फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)
आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी.
_______________
त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे:
१)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig..
२) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad
3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya?
4)(भा.प्र.वे. 2.00) (हे वाचून तर मी हसून वेडा झालो) hi mitr-mitrinino..dupaar jhali..yaa jhopaylaa..! :D
5)(भा.प्र.वे. 4.00) @ ghhadge andi depo for bying eg.........................
6) (भा.प्र.वे. 8.00) gud nayiet frend..udya bhetu..!
ह्या पोस्ट्सखाली कुठल्यातरी फेक प्रोफाइल असलेल्या अनुष्का शर्माचे चित्र असलेल्या कोण्या (आपण तिला तात्पुरते 'कत्रिना' म्हणू ) ललनेचा एक लाईक असतो आणि त्याखाली..Thanks Katrina.u look butiful अशी ही एक प्रोफाईलधारकाची कॉमेंट असते..!
________________________
दुसर्या एकाने हैट्ट स्टेटस टाकले म्हणे (खरे खोटे तो झुकरबर्ग जाणे) ते असे ....'सुहाग रात है, घुंघट उठा रहा हूं मैं'..... हसू नका, अजिबात हसू नका.... हे अजून खरे असो वा नसो, नजीकच्या भविष्यकाळात वाचायला मिळेल याबद्दल मला तरी खात्री आहे.
चला आता तुम्ही वाचलेले खरे/खोटे फेसबुक स्टेटस सांगा बघू. अट एकच ह.ह.पु.वा झाली पाहिजे.
ता.क.: असले स्टेटस टाकणे ही एक न-कला आहे असे आम्ही मानतो म्हणून हा धागा कलादालन सदरात आहे.
वाचने
7374
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
कालिंग इंटरणेट स्नेही... काय
In reply to कालिंग इंटरणेट स्नेही... काय by स्पा
एकदम चोक्कस स्पांडेशदादा!
In reply to एकदम चोक्कस स्पांडेशदादा! by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा
In reply to कालिंग इंटरणेट स्नेही... काय by स्पा
हीहीही!
Epic Status and comments-
मोरे
लोक कायपन स्टेटस अपडेट करुन
अपेक्षाभंग. रमताराम नाव वाचून
In reply to अपेक्षाभंग. रमताराम नाव वाचून by नाना चेंगट
अहो
In reply to अहो by रमताराम
आमचा मान हिरावून घेऊ नका !
हाहाहा! या धाग्याकडून खूप
हा बघा एक ताजा अपडेट
आमचा आणा..