कळकळीचे आवाहन
वाचने
11319
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
या किल्ल्याबद्दल थोडंफार ऐकलं होतं. पण तुम्ही लिहिलेलं धक्कादायक आहे. अर्थात आम्हाला अशाच प्रकारचा अनुभव फतेहपूर सीक्री इथे आला होता. तेव्हा खरं म्हणजे नवल वाटू नये. पण महाराष्ट्रात हे प्रकार चालतात हे माहिती नव्हतं. पुढच्या अलिबाग भेटीत पद्मदुर्ग पाहणं नक्कीच जमवणार!
मुरूड जंजिर्याहून अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता महाराजांचा पद्मदुर्ग, पण जायला जमलं याची खुप खंत वाटतेय. :(
"लुटून" हाच शब्द खरा आहे कारण किनार्यावरील दुकाने, किल्ल्यातील वाटाडे हे पर्यटकांकडून अवास्तव किंमती वसूल करतात. वाटाड्यांनी तर बोट मालकांच्या साथीने एकाधिकार निर्माण केला आहे. साधा किल्ला दाखवण्याचे आणि माहिती सांगण्याचे वाटाड्यांने आमच्याकडून रु. १२०० मागितले.तिथल्या या लुटींबद्दल तर काही बोलायलाच नको.
हे वाटाडे (हबशी) सिद्धीचे थेट वंशज आहेत आणि जो इतिहास सांगतात तो केवळ सिद्धीच्या पराक्रमाचा सांगतात आणि त्यांच्या सोयीचाच सांगतात.याच्याशी लाख वेळा सहमत! बोटीतून किल्ल्याकडे जाताना बोटीचा नावाडी सिद्दीच्या पराक्रमाचे गोडवे गातानाच "शिवाजी महाराजको लास्ट तक ये किल्ला जितने को जमा नही" यांसारख्या अनेक वाक्यांवर अगदी जोर देऊन बोलत होता.
सीमाताई भांबुरकर ह्या जंजिर्याला भेट द्यायला गेल्या होत्या. त्यांनी तिथल्या वाटाड्याकडे सहज
चौकशी केली की पद्मदूर्गावर जाता येते का तर वाटाड्या म्हणाला की तिथे जायला नौदलाची अनुमति लागते पण प्रत्यक्षात असे काही नाही.
पद्मदूर्गावर लोक जाऊ नयेत म्हणून हे जंजिरेकरांचे प्रयत्न.
In reply to कोणीएक by सृष्टीलावण्या
उत्तर मलाही मिळाले होते.... पण आता मात्र नक्की जाणार...
सांगायचे ना - शिवाजी राजे अजून १० वर्षे जिवन्त असते तर तुझे पूर्वज आफ्रिकेला पळाले असतात. आमची संख्या जास्त असल्याने आणि सर्वांची देहबोली दणकट असल्याने त्यांनी ट्याव ट्याव केली नाही. नाहीतर तिथेच त्यांना गप्प केले असतेबोटीचा नावाडी सिद्दीच्या पराक्रमाचे गोडवे गातानाच "शिवाजी महाराजको लास्ट तक ये किल्ला जितने को जमा नही" यांसारख्या अनेक वाक्यांवर अगदी जोर देऊन बोलत होता.
पण जायला जमलं "नाही" याची खुप खंत वाटतेय.गणसंख्या कमी असेल तर पद्मदूर्गाला जाणे आर्थिक दृष्ट्या महाग पडते आणि मुरुडकर कोळी आयत्यावेळी टांग पण देतात (कोकणी बाणा). आम्हाला शेवटच्या क्षणी बोट उपलब्ध नाही सांगितले ते पण आम्ही १० दिवस आधी कळवून सुद्धा.
देव करो आणि सर्वच गडांवरती लोकांची वर्दळ बंद होवो.
लेखकास :- कृपया राग मानू नये. वरील वाक्य तुम्ही किंव इतर कुठल्याही दुर्गप्रेमीला दुखावण्यासाठी लिहिलेले नाही. मात्र जे काही २/३ किल्ले पायाखालून गेले तिथे आलेल्या अनुभवातून, नालायक आणि भिकारचोट लोकांनी तिथे मांडलेल्या उच्छादातून, कचर्यातून जे काही मनात उमटले तो हा प्रतिसाद आहे.
