अटरली बटरली.....
लेखनप्रकार
अटरली बटरली.....
मला खात्री आहे की वरचं शीर्षक वाचून संपता-संपताच तुम्ही नकळत मनात ते पूर्ण केलं असेल....... डेलिशस! :-)
जितकी ही जिंगल तब्बल पाच दशकं भारतीयांच्या डोक्यात घट्ट बसली आहे, तितकीच त्या अमूल होर्डिंग्जवरची 'अमूल गर्ल'!
काही वर्षांपूर्वीपर्यंत एक वेळ अशी होती की दर आठवड्याला एक होर्डिंग लागायचं. पण राजकारणी, क्रिकेटर्स, सिनेकलाकार, लब्धप्रतिष्ठीत चोर मंडळी आणि विक्षिप्त लोक यांच्या वाढत्या उचापत्यांमुळे आजकाल राहुल ड कुन्हा आणि त्यांचे सहकारी इतके व्यग्र आहेत, की एकट्या मे महिन्यात १७ होर्डिंग्ज मुंबईत झळकली! फार कमी विषय वर्ज्य असलेल्या अमूल गर्लने गेल्या काही आठवड्यांतच शाहरुख खान, जगनमोहन रेड्डी, पेट्रोल भाववाढ, रौडी राठोड, परीक्षांचे 'फुटणे', ३१ मे चा विरोधी पक्षांचा बंद, वगैरे सगळ्यांची चोख नोंद घेतली.
ड कुन्हा कम्युनिकेशन्स ही जाहिरात कंपनी अमूल बटरच्या जाहिरातींची होर्डिंग्ज बनवते. १९६६ साली राहुलचे वडील सिल्वेस्टर ड कुन्हा आणि त्यांचे व्यंगचित्रकार सहकारी युस्टेस फर्नांडेझ यांनी पहिलं होर्डिंग तयार केलं:
‘Give us this day our daily bread with Amul Butter'.
त्यानंतरच्या काळात 'अमूल गर्ल' चा कित्ता गिरवत काही इतरही mascots आपल्या भेटीला येत राहिले. सेव्हन अप चा फायडो डिडो, हच चा पग कुत्रा, व्होडाफोन चे झुझू, ओनिडाचा डेव्हिल, एशियन पेंट्स चा गट्टू, निरमा ची निरमा गर्ल, कॉमनवेल्थ खेळांचा शेरा, ही अशीच काही उदाहरणं. पण 'अमूल गर्ल' सारखी प्रदीर्घ लोकप्रियता यांच्यापैकी कुणाच्याही वाट्याला अजून यायची आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय mascot म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही कन्यका बरीच वर्षं ठाण मांडून बसली आहे. सुरुवातीला फक्त अमूल लोण्याची जाहिरात करणारी ही अमूल गर्ल नंतर अमूल तूप आणि दुधाच्या जाहिरातीतही आली.
हे सगळं मी आज का लिहितो आहे? तर १२ मे २०१२ रोजी ड कुन्हा आणि अमूल यांच्या सहकार्याने एक 'कॉफी टेबल' पुस्तक प्रसिद्ध झालं: "अमुल्स इंडिया". हार्पर कॉलिन्स प्रकाशनातर्फे भारतात २९९ रुपये किंमतीला हे पुस्तक उपलब्ध होईल असं दिसतं. अमिताभ बच्चन, सुनील गावस्कर, शोभा डे प्रभृतीं चा सहभाग असलेलं असं हे पुस्तक:

वाचने
21102
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
मस्त. ही चिमणी आहेच अशी की खिळवून ठेवतेच. :-)
In reply to मस्त by श्रावण मोडक
हा धागा वर आणणार्याचे आणि अर्थातच बहुगुणींचे शतशः आभार.
या अटरली बटरलींची सोबत आमची कलामहाविद्यालयापासून आहे.
'जाहिरात, कला आणी संकल्पना' या टेक्स्टबुकात पण हिच उदाहरणे आहेत.
शतशः धन्यवाद, अत्यंत सविस्तर आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल.
लेटेस्ट विषयांवर अमुलचे पोस्टर्स नेहमीच मजा आणतात.
एक नंबर धागा आहे, धन्यवाद शेठ.
आमच्याकडुन २ पैसे ...
चँपियन्स लीग चेल्सीने जिंकल्यावर अमुलकडुन आलेले होर्डिंग !
