भारताची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे काय?
प्रतिक्रिया
If the central bank is too timid, it risks adding fuel to the ire of portfolio investors, which India relies on heavily to cover its imports tab. Aggressive intervention would leave the central bank open to criticism that it is wasting precious money on problems that are beyond India's control anyhow, noteably Europe's debt crisis.यात दोन कळीचे शब्द आहेत - पहिल्या परिच्छेदात रिस्क्स आणि दुसऱ्यात क्रिटिसिझ्म. पहिला शब्द वास्तवातील धोका दर्शवतो, दुसरा शब्द फक्त शब्द बापुडे केवळ वारा धाटणीचा. याआधीच्या मंदीच्या काळात उदारीकरणसमर्थकांच्या अशा टीकेला सामोरे जात वाय. व्ही. रेड्डी यांनी जी धोरणं राबवली त्यामुळं अर्थव्यवस्था कशी टिकली याचे गोडवे नंतर याच टीकाकारांनी ओझरते का होईना गायले होते असे आठवते. आत्ताही तेच होऊ शकते. या विश्लेषणाचा भर विदेशी गुंतवणुकीवर आहे. देशी क्षमतांचा विचार मात्र पूर्ण झालेला दिसत नाही. विदेशी गुंतवणूक येते ती परताव्याच्या अपेक्षेतच. हा परतावा देण्याची भारतीय ग्राहकवर्गाची ताकद आहे की नाही यावर खेळ अवलंबून राहील. मला एकूण शंका येतेय. भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती तर संपलेली दिसत नाही. आक्रसणं झालं आहे हे नक्की. पण थांबा आलाय असं दिसत नाही. अशात रिटेलमधल्या विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला आहे. त्यातून या बातम्या येताहेत की काय ही शंका घ्यावी अशी स्थिती आहे. कालची बातमी होती, उत्पादन घटल्याची. ती एकदम दिवसभर सगळीकडे वाजत होती. त्यापाठोपाठ आज इंडियन एक्स्प्रेसमध्ये अशी बातमी आली आहे की, पंतप्रधानांनी मंत्रालयांकडे त्यांच्या विशलीस्टची मागणी केली आहे. इंडियन एक्स्प्रेस हे नोंद घेण्याजोगे आहे. मला असे अजिबात म्हणायचे नाही की, धोका नाही. तो दिसतो आहे. त्या चाहूलखुणा उत्पादन घटीच्या बातमीत आहेत, वर लेखात दिलेल्या दुव्यातही आहेत. पण चाहूलखुणांना निर्देशांक मानत वाटचाल करायला भाग पाडण्याची स्थिती आहे का? मला शंका आहे. वाट पहावी लागेल थोडी आणखी. क्रिटिसिझ्म या मुद्यावर या वृत्तात दिलेला भर अटकपूर्व जामीन स्वरूपाचा आहे. कारण बातमीत इतिहासाचा धांडोळा दिसत नाही. तो घेऊन त्या तुलनेत आता होणारी टीका वेगळी किंवा नव्या संदर्भांची कशी हे मला तरी या बातमीतून कळलेले नाही. आणि केवळ हितसंबंधांतून होणाऱ्या टीकेला वास्तविक व्यवहार्य निर्णयांसमोर किती महत्त्व द्यायचे हा प्रश्न या बातमीने उल्लेखिलेला दिसत नाही. कापूस अंगावर पडल्यानंतर आभाळ कोसळलं म्हणणाऱ्या सशासारखी स्थिती उगाच केली जाते आहे का?
In reply to सावधानता by श्रावण मोडक
कापूस अंगावर पडल्यानंतर आभाळ कोसळलं म्हणणाऱ्या सशासारखी स्थिती उगाच केली जाते आहे का?कोण जाणे. ह्यातील तथ्य किती हे इतरांकडून जाणून घेण्यासाठीच तर मी धागा काढला आहे.