In reply to उत्तम ! by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
किंवा असे वाटते की काहीतरी भुकंप वा प्रलय यावा आणि अशा गडकिल्ल्यांवरच्या इतिहासाच्या सर्व खाणाखुणा नष्ट व्हाव्यात. किमान त्यामुळे तरी आयुष्यभर केवळ परकियांचीच चाकरी करुन मिळणार्या पैशाच्या उबेने गडकिल्ल्यांवर विकांताची भटकंती करुन आम्ही किती राष्ट्रप्रेमी याचा कुल्लेटिपरीताडननाद करत फिरणार्या बाजारबुणग्यांपासून त्या पवित्र स्थळांचे रक्षण होईल.
१०१% सहमत पण केवळ जंजिर्याला भेट देऊन एकांगी इतिहास ऐकून सिद्धी हा अतुल पराक्रमी होता आणि मराठेशाही त्याला दबकून होती असा गैरसमज करून घेणे पण योग्य नव्हे.
मुंबई, ठाणे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये जागोजागी किल्ले बांधून आणि जमीनीवर विजय मिळवून राजांनी सिद्धीला गुदमरवूनच टाकले होते.
३८ तोफा????? सर्व अजूनही शिल्लक आहेत? नाही म्हणजे फोटोमध्ये दिसत नाहीत म्हणून विचारलं. शिवाय तुम्ही फोटो का नै टाकले हो? मस्त मजा आली असती अजून.
३८ तोफा????सदर माहिती http://trekshitiz.com/marathi/MI_DefaultUser.asp?SearchValue=P&FortName=Padmadurg%20%28%20Kasa%20Killa%29&SearchChoice=Alpha वरून घेतलेली आहे.
तुम्ही फोटो का नै टाकले हो? मस्त मजा आली असती अजून.फोटोंची मजा http://www.misalpav.com/node/18354 इथे घ्यावी.
धन्यवाद :)
राजकारणी मुसलमानांच्या मतांसाठी देश विकताहेत याच्याबद्दल दुमत नसावे...पण हे हळुच बोला हो नैतर लोकं रागावतात!!
In reply to राजकारणी मुसलमानांच्या by शिल्पा ब
राजकारणी मुसलमानांच्या मतांसाठी देश विकताहेत याच्याबद्दल दुमत नसावे..ती मते तशी एकगठ्ठा मिळतात सुद्धा हे उ.प्र. च्या निकालांवरून सिद्ध झालेच आहे.
ह्या लेखातून मांडलेली व्यथा सामन्यातून किंवा इतर मराठी वृत्तपत्रातून मांडली पाहिजे.
जंजिर्याचे महत्व माझ्यामते ह्या किल्ल्याच्या प्रकाशझोतात येण्याने वाढेल किंबहुना दोन किल्यांमधील अंतर व त्यांच्या मधील झालेल्या जल युद्धाच्या हकिगती स्वकीयच नाही तर परकीय पर्यटकांना सुद्धा भूलावातील. केसरी किंवा इतर मराठी पर्यटक कंपन्यांनी ह्याची दखल घ्यावी.
हि कल्पना आवडली.
In reply to ह्या लेखातून मांडलेली व्यथा by निनाद मुक्काम …
केसरी किंवा इतर मराठी पर्यटक कंपन्यांनी ह्याची दखल घ्यावी. हि कल्पना आवडली.व्यावसायिकतेतून पैसा येतो आणि राजकारण्यांना / सरकारला तोच कळतो / समजतो.
इथला गाइड आम्हाला माहिती देत असताना सतत शिवाजीने .. सीवा .. असे एकेरी उल्लेख ते सुद्धा अनादराने करत होता ..आम्ही त्याला समजावले पण ऐकेना ...मग आमच्यातल्या एका मावळ्याने गचांडी पकडून 'समजावले' तेव्हा त्याने किल्ल्यावरून परत नेण्यास नकार दिला ...दुसरी बोट करून किनार्या वर गेलो तर 'हबशी' तयारच होते ..
