीचा विषय (या किंवा 'गुवाहाटी आणि बागपत' या धाग्यातही) मी काढलेला नाही. तरीही माझं मत हवं असा हट्टच असेल तर तसं वेगळं विचारा.
(शेवटी स्वातंत्र्याचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून आहे म्हणा तेव्हां चालू द्या)बौद्धीक आणि शारीरिकही! उदाहरणार्थ, ब्रिटीश साईझ ८ चे कपडे घालायचं स्वातंत्र्य (ब्रिटन आणि भारतात) सगळ्यांना आहे, पण ठराविक आकारापेक्षा स्थूल वा सूक्ष्म असणार्यांना ते जमत नाही. तसंच स्त्रियांचे कपडे वापरण्याचं स्वातंत्र्य पुरूषांना आहे, हे स्वातंत्र्य फार पुरूष वापरत नाहीत. विशेषतः दुसर्या महायुद्धानंतर स्त्रिया हे स्वातंत्र्य उपभोगायला शिकल्या, शिकत आहेत. अवांतरः पब्लिक या महाजन आणि सामान्यमान्य शब्दाचा उगम ब्रिटीश पब संस्कृतीमधेच आहे.
In reply to यापैकी नक्की कसला प्रयत्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to :) by रामपुरी
भारतात कायद्याने बर्याच गोष्टी गुन्हा नाहीत तेव्हां त्या सर्व बरोबर आहेत असं म्हणावं काय?मी कायद्याचा अभ्यास केलेला नाही त्यामुळे त्या बर्याच गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. पण कायदाही कधीमधी नको तिथे तोंड खुपसतो (असं माझं मत आहे.) याची काही उदाहरणं माहित आहेत. कधीमधी वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमधले आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कायद्याचे अर्थ आधीपेक्षा वेगळे लावतात. याचं चटकन आठवणारं उदाहरण कलम ३७७.
१. भारतात बाहेरख्याली पणा कायद्याने गुन्हा नाही (पुरूष आणि स्त्रिया दोघांसाठी) २. गरोदर असताना स्त्रियांनी दारू पिणे गुन्हा नाही ३. घरात धूम्रपानाला बंदी नाहीघटना, ़कायद्याने लोकांना ठराविक गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. करावं का नाही याची याचा निर्णय आणि कृत्याच्या परिणामाची जबाबदारीही पर्यायाने लोकांकडेच दिलेली आहे. बाहेरख्यालीपणाने घटस्फोट, विशिष्ट रोग होणे, गर्भारपण इ. घडल्यास त्याची जबाबदारी प्रत्येकाची आपापली आहे, घटनेची, सरकारची, पोलिसांची, न्यायसंस्थेची नाही. कायद्याप्रमाणे बाहेरख्यालीपणा हे घटस्फोटासाठी पुरेसं कारण आहे. भारतात घटनेला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि घटनाही अनेक गोष्टींबद्दल, (उदा: कशा प्रकारचे कपडे घालावेत, कोणत्या आस्थापनेत, दुकानात कधी, कोणी जावे, इ.) भाष्य करत नाही.
मला नेहेमीच एक प्रश्न पडतो, उत्तान कपडे घालून निघलेल्या एखाद्या मुलीकडे बघून ...मला नेहेमीच एक प्रश्न पडतो, उत्तान कपडे कोणते हे कोण ठरवणार? खांद्यांपासून पावलांपर्यंत संपूर्ण शरीर झाकणारा, ढगळ, अपारदर्शक नाईट ड्रेस घालून मला एकदा बिल्डींगमधल्या एकांकडे जावं लागलं. त्या घरातल्या आजोबांनी त्या कपड्यांवरही आक्षेप घेतला होता, जे कपडे मला, माझ्या भावाला, वडलांना नॉर्मल वाटत. शाळेचा गणवेश (गुडघ्या-पोटर्यांखाली पाय उघडे टाकावे लागायचे) घालून रस्त्यातून जाताना माझ्याकडे पाहून एका मुलाने शिट्टी मारली होती. माझ्या घराबाहेर पडण्याचा उद्देश तेव्हा सफल झाला असं काही मला वाटलं नाही ब्वॉ! वर मी घरी येऊन या प्रकाराची तक्रारही केली. नऊवारी जाऊन पाचवारी आली तेव्हाही पाचवारी सभ्य नसण्याचे आक्षेप घेतल्याचं मिपावरच वाचलं.