In reply to उत्तम by सन्जोप राव
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to भाववाढ जास्त महत्त्वाची by नितिन थत्ते
In reply to महत्वाचा विषय. by मन१
In reply to महत्वाचा विषय. by मन१
In reply to महत्वाचा विषय. by मन१
अॅडम स्मिथच्या म्हणण्याप्रमाणे "मार्केट" ला वाटेल तसे वागू दिले तर काय होइल? मार्केट मधला "अदृश्य हात" सर्व काही "आपोआप" ठिक करेल अक?१९३० पूर्वीच्या काळात स्मिथच्या अदृश्य हातावर क्लासिकल अर्थतज्ञांचा भर होता. त्यांच्या मते "In the long run, perfect market will find a solution to every problem". त्याला जॉन मेनार्ड किन्स ने दिलेले उत्तर म्हणजे "In the long run we all are dead". सध्यापुरते इतकेच. माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावरील चर्चेत वेळ मिळेल त्याप्रमाणे मी भाग घेणारच आहे. क्लिंटन
In reply to जॉन मेनार्ड किन्स by क्लिंटन
In reply to रुपया अवमूल्यन by नितिन थत्ते
In reply to आपली अर्थ व्यवस्था पुर्नपने by विजुभाऊ
In reply to +१०० टु विजुभाउ - युरोपिय( by ५० फक्त
In reply to +१०० टु विजुभाउ - युरोपिय( by ५० फक्त
व्याजदर अजुन ५-७% ने वाढले पाहिजेत
आज प्रत्येकानं घरासाठी कर्ज घेउन बसण्यापेक्षा हाच पैसा जर बँकेनं सामुदायिक इन्फ्रा म्हणजे रोड, विद्युत निर्मिती अशा प्रकल्पात गुंतवला तर त्यातुन बरीच प्रगती करता येईल. रोजगार निर्मित्ती सुद्धा होईल.व्याजाचे दर आणखी वाढविले तर त्याचा दुष्परिणामच होईल हे अन्य एका प्रतिसादात मी म्हटले आहे. व्याजाचे दर आणखी ५-७% ने वाढविले तर रोड, विद्युत निर्मिती या क्षेत्रांवर कसा परिणाम होईल ते बघू. सर्वप्रथम वीजेचे प्रकल्प कसे निवडतात ते बघू. त्यासाठी सरकार खाजगी क्षेत्राकडून निविदा मागविते. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या खाजगी कंपन्यांना ते एक युनिट वीज किती दराने विकणार या कलमावरून सर्वात कमी दराने वीज विकायची तयारी दाखविलेल्या कंपनीला कंत्राट मिळते. त्यानंतर पर्यावरण मंत्रालयाकडून आवश्यक परवानग्या मिळवणे, कोळसा किंवा गॅस साठीचे लिंकेज मिळविणे ही जबाबदारी संबंधित कंपनीची असते. Ultra Mega Power Plant अंतर्गत सरकारने किनारपट्टीपासून दूर प्रदेशात खाजगी कंपन्यांना प्रकल्पासाठी वापरायला कोळशाची खाण दिली (मध्य प्रदेशात सासन आणि झारखंडमध्ये तिलय्या) आहे. तर आंध्र प्रदेशात कृष्णपट्टणम आणि गुजरातमध्ये मुंद्रा येथील प्रकल्प आयात केलेल्या कोळशावर आधारीत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याच्या प्रकल्पांसाठी NHAI निविदा मागविते. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या खाजगी कंपन्यांना NHAI चे अनुदान किती हवे या कलमावरून कंत्राटे दिली जातात. जी कंपनी सर्वात कमी अनुदान मागेल त्या कंपनीला कंत्राट दिले जाते. तसेच वाटेल तितका टोल कंपन्यांना वसूल करता येत नाही तर तो पण सरकारने नेमून दिलेल्या दरांप्रमाणेच ठरतो. तेव्हा कोणत्याही रस्त्यावरून अपेक्षित असलेली वाहतूक आणि टोलवाटे अपेक्षित असलेले उत्पन्न तसेच बांधकामाचा खर्च लक्षात घेऊन कंपन्या आपल्या निविदा भरतात. तसेच वीज प्रकल्पात वीज निर्मिती करून सरकारी वितरण कंपन्यांना वीज विकायचा किंवा रस्त्याच्या प्रकल्पात टोल वसूल करायचा कालावधी संबंधित करारात ठरवून दिलेला असतो. तो साधारणपणे २५ वर्षे असतो. वीज किंवा रस्त्याच्या प्रकल्पात संबंधित कंपनी थोडा स्वतःचा पैसा टाकते आणि बराच (६०% ते ७५%) पैसा कर्जाऊ घेतलेला असतो.