मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि नशापाणी न करता कुत्री आणि मांजरं पाळत आलो आहे. मांजरांची पिल्लं बिल्ल्यांसारखी शर्टावर लटकावून मी लहानपणी हिंडायचो. ती नखांनी शर्टला घट्ट पकडून असायची.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही. लटकता लटकता ती पिल्लं हळूहळू वर चढत जायची..मग खांद्यावर चढून कानाशी कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले की मी परत त्यांना पकडून शर्टाला अडकवायचो.
मांजरांना मी सुकी कोळंबी आणून घालायचो. कोळंबीचा पुडा घेऊन घरात शिरलं की जिथ्थे कुठे मांजरं बसली असतील ती हर्षवायूने ओरडत पायात यायची.
एखादं मांजर गरीब स्वभावाचं निघायचं, बाकी सर्व एकजात स्वार्थी आणि वखवख करणारी.. शिवाय काम झालं की झंडा ऊंचा करुन चालते होणारी..इन जनरल मांजर जात नालायक.. त्यांच्याविषयी याहून जास्त लिहायची त्यांची लायकी नाही.
म्हणून मग कुत्री..
पण कुत्र्यांमधेही भरपूर दुर्गुण असतात.. कदाचित मांजरापेक्षा जास्त..
कितीही कुलवान कुत्रं असलं तरी ते रस्त्यावर फिरायला नेल्यावर शी किंवा तत्सम गलिच्छ पदार्थात तोंड घालतंच. त्यासाठी त्याला मारहाण केली तर ते निरागस चेहरा करुन आपल्याकडे पाहात राहतं.
आंघोळ घालण्यासाठी कुत्र्यांना नेताना त्यांना वधस्तंभाकडे नेत असल्यासारखी त्यांची धडपड असते. गळ्याला फास लागेपर्यंत उलटे खेचत राहतात. त्यांना जवळजवळ फरपटतच नळस्तंभाकडे न्यावं लागतं. आंघोळ झाली रे झाली की तत्क्षणी ते नाकाच्या शेंड्यापासून शेपटाच्या टोकापर्यंत एका लयीत थुर्रर्रर्रर्रर्र करुन आपल्या बेसावध अंगावर सुडाचे शिंतोडे उडवतात. त्यानंतर मात्र ते अंगात वारं शिरल्यासारखे इकडून तिकडे पळत सुटतात. आंघोळीनंतर इतका आनंद होत असताना ती करण्यापूर्वी इतका दंगा करण्याचं कारण तेच जाणोत.
संधिवात, वार्धक्य, स्लिपडिस्क,फुटका गुडघा,कपाळमोक्ष इत्यादिंच्या कचाट्यात न सापडलेल्या लोकांनी डॉबरमन, ग्रेट डेन असे वासराएवढे कुत्रे पाळले तर एखाददोन वर्षांत ते वरीलपैकी एका पीडेने बाधित झालेच पाहिजेत. मालक इमानदारीत फिरायला नेत असतानाही तेवढ्यात जीव खाऊन पुढे खेच घेण्याचं कारण समजण्यासाठी कुत्र्याचा जन्मच घ्यावा लागेल.. ही जीवघेणी खेच कमी पडली तर आपल्या या श्वानविशेषाला आसपास कुठेतरी एखादं मांजर, डुक्कर दिसावं..बस्स..मग मनगट तुटो वा साखळी तुटो.. शिवाय श्वानवाहकाच्या मणक्यात गॅप पडलीच पाहिजे..
शिवाय ही वासरुछाप कुत्री दणादणा खातात. दिवसाकाठी पाचसहा अंडी, अर्धा किलो मटण साताठ भाकर्या असं भदाडभर खाद्य पैदा करुन त्यांना घालावं लागतं. इतर कोणाच्या जिवावर सोडून जाता येत नाही. त्याचा बकासुरी आहार पाहून दोन दिवसात तुम्हाला घरी परत बोलावण्यात येतं. शिवाय या राक्षसी कुत्र्यांना खाण्याची जराही नजाकत नसते. थाळीला पोचे येईपर्यंत त्यावर तुटून पडतात. भसाभसा खाताना हे जितकं सांडतात त्यावर एका छोट्या केसाळ कुत्र्याचं जेवण निघेल. नंतर यांच्या नाकाभोवती अन्नाचा गोळा चिकटलेला असतो आणि त्यांना त्याचं भान नसतं..
काही मोठ्या आकारातल्या जातींचे कुत्रे एकाच मालकाच्या सोबत राहतात आणि त्याने खायला दिल्याशिवाय खात नाहीत. त्यामुळे त्याच्या लाडक्या मालकाच्या गैरहजेरीत हे त्याची आठवण काढून सुरात रडतात. उपाशी राहतात. अन्न सोडून खंगायला लागतात. की मग मालकाला झक मारत कामधाम सोडून घरी यावं लागतं.
मालक थोड्या दिवसांच्या गॅपने घरी आलेला दिसला तर दरवाजातच या कुत्र्यांना प्रेमाचं महाप्रचंड भरतं येऊन ते गुर्ब गुछ असे आवाज काढत मालकाच्या पोटाखांद्यावर पुढचे दोन पंजे ठेवतात. मालक किरकोळ असला तर कुत्र्याच्या तीसचाळीस किलोच्या प्रेमाने तो खाली कोसळतो, पण कुत्र्याचा मात्र मालकाला पाडण्याचा उद्देश नसतो. या धोबीपछाड अवस्थेत मालकावर कुत्री आपली जीभ वापरु इच्छितात. जितकं कुत्रं मोठ्ठाड तितकी त्याची जीभ लांब अन लपलपीत. मोठ्या कुत्र्याची जीभ "लप्प" अशा एका फटकार्यात मालकाचा संपूर्ण चेहरा भिजवू शकते आणि अशावेळी एकाच फटक्यात हे होत असल्याने बचावाची संधी मिळत नाही.