- छोटा डॉन

धन्स अ लॉट बहुगुणी :)
डेलिशस !!!!
कधी न पाहिलेली अमूल गर्ल ची विविध होर्डींग्स पाहुन अंमळ मौज वाटली धन्यवाद :)
अमूल चा जाहिरात पट झकास उलगडवून दाखवलात.
ग. वी. यांच्या "ब्रान्ड नोस्टाल्जिया " हया धाग्याची आठवण झाली.
अटरली बटरली लेख आवडला
भारतीय संसदेला साठ पूर्ण झाली तेव्हा अमूल गर्लची हम साठ साठ है ची टिप्पणीही एकदम आवडली होती
पुन्हा नाव सार्थ केलत.
धागा अफलातुन विणलाय, अगदी इतिहासासह!
मस्त हो बहुगुणी. अमूल गर्ल आपली लै लै म्हंजे लै फेव्हरिट आहे :) तिचा पूर्ण इतिहास सांगितल्याबद्दल अनेक आभार!!!
छान... सुंदर
'अमूल गर्ल' च्या होर्डींग्सच्या जुन्या आठवणी जागवणारा व माहितीपूर्ण धागा. अनेक नव्याजुन्या होर्डींग्सन येथे देऊन त्यावर थोडक्यात टिपण्णी केली आहे, हे आवडले.
सुंदर लेख..
मस्तम मस्त!!!!! आवडेश!!!! ... :)
डिलिशिअस लेख. :)
कमीने नावाचा बकवास सिनेमा पाहिला होता. त्यावर देखील अमूल ची एक अॅड होती ती आठवली.:)

In reply to डिलिशिअस लेख. कमीने नावाचा by मराठमोळा
कमिने आणि बकवास? अहो मस्त सिनेमा होता तो.
लेख खूप आवडला,
स्वाती
सदैव संस्मरणात राहील हा धागा.
काका उत्तम संकलन केलय.
वाचनखुण साठवतोय. :)
प्र.का.टा.आ
सुरेख लेख.
मुंबईत हे होर्डींग्ज जिथे लागत असत तिथुन जाताना "आज काय नवीन" हे पाहायल नेहेमी नजर वळत असे.
मला आठवणार्या काही पंचलाईन्स अश्या.
- ऑस्ट्रेलियाने तिसर्यांदा वर्ल्ड कप जिंकल्यावर
"वा स्टीव्ह वा"
- शेन वॉर्नचे बुकिजशी संबंध उघड झाल्यावर
"शेम वॉर्न"
- कारगिल युध्दानंतर
"नाराज शरिफ"
- "फिजा" चित्रपट ज्याची टॅगलाईन "फिजा इन सर्च ऑफ हर ब्रदर" अशी होती त्यावर.
"फिजा इन सर्च ऑफ हर बटर"
अगदी लक्षात राहिलेली - कभी बटर कभी बन , जाम हसलो होतो लोकलमध्ये.
अमूल हा मुंबईकरांच्या जीवनाचा एक भाग आहे. समस्त मुंबईकर अमूलच्या फलकावर नविन काय येणार याची उत्सुकतेने वाट पाहतात. कमीतकमी शब्दात ताज्या घटनेवर इतके प्रभावी प्रकटन दुर्मिळच.
फारच सुंदर धागा काढलात बहुगुणीजी. शतशः धन्यवाद.
मी अमूलच्या जाहिरातींचा फार पूर्वीपासून पंखा आहे. खोदादाद सर्कल, दादरला अगरवाल क्लासेस च्यावर सहज नजर फिरायची, नवीन होर्डिंगच्या शोधात. प्रत्येक होर्डिंग एक स्वतंत्र निर्मिती असते आणि जरी प्रासंगिक असली तरी चिरंतर साहित्यिक मूल्ये असणारी असतात. या धाग्यामुळे अनेक आठवणींना उजळा मिळाला.
फार वर्षांपूर्वी भरत दाभोळकरांची एक मुलाखत वाचली होती.
यावर याबद्दल त्यांनी सांगिललेला एक किस्सा चटकन आठवला ->
एकदा गणेशोत्सवाच्या काळात अमूलने एक होर्डिंग मुंबईत लावले. त्यात गणपती अमूल ब्रेड - बटर खाताना दाखवला होता. झाले, सर्व शिवसैनिक प्रचंड खवळले आणि बाळासाहेबांकडे याचा निषेध केला. (त्या काळात म्हणून निषेध केला, आज ते होर्डिंग लगेच फाडून टाकले असते, डा कुन्हा व दाभेळकरांना चोप मिळाला असता.) पण बाळासाहेबांनी त्या शिवसैनिकां कडून ते होर्डिंग मागवून स्वतः पाहिले व दाभोळकरांना भेटायला बोलावले.