आता व्याजाचे दर आणखी ५-७% ने वाढले तर गेल्या काही वर्षात कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांना त्यांनी घेतलेल्या कर्जाची पूर्तता करायला अधिक व्याज भरायला लागेल आणि त्यातून या प्रकल्पांचा फायदा कमी होईल किंबहुना ते प्रकल्प तोट्यातच जातील. व्याजाचे दर इतके वाढवले तर वीज प्रकल्पांमध्ये प्रति युनिट वीजेचे दर वाढविल्याशिवाय खाजगी कंपन्या ते प्रकल्प हाती घेणार नाहीत. यातही एक गोम आहे. खाजगी कंपन्या साधारणपणे प्रतियुनिट २.५ रूपये दराने वीज सरकारी वितरण कंपन्यांना विकतात. पुढे तीच वीज सरासरी ३ रूपयाने ग्राहकांना मिळते (घरगुती ग्राहकांना कमी दराने आणि व्यवसायांना अधिक दराने).यात होत असलेल्या वीजेच्या चोरीमुळे किंवा बिले थकवायचे प्रकार असल्यामुळे सरकारी डिस्ट्रीब्युशन कंपन्या मुळातच तोट्यात आहेत. तसेच वीजेचे दर हे राजकीय दृष्ट्या संवेदनाक्षम असल्यामुळे सरकार ग्राहकांसाठीचे दर वाढवू शकत नाही. आता व्याजाचे दर इतक्या प्रमाणावर वाढविले तर प्रति युनिट २.५ रूपये दराने वीज विकणे खाजगी कंपन्यांना परवडणार नाही आणि त्या जास्त दर मागतील तो सरकारी वितरण कंपन्यांना परवडणार नाही. मग वीजनिर्मितीत खाजगी क्षेत्रातील कंपन्या येणार कशा? सरकारी कंपन्यांनी वाढत्या तोट्यामुळे खाजगी वीज प्रकल्पांना विकत घेतलेल्या वीजेचे पैसे थकविणे वाढविले आहे. त्यामुळे या खाजगी वीज प्रकल्पांना अधिक खेळत्या भांडवलाची गरज लागते आणि त्यासाठी त्यांना व्याजावर अधिक खर्च करावा लागतो. गेल्या काही वर्षात सगळेच कसे फसले आहे याचे खरे उदाहरण मी अजून दिलेलेच नाही. अकराव्या पंचवार्षिक योजनेत काही हजार मेगावॉट प्रकल्पांना मान्यता दिली . यात बरेचसे प्रकल्प कोळशावर आधारीत आहेत.एकदा प्रकल्पाच्या बांधकामाला सुरवात केल्यानंतर २-२.५ वर्ष बांधकाम पूर्ण व्हायला लागतात. काही वर्षात इतके हजार मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प येणार हे माहित असूनही कोळशाच्या खाणींची क्षमता वाढवायला/ नव्या खाणी विकसित करायला पाहिजे तितके प्रयत्न केले गेले नाहीत. पर्यावरण मंत्रालयाचेही धोरण तसे धरसोडीचेच होते. या सगळ्या भानगडीत भारतात कोळशाचे उत्पादन गरजेपेक्षा कमी आहे. त्यामुळे २०१० पासून कोल इंडियाने Fuel Supply Agreement सुरवातीलाच मान्य करणे बंद केले आहे. तेव्हा प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण व्हायची वेळ आली तरी कोळसा मिळेल की नाही ही टांगती तलवार असतेच. तसेच भारतात कोळशाच्या बाबतीत कोल इंडियाची जवळपास मक्तेदारी आहे.तेव्हा Fuel Supply Agreement असूनही रेल्वेचे रेक उपलब्ध नाहीत किंवा इतर काही कारणाने कोळसा द्यायचेही कोल इंडियाने नाकारणे सुरू केले आहे. कृष्णा-गोदावरी भागात नैसर्गिक गॅस मिळाला याचा मोठा गाजावाजा झाला.पण तिथेही पहिल्यांदा जे चित्र दाखविले होते त्यापेक्षा उत्पादन बरेच कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या २-३ वर्षात भारतात नवा गॅस प्रकल्प उभा राहिलेला नाही. कोळसा आयात करायचा म्हटला तर ते पण कठिण आहे. कारण भारतीय कोळशासाठी कार्यान्वित केलेल्या boiler मध्ये आयात केलेला कोळसा एका ठराविक मर्यादेच्या पुढे चालत नाही. तसेच आयात केलेला कोळसा महाग पडतो. जी.एम्.आर/ जी.व्ही.के सारख्या कंपन्यांनी परदेशात कोळशाच्या खाणी विकत घेतल्या आहेत. जर भविष्यकाळाची गरज ध्यानात घेऊन भारतातच कोळसा खाणींसंदर्भात काम वेळेत सुरू झाले असते तर भारतीय उद्योगांना परदेशात खाणी विकत घ्यायची गरज पडली नसती. मी एका बँकेत नोकरीला आहे आणि अनेक वीज आणि रस्त्याच्या प्रकल्पांना पैसे कर्जाऊ द्यायची प्रपोजल पास करायच्या विभागात मी आहे त्यामुळे मला या गोष्टींची माहिती झाली आहे. तेव्हा
In reply to भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रापुढील समस्या-१ by क्लिंटन
In reply to भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगापुढील समस्या-२ by क्लिंटन
In reply to आपला प्रतिध्वनी by मन१
In reply to हु केअर्स? by किचेन
In reply to '.देशाचा फायदा होतो का तोटा by ५० फक्त
In reply to '.देशाचा फायदा होतो का तोटा by ५० फक्त
In reply to -१ by मन१
In reply to -१ by मन१
In reply to -१ by मन१
In reply to मंदी, उत्पादन घट आणि रोजगार by सर्वसाक्षी
मात्र अनेक भरती सल्लागार/ व्यवस्थापन सल्लागार असे ठामपणे सांगत आहेत की २०१२ च्या पहिल्या तिमाहीत अनेक संधी रोजगारासाठी उघडतीलपोपटपंची करणे हे सल्लागारांचे काम असते. सध्याच्या वर्तमानपत्रांमधील बातम्या वाचून मिडियाची कीव येते. पहिल्या पानावर-"विकासाचा दर घटला" अशी बातमी. पाचव्या पानावर्-"नोकर्यांच्या खूप संधी", सातव्या पानावर- "शहरातल्या अमुक तमुक उपनगराला खूप भाव येणार्(म्हणजे तिकडे फ्लॅट घ्या!)" अशा ह्या बातम्या वाचून हसावे की रडावे ?
In reply to सल्ला by चिरोटा
In reply to सल्ला by चिरोटा
In reply to फरक by सर्वसाक्षी
In reply to अर्थ व्यवस्थेचा कणा by अविनाशकुलकर्णी
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to + १००० टू अविनाश काका, शेवटी by ५० फक्त
In reply to महागाई by क्लिंटन
In reply to महागाई by क्लिंटन
In reply to मग आता काय बदलले आहे? by मन१
In reply to चलनाचे अवमूल्यन का होते? by क्लिंटन
समजा भारतात व्याजाचे दर जास्त आहेत या कारणाने रूपयाचे अवमूल्यन वर दिल्याप्रमाणे होत असेल तर त्याच वेळी अधिक परताव्याच्या आशेने डॉलरमध्ये अधिक पैसा भारतात यायला हवा आणि या कारणाने रूपया वधारायला हवा.पण रूपया डॉलरशी पूर्णपणे परिवर्तनीय आहे का? तसे जिथे असते, तिथे arbitrage शक्य आहे, अन्यथा नाही. बरोबर ना?
In reply to उत्कृष्ट प्रतिसाद by प्रदीप
पण रूपया डॉलरशी पूर्णपणे परिवर्तनीय आहे का? तसे जिथे असते, तिथे arbitrage शक्य आहे, अन्यथा नाही. बरोबर ना?हो बरोबर. भारतात गुंतवणुक करणाऱ्या विदेशी संस्था दोन प्रकारे गुंतवणुक करतातः एक तर कारखाने किंवा तत्सम प्रकल्पात direct गुंतवणुक करतात (जसे काही मोटार कंपन्यांनी केलेले आहे) किंवा भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करतात (FII). पहिल्या प्रकारची गुंतवणुक करणाऱ्या संस्थांनी केलेली गुंतवणुक तितकीशी तरल नसते. म्हणजे परिस्थिती बिघडल्यास अशा कंपन्या आपली गुंतवणुक काढून रातोरात भारतातून जाऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे भारतातील खाजगी उद्योगांमध्ये परदेशी प्रायव्हेट इक्विटी (के.के.आर, बेसेमर पार्टनर्स वगैरे) गुंतवणुक करतात. त्यांचीही गुंतवणुक तेवढी तरल नसते.पण भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणाऱ्या कंपन्या आपली गुंतवणुक काढून भारतातून जाऊ शकतात. गेल्या दोन-तीन महिन्यात ज्या वेगाने FII नी आपली गुंतवणुक भारताबाहेर नेली आहे त्यावरून तरी निदान त्यांच्यासाठी तरी डॉलर आणि रूपया बराचसा परिवर्तनीय आहे असे वाटते. याविषयीचे नक्की नियम-कायदे काय आहेत याची कल्पना नाही म्हणून बराचसा असे लिहिले.हे अनुमान गेल्या काही वर्षात ज्या वेगाने भारतात FII चे डॉलर आले आणि गेले त्यावरून मी काढले आहे. याविषयी अधिक माहिती कोणाला असल्यास लिहावे ही विनंती. पण जर अशी परिवर्तनीयता नसेल तर मात्र विनिमय वेगात इतक्या वेगाने बदल होणार नाहीत. क्लिंटन
In reply to बरोबर by क्लिंटन
In reply to रुपया अजून पूर्णपणे by डीलर
In reply to अतिशय सुंदर चर्चा आहे! by ऋषिकेश
In reply to वीज वितरण कंपन्यांचा तोटा by क्लिंटन
In reply to नक्की काय by नितिन थत्ते
कर्जाचे रिकास्टिंग करणार म्हणजे नक्की काय करणार हे स्पष्ट नाही.हे पैसे एकदा system बाहेर गेले आहेत आणि ते रिकव्हर करायचा काहीच मार्ग नाही.वीज चोरांकडून पैसे वसूल करणे ही केवळ अशक्यकोटीतली गोष्ट आहे.तेव्हा debt recasting ला नाव काहीही द्या पण ते पैसे गेले ते गेलेच. म्हणजेच त्याचा बोजा कोणावर तरी म्हणजेच सरकारच्या तिजोरीवर पडणारच. म्हणजे तुम्ही याला नाव काहीही दिलेत तरी हे debt write-off च आहे.
किंगफिशर एअरलाइन्सला* बँकांनी दिलेल्या कर्जाचे वेळोवेळी रिस्ट्रक्चरिंग केले गेल्याचे - इक्विटी मध्ये रूपांतर केले गेल्याचे वाचले होते. त्यात आणि या वीज कंपन्यांच्या प्रकरणात तात्विकदृष्ट्या नेमके काय वेगळे आहे?किंगफिशरमधून तिकिटाचे पैसे न भरता प्रवास केलेल्या प्रवाशांमुळे ती परिस्थिती उद्भवली नव्हती.तिकिटाचे पैसे न भरता कोणालाही विमानात चढू दिले जात होते असे वाटत नाही.वीज कंपन्यांच्या बाबतीत ती परिस्थिती आहे का? आणि त्यातही किंगफिशरची परिस्थिती (चुकून माकून) सुधारलीच असती तर कर्जाचे इक्विटीत रूपांतर केल्यामुळे भविष्यात अधिक फायदा व्हायची निदान अशा तरी आहे.२००३ नंतर ९-१० वर्षात परत तीच परिस्थिती आली म्हणजे वीज कंपन्यांच्या बाबतीत अशी परिस्थिती नाही असे म्हटले तर त्यात काय चुकले?
सरकारने सरकारी आस्थापनांच्या बाबतीत असे केले की मात्र पॉप्युलिझम वगैरे विशेषणे वापरली जातात आणि टीका केली जाते.अर्थातच. जर का मते जातील या भितीने जर वीज चोरांविरूध्द काही कारवाई सरकार करत नसेल तर त्याला पॉप्युलिझम सोडून आणखी काय म्हणणार?आणि सरकार वीज चोरीविरूध्द काही का करत नाही याचे आणखी कुठले कारण तुम्हाला माहित असल्यास जरूर सांगा.
In reply to कर्जाचे रिकास्टिंग by क्लिंटन
किंगफिशरमधून तिकिटाचे पैसे न भरता प्रवास केलेल्या प्रवाशांमुळे ती परिस्थिती उद्भवली नव्हती.तिकिटाचे पैसे न भरता कोणालाही विमानात चढू दिले जात होते असे वाटत नाही.वीज कंपन्यांच्या बाबतीत ती परिस्थिती आहे का? आणि त्यातही किंगफिशरची परिस्थिती (चुकून माकून) सुधारलीच असती तर कर्जाचे इक्विटीत रूपांतर केल्यामुळे भविष्यात अधिक फायदा व्हायची निदान अशा तरी आहे.२००३ नंतर ९-१० वर्षात परत तीच परिस्थिती आली म्हणजे वीज कंपन्यांच्या बाबतीत अशी परिस्थिती नाही असे म्हटले तर त्यात काय चुकले?युक्तिवाद देखणा आहे, क्षणीक प्रभावी आहे. पण फसवा आहे. करदात्यावर पडणारे सारेच 'बोजे' एकदा यादीत घेऊ आणि चर्चा करू. थोडा समग्रपणा आणत प्रत्येक गोष्टी केवळ दिसणाऱ्या आकड्यात न मोजता तिचे मूल्य काय याचाही विचार त्यात अंतर्भूत करू. अर्थकारणाचा समग्रपणा त्यातूनच येत असतो नाही तरी. :-)
In reply to कर्जाचे रिकास्टिंग by क्लिंटन
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to थत्तेचाचा आणि श्रामो by क्लिंटन
In reply to थत्तेचाचा आणि श्रामो by क्लिंटन
In reply to थत्तेचाचा आणि श्रामो by क्लिंटन
In reply to थत्तेचाचा आणि श्रामो by क्लिंटन
In reply to >>(मतांच्या राजकारणासाठी) वीज by नितिन थत्ते
वीज चोरीवर काहीही न करणे नक्की मतांच्या राजकारणासाठीच असते का?मतांचे राजकारण हे एक कारण नक्कीच झाले. त्याव्यतिरिक्त आणखी कारणे आहेत का याची कल्पना नाही. वरील एका प्रतिसादात तुम्हाला आणखी कारण माहित असल्यास जरूर लिहा असे म्हणूनच म्हटले होते. बाकी distribution franchisee बिझनेस मधून Torrent कंपनीने भिवंडीतील थकबाकी बरीच कमी केली. महाराष्ट्रात इतर काही शहरातही त्याचा फायदा झाला हे नक्कीच. पण त्याच Torrent कंपनीचा कानपूर मधील अनुभव पूर्ण उलटा होता. तसेच श्याम इंडस सारख्या छोट्या कंपन्यांना मध्य प्रदेशातही या बिझनेसमध्ये तोटा झाला. आता जो प्रकार महाराष्ट्रात बराच ठिक चालतो तोच उत्तर भारतात फसतो असे का होत असावे? एकूण कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती उत्तर भारतातल्या परिस्थितीपेक्षा चांगली आहे याविषयी फार दुमत नसावे.तेव्हा बिलाची वसुली करायला गेलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना लोक मारायला उठले तर कंपनीचे प्रतिनिधी हे काम करायला फारसे उत्सुक नसतील याची कल्पना येते. आणि distribution franchisee ज्या ग्राहकांनी वैध पध्दतीने वीज घेतली आहे पण बिले थकवली आहेत त्यांच्याकरून बिले गोळा करू शकतात. पण ज्यांनी मुळात वीज (हूक टाकून वगैरे) चोरली आहे त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे अधिकार त्यांना आहेत की नाही हे मला चेक करावे लागेल. क्रिसिलच्या रिपोर्टमध्ये ती माहिती असेलच.
In reply to >>(मतांच्या राजकारणासाठी) वीज by नितिन थत्ते
In reply to वीज वितरण कंपन्यांचा तोटा by क्लिंटन
In reply to चांगली माहिती आणि उपचर्चा... by विकास
सरकार लहान माशांना पकडण्यासाठी (म्हणजे सोसायट्या वगैरे) काम करू इच्छिते. (त्यात देखील थकबाकी माफी दिली जातेच). पण आकडेवारी तपासली तर समजते की वीज चोरी आणि त्यातून पडणारा सरकारी तिजोरीवरील ताण हा मोठ्या माशांकडून (अर्थात उद्योगधंद्यांकडून) जास्त असतो. पण त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जाते. कारणे सांगायची गरज नाही - मग त्याला पॉप्यूलीस्ट म्हणा नाहीतर नाकर्तेपणा म्हणा.विषय नेमका येथे दडलेला आहे. :-)
In reply to विषय by श्रावण मोडक
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to सफरचंद-संत्रे by विकास
In reply to नाही by श्रावण मोडक
In reply to फरक by विकास
In reply to फरक by विकास
In reply to वर आपल्या प्रतिसादात by नितिन थत्ते
In reply to वर आपल्या प्रतिसादात by नितिन थत्ते
In reply to रुपया घसरला त्याच्या अनेक by अविनाशकुलकर्णी
In reply to आँ by नितिन थत्ते
परीस्थीती अवघड बनत चालली आहे हे नक्कि...