मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविकिरडुंची साठमारी ... (विडंबनाची भेळपुरी)

केशवटुकार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
घाटावरच्या भटसाहेबांनी विडंबनाची भेळपुरी लिहुन आमच्या प्राण:प्रिय साहित्यप्रकारावर टिका केली (मारली). त्यात आमच्या प्रातःस्मरणी सदगुरु केशवसुमारांचा उल्लेख पाहुन तर आमची अस्मिताच दुखावली (शेजारच्या क्युबिकल मधली नाही). आमची ती वेदना मग ही अशी आम्ही झरझर उतरवुन काढली. (डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा नाही समजले तर गेलात उडत !) मिपाकरांनो झोडुन घ्यावे मांडतो त्यांची व्यथा विडंबन माझे ह. घेणे, आहेच ते यथातथा नवकवी आहे सदस्य मी अन खाजही आहे काव्याची म्हणुनच होई अजीर्ण मजला विडंबन केसु शिष्यांची झुरता झुरता रात्र सरे मी तगमगीने बेजार कसे हाणावे कसा टळावा केसुगणांचा शेजार ? कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले हताश होउन भटो बैसला अमरिक्केच्या घाटावरी विचार करतो कशी करावी कविमनाची खाज पुरी आज माजली टुकार साली दंगा करती जिकडेतिकडे द्राक्षच आंबट विचार करोनी भटो निघाला परसाकडे -केशवटुकार

वाचने 3109 वाचनखूण प्रतिक्रिया 10

धमाल मुलगा गुरुवार, 08/07/2008 - 15:25
कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले
=)) बेक्कार गुण लागला की रे टुकारा तुलाही...... ;)

शेखर गुरुवार, 08/07/2008 - 15:32
कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या जबरा ... चालु द्या ..

घाटावरचे भट गुरुवार, 08/07/2008 - 16:02
या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले हताश होउन भटो बैसला अमरिक्केच्या घाटावरी विचार करतो कशी करावी कविमनाची खाज पुरी हे आवडलं बुवा...अगदी माझ्या मनातलं... :) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

शितल गुरुवार, 08/07/2008 - 20:00
अफलातुन झाले आहे विडंबन :) टुकार शेठ, तुमच्या विडंबनाची एक्प्रेस मेल फार्मात आहे. :)

मनस्वी Fri, 08/08/2008 - 16:07
मस्त रे टुक्या..
या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले
येउदेत अजून! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *