घुसमट
घुसमट-भाग १
स्वयपाक घरच्या दाराची कडी खळकन निघाल्याचा आवाज तिने ऐकला. ताठरल्या शरीरान श्वास रोधून ती पडून राहिली. क्षणा दोन क्षणातच बेडरूमच्या दारावर धसफशीचा आवाज आणि पाठोपाठ एक सणसणीत लाथ!
'स्साली' त्याच्या तोंडून निसटलेली शिवी तिला लख्ख ऐकू आली. बाजूला झोपलेल्या दोन्ही मुलांकडे तिने पहिले. आईच्या कुशीत निर्धास्त होती ती! घामान डबडबलेला चेहरा पुसत ती उठून बसली. हॉल मध्ये काहीतरी फेकल्याचा आवाज अन मग शांतता!!!
दारावर लाथ घालणारा, तिचा नवरा होता! तिच्या दोन मुलांचा बाप ! सहाच महिन्यापूर्वी तिला घटस्फोट देऊन दुसर लग्न केलेला! त्याच्या शिवाय जगाव लागेल याची कल्पना कधीच न केल्यामुळे, उध्वस्त झाली होती ती. कोर्टाच्या फेऱ्या , वकिलांचे सल्ले, नातेवाईकांचे शेरे, या सगळ्या चक्रातून उस पिळावा तशी पिळवटली होती. त्याच्या पगारातून मिळणाऱ्या पोटगीवर घर चालण शक्यच नव्हत, मग याच निवडण टिपण, त्यांचा स्वयंपाक अशी अडली नडली काम करायला लागली होती ती.
अन आज सहा महिन्यान तो मुलांना भेटायच्या सवलतीचा बहाणा करून आला होता. कोर्टात त्यान मुलांची जबाबदारी सपशेल नाकारली होती. ' मुलांना आईच हवी' हे त्याच तत्वज्ञान तिन खाल मानेन ऐकल होत. पण काल आल्यापासून मुलांशी बोलताना , त्यांच्याशी खेळताना , तिला जाणवत होती ती त्याची नजर! हावरी लोचट नजर!
'पप्पा तुम्ही घटस्फोट घेतला ना?' चार वर्षाचा प्रज्वल बोलून गेला .
'अरे घटस्फोट कोर्टासाठी ! म्हणून नाती थोडीच तुटतात?' त्याचा अर्धा प्रश्न तिला होता.
'अरे मी तुमचा बापच आहे ! भारतीय परंपरेनुसार काही बदललं नाही .'
अच्छा ! म्हणजे तिन आजही त्याला नाही म्हणायचं नाही!
धसमुसळा तर तो पहिल्यापासूनच होता. तीच डोक सणकल! जेवण आटोपून तो हॉलमध्ये गेल्याबरोबर तिने दाराला कडी लावून टाकली. स्वयंपाक घर आवरून तिने मुलं झोपवे पर्यंत त्यान वाट पहिली , पण मग मात्र एखाद्या चोरासारखा तो स्वयपाक घराची कडी काढून आत आला होता ! बेडरुमच्या दाराच्या दोन कड्यांमूळे त्याला चरफडत परतावं लागल!
सकाळी ती नेहमीच्या गडबडीत रमून गेली.
'तुला गरज नाही वाटत का?' त्यान सरळच प्रश्न केला.
तो कानाआड करत तिने आपली काम चालू ठेवली. आज एकांचा वीस माणसांचा पोळीचा स्वयंपाक होता. ती एखाद्या चक्रासारखी भरभर आवरू लागली. सगळ आवरून डबे भरे पर्यंत त्यांचा माणूस दाराशी आला. त्याने दिलेले पैसे घेवून त्याला डबे वेळेवर परत करण्याची आठवण करून ती दमून टेबलाशी बसली.
'जेवण विकून कामावतेस?' त्याचा छद्मी प्रश्न
हल्ली तिला रडू सुद्धा यायचे बंद झाले होते. ती तशीच खाल मानेन बसून राहिली.
