मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदी मराठी प्रशासकीय नावे

श्रीरंग_जोशी · · काथ्याकूट
मित्रांनो आपण बरेचदा शासकीय कार्यालयांवर इंग्रजी खेरीज हिंदी (केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्यास) व मराठी (राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्यास) नावे वाचतो पण बहुतांश वेळा त्यांच्या इंग्रजी नावांचा व्यवहारात उपयोग होतो. पण लक्ष देऊन वाचल्यास भारतीय भाषांतील नावे कधी फार मजेदार तर कधी फार कंटाळवाणी वाटतात. उदा. पुण्यातील बायपास रस्त्याचे मराठी नाव - कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्ग (सलग १० वेळा म्हणायला गेल्यास कच्चा पापड पक्का पापड सोपे वाटेल). पण जर आपण लक्ष देऊन ही नावे समजून घेतली अन त्यांचा वापर सुरू केला तर अनेक फायदे होतील, जसे १) आपल्या भाषांमधले कमी वापरल्या शब्दांचे अर्थ अधिक चांगल्या प्रकारे कळू लागतील २) यातील बहुतांश उच्चारायला जरा अवघड वाटतील पण त्यांचा वापर करून करून बऱ्याच उच्चारदोषांचे उच्चाटन करता येईल. व एखादी भाषा नव्याने शिकताना उच्चारक्षमतेत मिळवलेल्या लवचीकतेचा बराच उपयोग होईल. (याबाबत परदेशी भाषांत पारंगत असणाऱ्या मिपाकरांचे विचार ऐकण्यास उत्सुक). ३) ज्यांच्या कुटुंबात लहान मुले असतील तर अशी नावे उच्चारायचा सराव त्यांच्याकडून करून घेतल्यास त्यांची उच्चारक्षमता जोमाने विकसित होण्यास मदत होईल. ४) अनेक भाषातज्ज्ञांनी परदेशी संज्ञांना एतद्देशीय स्वरूप देण्याचे अवघड व बहुमोल कार्य केले आहे, त्यांच्या या कार्याचा आपापल्या परीने गौरव करता येईल. चला तर मग या धाग्यावर या प्रकारच्या नावांची चर्चा व त्याविषयी अधिक माहितीचे आदानप्रदान करूया. काही उदाहरणे:
इंग्रजी नाव हिंदी / मराठी नाव
Agricultural Products Marketing Committee (APMC) कृषी उत्पन्न बाजार समिती (कृ उ बा स)
Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
Maharashtra State Electricity Board (MSEB) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म रा वि म)
State Reserved Police Force (SRPF) राज्य राखीव पोलिस दल
Central Reserved Police Force (CRPF) केंद्रीय राखीव पोलिस दल
National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) राष्ट्रीय कृषी और ग्रामीण विकास बँक
National Environmental Engineering Research Institute (NEERI) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान
Defense Research and Development Organization (DRDO) रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन
अवांतर - महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिकांमधील सदस्यांना पूर्वी नगरपिते असे संबोधले जायचे. त्याचा अर्थ जरी नगराचे पालक असा होत असला तरी तो नगराचे रक्त पिते (पिणारे) असा घेतला जायचा. मुंबईचे महापौर असताना मनोहर जोशींनी त्याऐवजी नगरसेवक हा शब्द सुचवला जो पुढे जाऊन इतका रूढ झालाय की नगरपिते हा शब्द कधी अस्तित्वात होता याची शंका यावी.

वाचने 7097 वाचनखूण प्रतिक्रिया 23

In reply to by किसन शिंदे

श्रीरंग_जोशी Mon, 07/09/2012 - 05:16
काही वर्षांपूर्वी मराविम चे तीन कंपन्यांत विभाजन करण्यात आले...
इंग्रजी नाव मराठी नाव
Maharashtra State Power Generation Company Limited ( MSPGCL) / Mahagenco महानिर्मिती / महाजनको
Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MSETCL) महापारेषण / महाट्रान्सको
Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) महावितरण (यांना मात्र महाडिस्को असे नाव दिले नाहीये ;-))

श्रीरंग_जोशी Mon, 07/09/2012 - 05:00
इंग्रजी नावहिंदी / मराठी नाव
Jawaharlal Nehru Urban Renewal Missionजवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान (पुनर्निर्माण) योजना
Security Printing and Minting Corporation of India Ltd. (SPMCIL)भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम
Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
Housing and Urban Development Corporation (HUDCO) गृह व नागरी विकास महामंडळ
Small Industries Development Corporation (SIDCO) लघु उद्योग विकास महामंडळ

In reply to by श्रीरंग_जोशी

Small Industries Development Corporation (SIDCO) लघु उद्योग विकास महामंडळ महाराष्ट्रात SIDCO आहे का? माझ्या माहिती नुसार Maharashtra Small Scale Industries Development Corporation एमएस्सेसाडिसी आहे. राष्ट्रिय स्तरावर National Small Industries Corporation (NSIC) आहे. बहुदा तुम्हाला हडको नंतर सिडको (CIDCO) लिहायचे होते.

