मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कोणत्या मिपापटुला मिपारत्न द्यावे?)

विनायक प्रभू · · काथ्याकूट
कोणत्या मिपापटुला "मिपारत्न" द्यावे? हा काथ्या कुटताना कामगिरी मधील सातत्य लक्षात घ्यावे. उगाच गेले नउ महीने काहीही लिहीले नाही आणि एखाद दुसरा प्रतिसाद देणार्‍या ना ह्या उपाधी साठी लक्षात घेउ नये. उपाधी देताना "का"? ची चर्चा अपेक्षित.

वाचने 9354 वाचनखूण प्रतिक्रिया 33

चिरोटा 02/06/2012 - 17:10
प्रभूसाहेब निवड समितीवर नसतील तर त्यांच्याच नावाची शिफारस व्हावी. क्रिप्टिक लेख्,प्रतिसाद देण्यात त्यांचे सातत्य वाखाणण्यासारखे आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

किचेन 04/06/2012 - 15:38
मी मिपाची अतिशय सुंदर,सुलक्षणी,सुसंस्कारी,सुशिक्षित,सुविचारी,सुगरण, सोज्वळ,निरागस,प्रेमळ.शुद्धलेखनात पहिला क्रमाक मिळवलेली ;) वगैरे वगैरे अशी सदस्य आहे.त्यामुळे मीच या मिपारात्न साठी योग्य आहे असे मला वाटते.त्यामुळे सर्वांनी मलाच आपले अमूल्य मत द्यावे. :)

भरत कुलकर्णी 02/06/2012 - 17:56
गुर्जी तुम्ही 'मोटराईज्ड कार्ड रीडर चांगले की डिप कार्ड रीडर?' या प्रश्नाचे उत्तर दिले नसल्याने आम्ही रागावलोय. ते उत्तर द्या मगच आम्ही हा प्रश्न हातात घेवू.

विनायक प्रभू 02/06/2012 - 18:01
डिप केंव्हाही चांगले

jaypal 02/06/2012 - 18:37
गालीबचा शेर आठवला ..................................., एक ढुंडो हजार मिलते है/ ;-) शरदिनी तै च्या ऊत्तराच्या प्रतिक्षेत.

विनायक प्रभू 02/06/2012 - 19:26
मे बी वन ऑफ द कंटेंडर

अविनाशकुलकर्णी 02/06/2012 - 19:30
परा

In reply to by अविनाशकुलकर्णी

शुचि 02/06/2012 - 20:14
(१) परा यांचे प्रतिसाद आणि लेख वाचून पोट दुखते (हसून की असूयेने ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार) (२) डायरीवाटप केंद्र समीती, दुर्लक्षीत पँथर समीती वगैरेचे अध्यक्षपद त्यांनी गौरवपूर्ण रीत्या भूषविले आहे. (३) परखड मते मांडण्यात सातत्य, नानांसारखे हुषार तसेच गाई, शेळ्या पाळणारे, चरखा कातणारे मित्र जोडून ठेवण्याची कला आदि गुणांची कदर म्हणून परा यांना मिपारत्न पदवी देण्यात यावी.

In reply to by अविनाशकुलकर्णी

किचेन 04/06/2012 - 15:44
हा पुरस्कार तर 'परा'च्या कावळ्यालाही देऊ नये. -१००००००००००००० सगळ्या कथा अर्धवट सोडतो मेला.

तिमा 02/06/2012 - 20:42
गवि यांनी सातत्याने विविध विषयांवर लेखन केले असून ते प्रतिसाद देतानाही अत्यंत संयमित प्रतिसाद देतात. तरी माझे मत गविंनाच!

In reply to by किचेन

५० फक्त 04/06/2012 - 17:11
ओ नक्की काय ते ठरवा एकदाच , तुम्ही का गवि, नक्की कुणाला मत आहे तुमचं ? काय आहे पुढच्या आठवड्यापासुन प्यार्ट्या सुरु होणार आहेत, उगा नंतर घोळ नको.

स्पा 02/06/2012 - 22:25
janatl manatl : ramdas kaka. ja ku. gavi. para. bika pakru : ganpa sanika swapnil mrunalini bhatkanti kaladalan : valli ofcourse kaula : internet snehi kathyakut : vishwanath mehendale. 50 fakt . an all other 99 % of mipakars :D

रमताराम 02/06/2012 - 23:28
xxxरत्न वगैरे पारितोषिक रिटायर झालेल्या किंवा 'आता हो बाबा रिटायर एकदाचा' असे ज्याला सुचवायचे आहे त्याला देतात ना*? मग आता शोधा रिटायर झालेले वा ज्यांनी रिटायर व्हावे असे वाटते असे आयडी. *उदा. दादासाहेब फाळके पारितोषिक. चेहर्‍यावरच्या नि गळ्यावरच्या सुरकुत्यांची जाण ठेवता आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या हिरविणींबरोबर काम करण्याचा अट्टाहास करणारे हिरो. त्या शाहरूखला देऊन टाका हो एकदाचं (चेपुवर कॅम्पेन चालवावं का?). त्या हिरविणीही सुटतील नि आपणही.

रघु सावंत 03/06/2012 - 00:27
मिपा ही तर रत्नांची खाण आहे ... माझ्या मते रामदास सर(काका), आणी इतरही रत्ने आहेतच. शिवाय लेखना पेक्षा त्यावर सुंदर ,चपखळ,आणी मोजकी प्रतिक्रीया देणारे जास्त हक्कदार आहेत,कारण त्यामुळेच लेखकाचे लेखन उत्तरोत्तर बहरत जाते.हे म्हणजे असे कि ,"बघणारा असेल तर नटण्यात अर्थ आहे." ........ ............ नाहीतर जागू तै ना द्या कारण लेख वाचुन पोट भरत नाही तर रेसिपी वाचून आणि बघून पोट भरते.

निनाद मुक्काम … 03/06/2012 - 10:41
अनिवासी भारतीयांना काही विशेष सवलत किंवा आरक्षण आहे का ? नुसती चौकशी केली हे माझे मत समजू नये. पण प्राजू किंवा पिंडा किंवा गुर्जी ह्यांना हा बहुमान मिळावा. असे वाटते.

अप्पा जोगळेकर 03/06/2012 - 16:16
जयंत कुलकर्णी यांचे लिखाण सुंदर असते. बाकी मिपारत्न वगैरे पदव्या कोणाला चिकटवू नयेत असे वैयक्तिक मत आहे.

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

श्रीरंग_जोशी 04/06/2012 - 12:12
मिपारत्न घोषित करून काही ज्येष्ठ सदस्यांना (सन्माननिय) निवृत्तीच सल्ला दिला जातोय की काय अशी शंका येत आहे?

In reply to by श्रीरंग_जोशी

घाशीराम कोतवाल १.२ 04/06/2012 - 13:06
आमचे धुम्रवलयांकित धमाल महाराज देशमुख बारामतीकर ह्या उपाधीला शोभतात पण सध्या त्यांची आंतर्जालिय समाधीवस्था आहे

jaypal 04/06/2012 - 16:22
कुणी काहीही म्हटल तरी आपल मत एकदम फिक्स नाडी वाले बाबा की जय हो nadi