'अजून मंगळसूत्र अन कुंकू आहे ना?' तो परत बोलला.
'तुम्हाला किंमत आहे का त्याची?' ती उसळून बोलली.
तिच्या डोळ्यात रोखून बघत तो म्हणाला,' आहे ना! म्हणून तर आलोय. तुझी गरज भागवायला! आठ दहा महिने झाले असतील नाही? नाही , तू तशी कुठे बाहेर जाणार नाहीस म्हणून म्हंटल.'
आता मात्र तिचा संयम संपला. तिने सरळच टिकली काढून टेबलाला चिटकावली , पाठोपाठ मंगळसुत्र! तिचा तो संताप बघून तो खो खो हसू लागला,
' अग पुरुषांना सगळ चालत , बायकांना नाही चालत ' तस जुन पुराणाच तत्वज्ञान त्यान तिला सुनावलं.
एकूण समाजाची सारी बंधन , उपचार तिच्यावर लादून तो निर्धास्त होता. तो घरात आलेला समाजाला चालत होत. त्यान जबरदस्ती केली असती तरी समाज तिलाच हसला असता. कुणीतरी साखळदंडान पाय जखडावेत तस झालं तिला.
'आज परत जायला हवय. मी परत येईन. तो पर्यंत शांत होशील ना? खूप दिवस झाले, मला सवय लागलीय तुझी'
तो कोडगेपणा ऐकून ती मनातल्या मनात चरफडत राहीली.
त्याच्याशी तिने नऊ वर्ष संसार केला होता. आई बापांनी करून दिलेला , समाजाच्या दृष्टीने तिला साजेसा , पुरेस कमावणारा अशी सारी विशेषने असलेला तो नवरा होता. सहा वर्षाची मुलगी अन चार वर्षाचा मुलगा असं हेवा वाटण्याजोग आटोपशीर , औरस चौरस कुटुंब होत! होत त्यात समाधान मानून तिच्या चाकोरीबद्ध आयुष्यात ती सुखी होती. अन मग अचानक आलेल हे वादळ. त्याचे बाहेर कुणाशी तरी संबंध, ते वाद, ती भांडण , त्याला हवा असणारा घटस्फोट, या सगळ्यातून ती आत्ताशी कुठे बाहेर पडत होती. 'कुणाची तरी कोण' म्हणून ओळखीशिवाय , एक व्यक्ती म्हणून बाहेर जात होती. समोरचा एकाकी अन अभद्र रस्ता तिला दिसत होता , पण त्यात हा नव्यान आलेला प्रश्न नव्हता . सगळ संपल आता, आता नवरा हा फक्त अपुऱ्या पोटगी पुरता. इथून पुढे दोन कच्चीबच्ची घेऊन त्यांच्या कडे बघत जगायचं , हे तिन नक्की केल होत. पण देत असलेल्या पोटगीच मोल मागायला तो परत येईल याची तिने कधीच कल्पना नव्हती केली.
इतकी वर्ष त्याच्या बरोबर एकत्र राहिल्यान , ती त्याला लख्ख वाचू शकत होती. त्याच्या वागण्या बोलण्यात कायम , स्वत:च्या पुरुषत्वाचा उल्लेख असायचा. 'मी पुरुष आहे मला चालतंय.' 'मी पुरुष आहे मी करणार' ' या गोष्टी पुरुष करीत नाहीत, या बायकांनी करायच्या गोष्टी' हे सार त्याच्या बोलण्यात असे. कधी कधी उठून तिने वादहीं घातला होता. पण ते त्याचे संस्कार होते, आणि तसा विशेष या गोष्टीचा तिला फारसा जाच कधी वाटला नव्हता. उलट पुरुषाला थोडा अहंकार हवाच असं तीच मत बनल होत.