कुत्री अत्यंत म्हणजे अत्यंत लोचट असतात. यासाठी एक साधा प्रयोग करुन खात्री करता येईल. स्वत:च्या पाळीव कुत्र्याला चुक चुक करून बोलवा. तो नक्कीच तातडीने तुमच्या अंगाशी येऊन चिकटेल. मग त्याला जोर लावून दूर ढकला. तुम्ही जितक्या जोरात दूर ढकललात तितक्याच जोरात स्प्रिंग अॅक्शनसारखा तो तुम्हाला परत येऊन झळंबेल. असं कितीदाही ढकलून पहा. तुम्ही थकाल पण कुत्रा लोचटपणात हार जाणार नाही.
इमानदारी हा शब्द कुत्र्यांच्या बाबतीत तितकासा बरोबर नाही. इमानदारी या शब्दात चाकरीचा भास होतो. अन्नाच्या बदल्यात आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहणं असा काहीसा गुण.. पण कुत्री तर आपल्या मालकावर साली अगदी अन्नाशिवायही अतोनात प्रेम करतात.. एकदम निरपेक्ष.. फार त्रास होतो..सवय नसते आपल्याला आणि मग आणखीच त्रास.
हे सर्व सहन करता येईलही.. पण कुत्र्यांचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे ती मरतात. तेच्यायला माणूस जाण्याहून वाईट प्रकार... मुळात फार जास्त प्रेम लावायचं असेल तर मग नंतर मरण्याला काय अर्थ आहे? आणि मरायचंच तर का लावतात माया? बेअक्कल प्राणी..
..तेव्हा अजून कुत्र्याच्या मोहात पडला नसाल तर आता यापुढे कुत्री आणून पाळू नका इतकंच..
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
47984
प्रतिक्रिया
137
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
विडंबन
In reply to छान by श्रावण मोडक
लेख छान. पण माझं प्रामाणिक मत
मस्त लेखन !
गवि, मस्त लिहिलंय...
>>>रात्री-बेरात्री
In reply to गवि, मस्त लिहिलंय... by वपाडाव
सहमतीला सहमती...
In reply to >>>रात्री-बेरात्री by गणामास्तर
अरे कॉलेजला असताना होस्टेल वर
In reply to सहमतीला सहमती... by मोदक
माताय, तुम्ही टवाळक्या केल्या
In reply to अरे कॉलेजला असताना होस्टेल वर by गणामास्तर
कॉलिंग पेटा....
In reply to >>>रात्री-बेरात्री by गणामास्तर
हाहाहा पेटा??? पुण्याचे
In reply to कॉलिंग पेटा.... by श्रीरंग_जोशी
हा हा हा!
In reply to हाहाहा पेटा??? पुण्याचे by मराठमोळा
च्यामारी
In reply to हा हा हा! by चतुरंग
प्रकाटाआ
In reply to गवि, मस्त लिहिलंय... by वपाडाव
<<<रात्री-बेरात्री
In reply to गवि, मस्त लिहिलंय... by वपाडाव
आमच्या घरातीलच एक उदाहरण..
मस्त मस्त... पण खूप हळवा झालो
In reply to आमच्या घरातीलच एक उदाहरण.. by मुक्त विहारि
छान
In reply to आमच्या घरातीलच एक उदाहरण.. by मुक्त विहारि
अरे वा!
In reply to आमच्या घरातीलच एक उदाहरण.. by मुक्त विहारि
क्या बात..
गवी रॉक्स !!
मला कुत्रा पाळावासा वाटतो पण...
भापो...
In reply to मला कुत्रा पाळावासा वाटतो पण... by श्रीरंग_जोशी
अच्छा!!!! म्हणजे तुम्ही
In reply to मला कुत्रा पाळावासा वाटतो पण... by श्रीरंग_जोशी
आणखी एक सुंदर लेख..
१०१
सुंदर आहे चित्र...
In reply to १०१ by मोदक
बरोब्बर..
In reply to सुंदर आहे चित्र... by श्रीरंग_जोशी
इश्श्श्य मोदक काय हे
In reply to बरोब्बर.. by मोदक
अय्या, पूजा काय हे ? ♥
In reply to इश्श्श्य मोदक काय हे by जेनी...
रंगा काकांची एक्सेल शीट गंडली आहे रे..
In reply to अय्या, पूजा काय हे ? ♥ by प्यारे१
म्हणजे????? श्रीरंग=
In reply to रंगा काकांची एक्सेल शीट गंडली आहे रे.. by मोदक
ज्यांचे....
In reply to रंगा काकांची एक्सेल शीट गंडली आहे रे.. by मोदक
सुपर्ब
गवि रॉक्स
व्वा!! गविंचा कुठलाही लेख
+१ हेच बोल्तो.
In reply to व्वा!! गविंचा कुठलाही लेख by किसन शिंदे
लेख + प्रतिसाद दोन्ही जबरदस्त
मस्त
आठवण
लहान असताना आम्हा भावंडांनाही
सुंदर लेख
लैच भारी
कळवा
In reply to लैच भारी by अभ्या..
फुकट नाही राव
In reply to कळवा by प्रसाद गोडबोले
लेखमाला
सुंदर लेख