थोडी 'बा'चा -'बा'ची झाली ...आणि आम्ही सुखरूप निघालो ते केवळ न घाबरता नडलो म्हणून ..पण अक्षरशः मिनी पाकीस्तानात असल्यासारखे वाटले क्षणभर
In reply to आमचा अनुभव by कपिलमुनी
हे असं सगळं करण्याची मुजोरी फक्त या 'महान' देशातच शक्य होत असेल नाही?
In reply to आमचा अनुभव by कपिलमुनी
आम्ही सुखरूप निघालो ते केवळ न घाबरता नडलो म्हणून.भले शाब्बास! ठकासी व्हावे ठक, खटासी व्हावे खट, उद्धटासी उद्धट, लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद - श्री रामदास स्वामी.
ह्या किल्ल्याकडे जाताना समुद्रात पाण्याचे निळा, मातकट आणि हिरवा असे तीन प्रवाह अनुभवायला मिळतात.
बरं आहे तिथे सहज जाता येत नाही. नाहितर त्याही किल्यावर जंजिर्यासारख्या प्लास्टिक पिशव्या, सुंदर शिल्पांवर कुंकु/भंडार्याचे डाग दिसले असते!
किल्यांचे जतन जरूर व्हावे मात्र पर्यटनासाठी काहि मोजकेच किल्ले उघडे ठेवावे. अन्य गड-किल्ल्यांवर केवळ प्लास्टिक पिशव्या, सिगारेटी-गुटखे यांची पाकिटे (याशिवाय जमत नसेल तर सिगारेटी सुट्या बाळगा. पाकिट संपल्यावर ते किल्यावर टाकलेले आढळते) , मद्याच्या काचेच्या बाटल्या न बाळगणारे गिर्यारोहक व इतिहास संशोधक यांनाच अनुमती द्यावी. (ते किल्ले पवित्र आहेत की नाहि हा वेगळा मुद्द आहे, या गोष्टींनी किल्ल्याचे सौदर्य कमी होते)
In reply to बरं आहे तिथे सहज जाता येत by ऋषिकेश
जंजिरेकरांची मस्ती उतरवणार असाल, त्यांचे एकांगी इतिहास कथन बंद पाडणार असाल आणि तेथील पर्यटकांची लूट थांबवणार असाल तर आणि तरच हा पर्यावरण प्रेमाचा पुळका खरा मानता येईल.
नाहीतर दुर्बलांचे पर्यावरण प्रेम आणि भारताची शान्तिप्रियता सारखीच म्हणावी लागेल.
In reply to हुं... by सृष्टीलावण्या
मला पर्यावरणचहा तथाकथित पुळका अजिबात नाही. प्लॅस्टीक पर्यावरण वाचण्यासाठी म्हणून नव्हे तर स्वच्छतेसाठी नको असे माझे मत आहे.
जंजिरेकरांची मस्ती उतरवणार असाल, त्यांचे एकांगी इतिहास कथन बंद पाडणार असाल आणि तेथील पर्यटकांची लूट थांबवणारकेवळ तुम्हाला आमची भुमिका खरी वाटावी म्हणून असली कामं करायला काय दुसरी कामं नाहित काय? ;)
In reply to मला पर्यावरणचहा तथाकथित पुळका by ऋषिकेश
ज्या त्वरेने उत्तर आले आहे ते पाहून असेच वाटते ;)काय दुसरी कामं नाहित काय?
In reply to ज्या by सृष्टीलावण्या
ज्या त्वरेने उत्तर आले आहे ते पाहून असेच वाटतेवाटते त्याला कोण काय करणार.. स्वगतः ज्याची त्याची समज जाण इत्यादी इत्यादी! :P
In reply to वाटते by ऋषिकेश
वाटते त्याला कोण काय करणार..हो बुवा, आम्हाला स्वतःलाच वाटते... आम्ही काही त्याचे (वाटण्याचे) आऊटसोर्सिंग केलेले नाही :) :D :P
हम्म..