आज मात्र तो पुरुषी अहंकार एका नरात बदलला होता! त्याच्या कळपातली एक मादी म्हणून तिला वापरायचा तो प्रयत्न नव्हे तर हक्क समजत होता. त्यान बाहेर सुख शोधल तर ते रास्त होत. पण तिने मात्र फक्त त्याचाच शिक्का शरीरावर घेऊन जगायचं होत. खरच ! या आठ दहा महिन्यात तिला कधीच हीं जाणीव झाली नव्हती. घटस्फोटात आपल शारीरिक सुखही कायमच दुरावल हीं जाणीव तिला स्पर्शलीही नव्हती. होती ती फक्त समाजाच्या चौकटीत रहायची धडपड ! तशी ती फार वयस्क नव्हती, एकविसाव्या वर्षी लग्न अन एकोणतिसाव्या वर्षी घटस्फोट...!
सगळे विचार माग सारीत ती कामाला लागली, पुढची काम एकमेकात गुंतून गोंधळ होऊ नये म्हणून ती आलेली प्रत्येक ऑर्डर , प्रत्येक काम केलेन्डरवर लिहित असे.
"अरे! मार्च....? एप्रिल मध्ये मुलीचा वाढदिवस...."
तिच्या पोटात खड्डा पडला. म्हणजे या कारणान तो परत येणार.
तिने तासाभराच्या अंतरावर दुसर्या गावात रहाणार्या आईला पोस्टकार्ड टाकल. हल्ली प्रवासाची आणि गाडीभाड्याची चैन विचार करुन करावी लागायची तिला. सारच लिहिता येत नसल्यान वाढदिवसाच निमित्त तिलाही पुरेस होत.
घरात तिच्या आईला बघुन तो चमकलाच. पण मग परत डोळ्यात कावेबाजपणा घेउन त्यान मुलीला डिवचल
"काय ग? किल्ले बांधतेस का?"
रात्री टी.व्ही. वर लागलेल दूरदर्शन पाहुन त्यान मोठ्यान विचारल
"केबल बंद केल का?'
"मला परवडत नाही" तिने सरळच सांगुन टाकल
"मी देतो ना पैसे ." तो तिच्या आईकडे बघत बोलला."मुलांना बर पडेल."
"नको" ती तुटक बोलली.
तिची आई अगदे कानकोंडी होउन बसली होती. म्हंटल तर ती त्याच्या घरात राह्यली होती, म्हंटल तर ती आपल्या घटस्फोटीत मुलीला आधार द्यायचा प्रयत्न करत होती.
"हे बघा आई.."तो तिच्या आईकडे बघत बोलला," झाल ते झाल. विसरुन जा. अश्या उपचारांमुळे माणस तुटत नाहीत, नाही का? तुम्हाला मी आजपण आई म्हणुनच हाक मारतोय ना?"
त्याच्या त्या निर्लज्ज्पणाच्या कळसान तिचा संताप संताप झाला, काही सुचेनास झाल तिला.
उपरा कुणी जर वाकड्या नजरेन तिला पहाता तर ती उघड उघड विरोध करु शकली असती, पण हे सगळच अवघड होउन बसल होत. तिच्या नकाराची त्याला गंमत वाटत होती. जीव मुठीत घेउन पळणार्या उंदराशी खेळाव तसा उंदीर मांजराचा खेळ तो खेळत होता.
(क्रमशः)
वाचने
25683
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
चांगला विषय...
In reply to चांगला विषय... by अमितसांगली
ममो, वल्ली, मृत्युंजय, ५०
छान सुरुवात. ही कथा म्हणून
In reply to छान सुरुवात. ही कथा म्हणून by मराठमोळा
100% सहमत!
छान लिहित आहात. कथा वाचताना
छान लिहिले आहे....वाचत रहावे
लिखाण छान जमले आहे. कथा वाचतो
उत्तम लिहिलंय, धन्यवाद. पण
वाचनीय कथा.
In reply to वाचनीय कथा. by चित्रगुप्त
अॅक्सेप्टेड.
In reply to अॅक्सेप्टेड. by स्पंदना
साधा उपाय..
In reply to साधा उपाय.. by मुक्त विहारि
मुवि,
कथा छान.