... नुकसान आपलंच असतं म्हणूनच पोलिस सुद्धा घराला कुलूप लावूनच बाहेर पडत असतात.कमी कपडे म्हणून लैंगिक अत्याचार हा कार्यकारणभावच मुळात चुकलेला आहे. पूर्ण कपड्यांतल्या बायकांनाही अत्याचारांना सामोरं जावं लागतं, 'गुवाहाटी आणि बागपत' या धाग्यात अनेक स्त्री-आयडींचे अनुभव सांगणारे प्रतिसाद अशाच अर्थाचे आहेत. कपड्यांच्या लांबीरूंदीचा 'नुकसान' होण्याशी काहीही संबंध नाही. अनेक सेक्स अफेंडर्सचं प्रोफायलिंग करूनही हाच निष्कर्ष निघातो. मी वाचलेल्या बातम्यांप्रमाणे, गुवाहाटीच्या या मुलीचं पबच्या आत कोणाशीतरी भांडण झालं आणि त्याचं पर्यवसान या निंदनीय घटनेत झालं. भांडण पबमधे होऊ शकतं तसं शाळा, कॉलेजातही होऊ शकतं. शिवाय एका बातमीप्रमाणे एका पत्रकाराने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आहेत. कपड्यांच्या लांबी-रूंदीचा पुन्हा एकदा संबंध नाहीच. (मोनिका नव्हे) ममता शर्मांच्या वक्तव्याचा संदर्भ हा फक्त निषेधासाठी दिलेला आहे, किरण बेदींच्या निषेधाप्रमाणेच (जो संदर्भ अनिकेतच्या ब्लॉगमधे आहे). (दुवा वेगळ्या प्रतिसादाचा होता. चित्रगुप्त काकांचा प्रतिसाद इथेच आहे असं आधीच्या प्रतिसादातही लिहीलेलं आहे.)
In reply to हे काय आहे? by रामपुरी
शेवटी स्वातंत्र्याचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून आहे म्हणाअगदी बरोबर. आणी म्हणूनच आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा वापर योग्य कारणासाठीच करत आहोत. तुम्हाला काळजी नसावी.
In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती जी, लेख मस्त चुरचुरी झाला आहे. by निश
स्त्रियांवर होणार्या अन्यायात वाढ होत असल्यामुळे मन खंतावत ही होत.स्त्रियांवर अजूनही अन्याय होत असला तरीही होणारा अन्याय वाढता आहे याच्याशी असहमती. पूर्वी मुलींना न शिकवणे, बालिकांचे म्हातार्यांशी लग्न लावून देणे, मनाविरूद्ध डोक्यावर सवत बसवणे, जिवंतपणी धर्माच्या नावाखाली जाळणे, विधवांना अतिशय विरूप आणि अत्यंत नीरस आयुष्य जगायला लावणे, विधवांचा शारीरसुखासाठी उपयोग करून त्यातून स्त्री गरोदर राहिल्यास तिचं जिणं हराम करणे अशा अनेक गोष्टी न्याय्य समजल्या जात असत. आज या गोष्टी धडधडीत अन्याय्य समजल्या जातात त्यामुळे रूपकंवर, गुवाहाटीसारख्या गोष्टींना सहज वाचा फुटते, समाजातून अशा (अपवादाने दिसणार्या) कृत्यांचा निषेधच होतो. स्त्रियांवर होणार्या अन्यायाचेही अनेक स्तर आहेत याबद्दलही आता चर्चा होतात. वर उल्लेख केलेल्या गोष्टी समाजाने सरसकट नाकारलेल्या आहेत. समाजाचा एक हिस्सा या गोष्टी सर्रास करत असला तरीही हुंडा, हुंडाबळी हे कायदाबाह्य प्रकार आजही होत असले तरी त्याबद्दल समाजात वाढती नाराजी आहे. स्त्रीभ्रूणहत्येबद्दलही हेच म्हणता येईल. समाजाच्या दुसर्या एका हिश्श्यात योनीशुचिता वगैरे "गया-गुजर्या", पुराणमतवादी कल्पना असल्याचंही मत आहे. करियर म्हणून, स्वतःला एक व्यक्ती म्हणून प्रस्थापित करण्यासाठी नोकरी, व्यवसाय करणार्या स्त्रिया 'आपल्यातल्याच' समजणार्या समाजात बाईच्या आयुष्याची इतिकर्तव्यता लग्नात नाही, अशा प्रकारचे विचार अगदी सहज दिसून येतात. मध्यमवर्गात बर्यापैकी खप असणार्या लोकप्रभा*मधेही योनीशुचितेच्या नावाने शंख करणारं लेखन दिसतं. गुवाहाटीच्या प्रकारातल्या दोषींबद्दल चीड येणं, आजच्या काळाचा विचार करता सहाजिकच आहे. ही टवाळी त्या घटनेसंदर्भात नाही. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा साप सोडून भुई धोपटत आपली संस्कृती इतरांवर लादू पहाणार्या वृत्ती दिसत राहिल्या त्याचा निषेध करणारी ही टवाळी आहे. "छेड न काढली गेलेली मुलगी" मिळणं कठीण आहे आणि हे वास्तव कटू आहे हे आपण सहज स्वीकारतो. त्याचबरोबर कसे कपडे घाल, घालू नको असल्या प्रकारच्या सूचना देणारे लोकं भेटलेले नाहीत अशी मुलगी भेटणंही कठीण आहे. अनेक मुली आपल्याला काय हवं तेच करतात पण सत्ता गाजवण्यासाठी मुलींचा वापर करणार्या प्रवृत्तींचा अजूनही म्हणावा तसा निषेध होत नाही. *या साप्ताहिकाबद्दल माझं व्यक्तिगत मत थोर नाही. स्त्रीमुक्तीच्या नावाखाली जे छापतात त्यातही काही वेळा अर्धवट समजूतीवर आधारित, वैद्यकीय सत्याचा अपलाप करणारं लिहीलेलं असतं.
