आता तू येशील....
लेखनविषय:
काव्यरस
आता तू येशील...हळूच गालात हसशील
उगाच "फुरंगटून" मग शेजारी बसशील
लडिवाळ रागवताना पाठमोरी बसशील
हळूच चाफा माळताना अलगद लाजशील
बराच वेळ शब्दांविना खूप काही बोलशील
जमिनीकडे पाहता पाहता एकटीच हसशील
गार वारा तुझ्या कुंतलाशी झुलेल
उडणार्या बटांमध्ये जीव माझा भूलेल
हातात हात गुंफताना नशीब जुळवू पाहशील
गुंतलेल्या रेषात मग आयुष्य शोधशील
बोलके तुझे डोळे जेव्हा माझ्या डोळा भिडतील
चटकन लहानाची... मोठी मग होशील
वास्तवाची जाण होता हात अलगद सोडवशील
मग चेहरा लपवता लपवता डोळे ओलावशील
बराच वेळ शांत बसून हळूच हसशील
लाजर्या डोळ्यांनी मग निरोप माझा घेशील
पाठमोरी सुद्धा मग किती छान दिसशील
हाय... जाता जाताही काळजालाही चटका देशील...
वाचने
3072
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
सुंदर!!
छान कविता!
शील शील शील
शील फार महत्वाचे असते
In reply to शील शील शीलशील फार महत्वाचे by नाना चेंगट
हे आले "संस्कृती" रक्षक!
लाइक इट.
छान :-)
झंम्प्या शेठ कवितांचे आणि आमचे काय जमत नाही. त्यात शब्दजुलाब झालेल्यांचे आणि आमचे नाते म्हणजे सापाचे आणि मुंगसाचे. पण तुमची कविता आम्हाला बेहद आवडली. आम्ही आमच्या खवत तिला मानाचे स्थान दिले आहे.
साला तुमच्या शब्दांनी आमची आवडती स्त्री आमच्या जवळ नसताना देखील आमच्या समोर उभी केली.
In reply to मस्तच ! by परिकथेतील राजकुमार
कवितेच्या कौतुकाबद्दल धन्यवाद.
ह्या कवितेबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते कि, ह्यात मला शृंगार हवा होता पण तो बटबटीत नको होता... म्हणून हा छोटासा प्रयत्न.
In reply to कवितेच्या कौतुकाबद्दल धन्यवाद. by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
प्रयत्न नक्कीच आवडला
In reply to कवितेच्या कौतुकाबद्दल धन्यवाद. by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
अगदी बरोबर उत्तान (ओव्हर्ट) शृंगार नाहीये बराचसा लाजराबुजरा शृंगार आहे.
अजोन येउंदेत...!
मस्तच !!
:)
सुंदर!!