In reply to by प्यारे१

श्री. जोशी, दर दोन दिवसांनी तुमचा धागा यायलाच पाहिजे आणि तो सतत वर राहीला पाहिजे हा अट्टाहास का ? स्पष्ट शब्दात बोलायचे तर ही कुठली विकृती आहे ? तुम्हाला आडून आडून सांगून झाले, टिंगल करून झाली तरी तुम्हाला समजत नाही का ? का मुद्दाम वेड घेऊन पेडगावला जाणे चालू आहे ? तुमच्या भिकार लेखनाने आणि त्यावरच्या तुमच्याच टुकार प्रतिसादांनी अगदी रामदास काकांच्या लेखना सारखे लिखाण देखील खाली खाली जायला लागले आहे ह्याची तुम्हाला समज नाहीये का ? हे मिसळपाव आहे, तुमचे ओसाडगाव नाही. तेंव्हा दया करा आणि मिपाचा झणझणीतपणा टिकून राहू द्या. तुमच्या साखर घातलेल्या दह्याच्या पाकृ साठी वेगळा ब्लॉग उघडा आणि तिकडे दिवसभर पांढर्‍यावरती काळे करा. आणि हो, स्पष्ट शब्दात बोलल्याचा राग वैग्रे आला (त्याची शक्यता कमीच आहे) तरी दाखवायला येऊ नका. दोघांना फाट्यावरती मारले जाईल. परिकथेतील राजकुमार ह्यांनी ह्या धाग्याला भिकार अशी श्रेणी दिलेली आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट Mon, 07/09/2012 - 18:14
रोचक प्रतिसाद नाना चेंगट यांनी वरील प्रतिसादाला भिकारचोट अशी श्रेणी दिलेली आहे.

In reply to by पप्पुपेजर

-३ ;) इतक्या अप्रतिम धाग्याला अशी नावे ठेवता? नवीन लोकांनी मग मराठीतून अभिव्यक्त तरी कसं व्हायचं ऑ? अभिव्यक्ती हा वैयक्तिक मामला आहे. त्यात चांगलं वाईट ठरवणारे तुम्ही कोण?

In reply to by नाना चेंगट

गणपा Mon, 07/09/2012 - 18:21
काय दिवस उजाडलाय. नाना आणि पराशी सहमत व्हायची पाळी आली. देवा उचलरे बाबा लौकर. (काही नाहीये इथे............. आले लगेच पांढर्‍यावर काळं करायला) ;) गणपा यांनी वरील प्रतिसादाला खोचक अशी श्रेणी दिलेली आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मी पा वर कोणी काय लिहायचा आणि नाही लिहायचा हे तू कोण ठरवणारा ? मागच्या वेळेस सडेतोड उत्तर दिल म्हणून माझी comment संपादन मंडळी कडून काढून टाकली संपादन मंडळीना ह्या comments दिसत नाही का ? का दिसून न दिसल्या सारख्या करता ? एखाद्या नवोदित लेखकाला प्रोत्स्हान करायचं ? का नाउमेद करायच? संपादन मंडळीना खुले आव्हान,कि असे कोणी काय लिहायचं आणि नाही लिहायचं हे ठरवाचा अधिकार फक्त तुम्हाला आहे का कोणीही उठ सूट ठरवू शकतो ? संपादित.

In reply to by स्वप्निल घायाळ

प्यारे१ Tue, 07/10/2012 - 15:49
जौ द्या ओ... ! येक डाव माफी द्या . ते परा डोक्यावर पडलंय. पण घायाळ साहेब काही लक्षात आलेल्या गोष्टी : लेखक नवोदित नाही /वाटत नाही. २ दिवसाला सरासरी एक अशा गतीनं त्यांनी आपले धागे टंकले आहेत नि प्रसिद्ध देखील केलेले आहेत. त्याच्याहून जास्त गतीनं स्व तःच्या धाग्यावर त्यांनी प्रतिसाद टंकले आहेत जे कधी कधी धाग्या पेक्षा मोठे आहेत. अशा धागाकर्त्यासारख्या सिद्धहस्त लेखकाला आपण 'नवोदित' म्हणून त्यांचा आपणच अपमान करु इच्छित नाही आहात ना? बघा ब्वा!

In reply to by परिकथेतील राजकुमार

रामपुरी Wed, 07/11/2012 - 10:52
समस्त मिपाकरहो आजपासून कुणी, कुठे, कसं आणि काय लिहावं हे ठरवण्याचे सर्वाधिकार श्री. रा. रा. परिकथेतील राजकुमार ( सर्वज्ञानी, प्रकांड पंडीत... सर्व स्वघोषित) यांना देण्यात येत आहेत. हाच नियम प्रतिसादांना सुद्धा लागू करण्यात येत आहे. हे मिसळपाव आहे, ओसाडगाव नाही. उगीच उचलली बोटे लावली कळ फलकाला हे याउप्पर चालणार नाही. अशी परवानगी न घेता येणार्‍या धाग्यांना आणि प्रतिसादांना भिकार श्रेणी देण्यात येईल ( असल्या श्रेण्यांना फाट्यावर मारू नये, चालवून घेतले जाणार नाही). आणि हो, अश्या स्पष्ट शब्दात बोलल्याचा राग वैग्रे आला (त्याची शक्यता कमीच आहे) तरी दाखवायला येऊ नका. दोघांना फाट्यावरती मारले जाईल.

गवि Mon, 07/09/2012 - 11:38
कुर्ला स्टेशनजवळील "ऊपरी उपस्कर अनुरक्षण केंद्र", त्याशिवाय दिल्लीला असलेलं "बेतार अनुसंधान एवं समन्वय स्कंध" आणि पुण्याबाहेर जुन्या मुंबई रस्त्याच्या सुरुवातीला असलेलं "वळूबीज गुणन प्रक्षेत्र" ही नावं कशी वाटतात?