In reply to स्त्रियांवर होणार्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती जी, तुमच म्हणण खरच योग्य आहे. by निश
In reply to छान by सुनील
अवांतर - वर तुम्ही दिलेली पब्लिक ह्या शब्दाची व्युत्पत्ती रोचक! मी त्याला ग्रीकोत्पन्न मानीत होतो.तेही शक्य आहे. ब्रिटीश समाजाच्या तोंड न उघडण्याबद्दल फार लिहायला नको. पबमधे जाऊन हे लोकं तोंड उघडतात, लीक होतात म्हणून पब्लिक असं मी ऐकलेलं आहे. इंग्लिश भाषेत जी काय महान सरमिसळ आहे आणि ब्रिटीशांची तिरकस विनोदबुद्धी हे दोन्ही पहाता असे रोचक किस्से मागाहूनही तयार झाले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
In reply to आपल्या देशात दलित महिलेची by निनाद मुक्काम …
आपल्या कडे अमेरिकन नागरिकांची हत्या करणाऱ्या नराधम लादेन ला क्रूरकर्मा म्हणून भारतीय प्रसारमाध्यमे बोंबाबोंब करतात.मात्र व त्याच्याहून जास्त बळी घेणारा रणवीर सेनेच्या प्रमुखाच्या हत्येच्या बातमीवर चर्चा सत्रे झडत नाहीत. अन्याय कोणावर झाला ह्यावर आजकाल बरेच काही अवलंबून असते.हे निरीक्षण बर्यापैकी पटलं तरी प्रतिसादाचा पूर्वार्ध पटला नाही. अशा प्रकारे वैतागून फार काही साध्य होणार नाही. कोणाच्यातरी पोटाला दोन वेळचं पुरेसं मिळत नाही म्हणून दुसर्याची उच्च कोलेस्टेरॉलची तक्रार अप्रामाणिक समजावी का? एखाद्याचा औषधोपचाराअभावी मृत्यु होतो म्हणून सचिन तेंडूलकरच्या टेनिस एल्बोची तक्रार सोडवायची नाही का?
In reply to आपल्या देशात दलित महिलेची by निनाद मुक्काम …
In reply to हॅ हॅ हॅ सौ चुहे खाके बिल्ली by शिल्पा ब
In reply to ब ताई नेहमीच वैचारिक अल्सर by निनाद मुक्काम …
In reply to पब आणि ड्रग्स by चित्रगुप्त
In reply to मुंबईत पब्स म्हणजे अगदीच काही by निनाद मुक्काम …
In reply to ब ताई नेहमीच वैचारिक अल्सर by निनाद मुक्काम …
In reply to अमेरिका आणि युरोप मधे by चित्रगुप्त
- Approximately 2/3 of assaults are committed by someone known to the victim
- 38% of rapists are a friend or acquaintance
वरकरणी सुरक्षित दिसणार्या समाजात सुद्धा असे काही घडत असेल यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते.खेदाने हो असं म्हणावंसं वाटतंय. परंपरेने स्त्रीला देव समजा नाहीतर निम्न प्रतीची व्यक्ती अत्याचार होतातच. "अजा पुत्रं बलिं दद्यात ..." ही मानसिकता बदलण्याला पर्याय नाही.
कायदे स्ट्रिन्जन्ट (कठोरात