स्वतः दाभोळकर घाबरत घबरत च बाळासाहेबांना भेटायला गेले. पण बाळासाहेबांनी मोकळ्या मनाने दाभोळकरांचे स्वागत केले आणि त्या होर्डिंगचे कौतुक केले, शाबासकी दिली. वर टिप्पणी केले की आपल्या धर्मात देवाबद्दलचा हा जो आपलेपणा व देव म्हणजे आपल्या घरातील एक व्यक्ति हा फक्त हिंदू धर्मात आहे, मी माझ्या शिवसैनिकांना समजवीन, तुम्ही काळजी करू नका.
अश्याच अर्थाचे उद्गार बाळासाहेबांनी तेव्हा काढले.
आपण फक्त कालाय तस्मै नमः म्हणायचे.
असो, माझ्या आठवणीतील काही होर्डिंगः (मी काही जपून ठेवली आहेत. एकदा इथे डकवीन) मान्य आहे की अमूलचे होर्डिंग शब्दात सांगणे हा त्याचा अपमान आहे, पण सध्या तरी इलाज नाही.
पण आज राज ठाकरे , बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना उद्देशून काही होर्डिंग्ज तयार करण्याआधी त्यांना दहादा विचार करावा लागतो. “We're very tempted but we won't go near them, because they are so unpredictable. And the irony is that they are both cartoonists.” - इति राहुल ड कुन्हा.
राहुल ड कुन्हा परवा हे म्हणाले: “... But today I think India has lost its sense of humour. Or maybe we laugh as long as the joke is not on us.”
- महम्मद अझरुद्दिनने पहिल्या तीन सलग कसोटी सामन्यात शतक झळकावले, तेव्हाचे : अमूल बेबी धावपट्टीवर उभी राहून ब्रेड - बटर खाते आहे, वर एकच ओळः "Hajaaro din ka TASTE record, utterly..."
- काँग्रेस पक्षाला १०० वर्षे पूर्ण झाली त्याचा सोहळा मुंबईमधे रेसकोर्स वर झाला. रेस संपत आली आहे - अमूल बेबी जिंकणार आहे, पूर्णपणे खादी वेषात, डोक्यावर गांधी टोपी - रेस संपल्याची खूण म्हणून १०० ची पाटी - एका टेबलावर ब्रेड - बटर ठेवले आहे - अमूल बेबीच्या तोंडाला पाणी सुटले आहे, वर: "Race for this course also, years later still the winner. Utterly butterly...."
अतिशय सुंदर लेख आहे आणि त्याचसोबत कधीही न पाहिलेली अमुलची जुनी होर्डिंग्स सुध्दा या लेखाच्या निमित्ताने पहायला मिळाली. :)
जामोप्याचं पोस्टर पण लै खास आहे, तुम्ही ते डायरेक्ट इथे का पेस्ट केलं नाही?
कसं मस्त झालय लिखाण.
बाकी फुर्सतीत लिहितो.
लेख खूप आवडला!
आवडला.
प्रतिसादांबद्दल सर्वांचेच धन्यवाद!
वर संदर्भसूचीत दिलेल्या शेवटून दुसर्या दुव्यात सौम्यदीप चौधुरी या ब्लॉगर ने फार कष्ट करून अमुल गर्लच्या १४३५ जाहिरातींचं संकलन केलं आहे आणि एक २८ मेगाबाईटची ५० मेगपिक्सेल 'मोझेक इमेज' झिप फाईल म्हणून तयार केली आहे. तुम्हाला यातून प्रत्येक जाहिरात मोठी करून पहाता येते. (मला कधी काळी जमलं तर एखादं मोठं भित्तीचित्र तयार करीन!)
सौम्यदीपने केलेलं दुसरं महत्वाचं काम म्हणजे याच जाहिरातींचं संकलन त्याने यू ट्यूब वर टाकलं आहे, खालील व्हिडिओ दिसायला माझ्या संगणकावर तरी बराच वेळ लागतो आहे, नाहीच दिसला तर दुवा याच वाक्यात आहेच:

In reply to दोन गोष्टी सांगायच्या राहून गेल्या... by बहुगुणी
वरील 'कटिंगचाय' दुव्यावरील मोझेक इमेज फर्स्टक्लास आहे!