झकास
कथेला "छान" तरी कसे म्हणु :(
खर तर ! थोडा अपेक्षाभंग
In reply to खर तर ! थोडा अपेक्षाभंग by सुहास..
म्हणुनच लिहिलं होतं - पण या
In reply to खर तर ! थोडा अपेक्षाभंग by सुहास..
दोन दिवस लागले हा प्रतिसाद
In reply to दोन दिवस लागले हा प्रतिसाद by स्पंदना
चित्र बदलते आहे अपर्णा !
In reply to चित्र बदलते आहे अपर्णा ! by सुहास..
अरररवेगवेगळ्या मेड इन मिडिया
In reply to अरररवेगवेगळ्या मेड इन मिडिया by एमी
वेगवेगळ्या मेड इन मिडिया
In reply to वेगवेगळ्या मेड इन मिडिया by सुहास..
सुहास : - ) जरा तुमचे तिन्ही
टिपिकल
In reply to टिपिकल by स्पा
स्पाउ? कोणता विषय गुळगुळीत
In reply to स्पाउ? कोणता विषय गुळगुळीत by स्पंदना
विषय खरं तर गुळगुळीत झालाय
In reply to विषय खरं तर गुळगुळीत झालाय by मराठमोळा
वॉव! दगड गुळगुळीत झाला म्हणुन
In reply to वॉव! दगड गुळगुळीत झाला म्हणुन by स्पंदना
या विषयाच पोटेंशिअल मला माहित
In reply to स्पाउ? कोणता विषय गुळगुळीत by स्पंदना
अपर्णा,
In reply to स्पाउ? कोणता विषय गुळगुळीत by स्पंदना
अपर्णा तै.. खरतर कथेबद्दल
In reply to टिपिकल by स्पा
स्पावड्या, कथेचे राहू दे.
In reply to स्पावड्या, कथेचे राहू दे. by विश्वनाथ मेहेंदळे
बाकी तू कधीही गृहशोभिका
In reply to बाकी तू कधीही गृहशोभिका by बॅटमॅन
आँ?
In reply to आँ? by पैसा
वर्तमान नै पैसातै भूतकाळ आहे
In reply to आँ? by पैसा
ज्यो ! एके काळी धम्या ने
In reply to ज्यो ! एके काळी धम्या ने by सुहास..
Unfortunately, when I was
In reply to आँ? by पैसा
त्याचे माहित नाही. मी हातात
In reply to स्पावड्या, कथेचे राहू दे. by विश्वनाथ मेहेंदळे
स्पावड्या, कथेचे राहू दे.
In reply to स्पावड्या, कथेचे राहू दे. by स्पा
तुमच्या इतकं शब्द पांडित्य
अरे 'कॅटेगरी' कथा आहे ना! कथा
वाचतोय
सुरेख मांडणी अन वेधक
कथा म्हणून चांगली आहे. तशी ,
मस्त लिहित आहात.
वाचतीये.
फारच प्रभावी लेखन! सर्व काही डोळ्यासमोर जिवंत केलत.
महत्त्वाचा मुद्दा...
मुवी , प्यारे१, स्नेहांकिता,
कथा छान, पुभाप्र !!
वाहाती ओघवती कथा , पूढचं
In reply to वाहाती ओघवती कथा , पूढचं by जेनी...
हे काय पूजा एकोळीत प्रतिसाद
खूप प्रभावी लेखन! कथा
जमते आहे
कथा रंगते आहे.
In reply to कथा रंगते आहे. by पैसा
जगातल्या सगळ्या कथा ३/४
In reply to कथा रंगते आहे. by पैसा
घाबल्लो
कथा म्हणून नक्कीच छान लिहिली
In reply to कथा म्हणून नक्कीच छान लिहिली by कवितानागेश
शिवाय जगभरच स्त्रिया स्वतःला
नेहमी प्रमाणे ओघवते लिखान ..
सविस्तर प्रतिसाद कथेनंतर
सविस्तर प्रतिसाद कथेनंतर
छान सुरुवात.
"बाजार" चित्रपटातील