सुंदर विषयावरचा सुंदर लेख! बहुगुणी स्पेशल. निखळ करमणूक झाली, होते आहे. :)
धन्यवाद बहुगुणी. :)
In reply to दोन गोष्टी सांगायच्या राहून गेल्या... by बहुगुणी
धागा तर भारी आहेच
हा व्हिडिओ पण आवडला
(बाकी ते "मियाँ दाद दो यार" सापडायला हवं होतं :( )
आवडेश ! :)
( बटर बॉय) ;)
अमूलच्या आठवणी मनमुराद जागवणारं लेखन. धन्यवाद बहुगुणी.
अमूल गर्ल आणि तिच्या पंचलाईन्स हा माझ्याही नितांत आवडीचा विषय आहे.
फार पूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमच्या झहीर अब्बासने भारतीय गोलंदाजी फोडून काढली होती (२ द्विशतकं का काय असं धुतलं होतं) तेव्हांचं होर्डिंग म्हणतं "Zahir Ab Baas!!"
अगदी परवाचं राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत जे काही होतंय त्यातलं
अमूलच्या संस्थळावरती बरीच होर्डिंग्ज आहेत
http://www.amul.com/m/amul-hits
अमूलच्या संस्थळावरती बरीच होर्डिंग्ज आहेत
http://www.amul.com/m/amul-hitsलेख पण मस्त अटरली बटरली डेलिशियस झालाय! आणि प्रतिक्रियांमधून काही पोस्टर्स मस्त आलीयत! वा!
मस्त आठवणी. काळाचा स्पर्श न झालेली अमूल बाला!
अमृत
शारजामधल्या मॅचमध्ये चेतन शर्माच्या शेवटच्या बॉलवर जावेद मियांदादने सिक्स मारून मॅच जिंकली होती. त्यावर अमुलची जाहिरात होती.
"मियांकी दादसे शर्मा गये".
बहुगुणी मिपाच्या मैदानावर आले की सिक्सरच मारतात. :)
धागा मस्तच. अमूल मुलगी नेहमीच आवडली आहे.
धन्यवाद! लेख आणि जाहीराती दोन्ही मस्तच आहेत! बर्याच पहील्यांदा बघायला मिळाल्या.
वेगळाच विषय आला वाचण्यात... सगळ्याच बाबतीत एकंदरीत मस्त :-)
लेखाचा विषय, संकलन आणि लेख, सगळेच फर्स्टक्लास!
मस्तच...!
अटरली बटरली डीलीशीयास लेख!!
कर्वे रस्त्यावर गरवारे शाळेच्या अलीकडे अमूलचं होर्डिंग आहे...रोज तिथून जाताना आज काय बरं विषय असेल? अशी उत्सुकता असायची. एकदम छान कलेक्शन. खूप जाहिराती पहिल्यांदाच बघायला मिळाल्या :)
In reply to अटरली बटरली डीलीशीयास by अस्मी
डेक्कनला रहाताना लकडी पुलावरचे एक होर्डींग गच्चीवरून दिसायचे.. :-)
वॉव मस्तं लेख. बाकी भारतीय सेन्स ऑफ ह्युमर बाबतचे भाष्य फारच सुंदर.
वेस्ट इन्डीज चा डेसमड हेन्न्स जेव्हा स्टम्प्वर जाणारा बाल हाताने
आडवताना out झाला तेव्हा "Henceforth handle this only"
आणि हातामध्ये AMUL BUTTER दाखविले होते.
खुप छान. असा एखादा लेख वाचला कि रोज मिपावर हजेरि लावण्याचे सार्थक होते.
बहुगुणींचे नाव बघून अपेक्षेनेच लेख उघडला होता आणि लेख पूर्ण वाचून तर हाती घबाडच लागल्यासारखे झाले. अमूल गर्ल आणि तिचे होर्डींग्स लहानपणापासून बघत आल्याने ती जणू बालपणापासूनची मैत्रिणच आहे.
आता मोठे झाल्यावरही दिवसभराच्या ताणातून घरी येताना ट्रॅफिकमधे अडकले असताना कुठेतरी अचानक अमूलचे होर्डींग दिसते आणि त्यातही आपल्या चेहर्यावर हसू येते, मनोरंजन होते.
हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद! वाचनखूण साठवून ठेवत आहे.
In reply to नितांत सुंदर by स्मिता.
>>>आता मोठे झाल्यावरही
श्रा. मो. मिटा आता डोळे. ;)
ऐकलं ब्वा कुणीतरी! :)
In reply to >>>आता मोठे झाल्यावरही श्रा. by प्यारे१
आम्ही काही श्रामोंचं ऐकून मोठे झालेलो नाही आणि ज्यांना त्यांनी सांगितलेय ते अजूनही मोठे झालेले नाहीत... त्यामुळे त्यांनी नको एवढ्यात डोळे मिटायला ;)
चीनीकम चित्रपटातील एक लहान गोड मुलगी, 'सेक्सी' असे काहीसे तिचे टोपणनाव असते पण तिला कैन्सर असतो त्या चित्रपटाला उध्देशून काढलेली जाहीरात फार आवडली होती
त्याव्यतिरिक्त अमिरखान चा नर्मदा बचाव आंदोलनासाठी चा सहभाग ही अमुलगर्लने वाखाणला होता. त्यावेळी आणखिन एक जाहीरात होती मेधापाटकर अन आमिरखान विरुध्द गुजरातचे मोदी अशी काहीशी पंचलाईन होती पण ती जाहीरात सापडत नाही तुर्तास हि देतो.
राखी सावंत वर ही त्यांनी एक जाहीरात केली होती.
त्याव्यतिरिक्त मुन्नाभाईच्या यशा साठी हि एक छानशी जाहीरात
Brad Pitt अन Angelina Jolie ची पुण्याच्या रिक्षातील जोली गुड राईड
लेख आवडला.

लेख आवडला.सही धागा आहे. अमूल गर्लला पहिल्यांदा केव्हा पाहिलं हे आठवत नाही,पण तेव्हापासूनच ती आवडती आहे. दादरला गेल्यावर प्लाझाच्या अलिकडले होर्डिंग नेमक्या त्याचवेळेला मध्ये कडमडलेल्या डबल डेकरमुळे न दिसल्यावर बर्याचदा हळहळलेय सुद्धा. आता मात्र नवीन होर्डिंग पाहायला तिथे जायची गरज नाही. फेसबुकावर https://www.facebook.com/amul.coop/photos पेज लाईक केलं की प्रत्येक पोस्टर घरबसल्या पाहता येतं.
भरत दाभोळकरांच्या मुलाखतीत वाचल्याप्रमाणे देशभरात अशाफक्त ४५ ठिकाणी ही होर्डिंग लावलेली आहेत आणि नवनव्या घडामोडींप्रमाणे रात्रभरात/कमीतकमी वेळात सगळीकडे ही पोस्टर्स पाठवणं खूप कठीण होतं. आता मात्र ती परिस्थिती न राहिल्यानेसुद्धा एका महिन्यात इतक्या वेळा अमूलगर्ल वेगवेगळ्या अवतारांत अवतरली असावी.
वर दिलेल्या दुव्यावर पुष्कळ फोटो आहेत, बहुतेक सगळेच आवडले आहेत. हा त्यातलाच एकः
या आठवणी पुन्हा एकदा जागवल्याबद्दल धन्यवाद बहुगुणीकाका..
या आठवणी पुन्हा एकदा जागवल्याबद्दल धन्यवाद बहुगुणीकाका..मस्त ! :)
निखळ मनोरंजन करणारा धागा!
धन्यवाद बहुगुणी!!
मजा आली. :)
मस्त लेख!!
:)
:) धन्यवाद बहुगुणी!!

हे माझे सर्वात कार्टून आहे.
(बटर प्रेमी) ;)माझ्या अत्यंत आवडीच्या विषयावर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद :)
कालच ऑफिसमधील सहकार्यांबरोबर लंच घेताना 'अमुल' होर्डिंग्सचा विषय निघाला होता.
"अमुल 'यान्नी' मख्खन" हे यान्नीच्या भारतातील कार्यक्रमाच्या वेळचे होर्डिंग आठवतंय :)
अमूल ची जाहिरात त्यांच्या पंच लाईन ह्यामुळे हा ब्र्यांड डोक्यात फीट बसला.
अप्रतिम धागा व बहुगुणी ह्यांची ह्या लेखावर घेतलेली मेहनत व त्यामागील कळकळ
कौतुकास्पद आहे.
मस्त