मी डेटिंग केले नाही..!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही.
मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.
भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना,
कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..
बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी.
सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो.
मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही.
मी डेटिंग केले नाही
अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे.
कॉलेजात अभ्यास केला, कंपनीत करतो कामे.
पण बोटातुन कुठलीही एंगेजमेंटची रिंग नाही.
कुणी प्रपोज केले नाही ,कधी फ़्लर्टिंग जमले नाही.
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.
-- अभिजीत दाते
मूळ गीत - मी मोर्चा नेला नाही
कवी - संदीप खरे
(संदीप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांनी आणि एसींनी क्षमा करावी)
वाचने
9501
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
वा वा मस्त...एकदम भारी कविता :)
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो. मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही. मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.खि:खि:खि:! सहीये!
मस्त चालीत ठेक्यात बसते आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
वा दातेशेठ,
एकदम झकास विडंबन.. विषय आणि गाण्याची चपखल निवड.
(चालीत म्हणताना काही ठिकाणी गडबड वाटते आहे.. जरा तपासून बघा)
केशवसुमार
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
मस्तच विडंबन!
(केसुंशी सहमत. विडंबन काही ठिकाणी हमरस्त्याऐवजी जरा बाजूच्या गल्लीतून गेले आहे! ;)
चतुरंग
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.
मस्त!
विडंबन आवडले.
स्वाती
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.
बॉस ! मान गये तुमको !
केसु भौ , आम्हाला विडंबन पर्फेक्ट वाटातेय ! तुम्ही मूळ गाणे ऐकलेत का ? ऐकलेत तर विडंबनातल्या शब्दांच्या वजनाची व्हेरिएशन्स तुम्हाला समजतील असे वाटते.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
सही रे !!!
मस्तच !!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
:)
खूपच सुंदर!
भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना,
कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.
हे अफलातून आहे...
आपण हे गाणे पाठ करणार...
... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
छान झालेय रे विडंबन!
याच गाण्यावरचा आमचा फसलेला प्रयत्न येथे पहावा -> http://www.misalpav.com/node/1121
केशवसुमाराशी बिलकुल सहमत.
विडंबन उत्तम पण चालीत बसवण्यासाठी सुधारणा शक्य.
प्रवास सुरु ठेवा, नक्किच ईष्ट स्थळी पोहोचणार.
चांगले विडंबन मात्र चालीत काहि ठिकाणी फसतंय
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो. मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही. मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.हे विषेश आवडले -('मिसळ'लेला) ऋषिकेश
झकास विडंबन...
मस्तच जमलंय ...
बिपिन.
छानच विडंबन झाले आहे.
दाते साहेब,
अप्फाट केले आहे विडंबन " मी मोर्चा नेला नाही" चे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
>> मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.>>
खूपच मस्त जमलय !! तुला विडंबनाची नस मस्त सापडलीय :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
मस्त! आवडले विडंबन!
वाचायला खूप आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सहिच
केसुच्या निवृत्तीनंतर "आता पुढे काय?" ह्या प्रश्नाने आमची झोप उडाली होती.
आज ती काळजी दूर झाली.
मस्त !
- सर्किट
In reply to जबरा !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मस्तच!
> केसुच्या निवृत्तीनंतर "आता पुढे काय?" ह्या प्रश्नाने आमची झोप उडाली होती.
> आज ती काळजी दूर झाली.
आम्हाला आधीही काळजी नव्हती
जबराट विडंबन.
शाहिद,शक्ती,लफडा केले नाही - सगळेच खल्लास!!!!! मस्त मजा आली.
(हसरा)बेसनलाडू
काही ओळींमध्ये पर्यायी शब्दयोजना केली तर वजनात मार खाणे कमी होऊ शकेल नक्कीच. नक्की कुठे हे सांगण्यासाठी बारकाईने पुन्हा वाचावे,गुणगुणावे लागेल.
(सूचक)बेसनलाडू
मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही. - च्या ऐवजी
मी 'मनात' सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही.
हे बघा बरं कसे वाटते चालित.
केशवसुमाराची उणिव भासत नाहि राव तुमच्या विडंबनामुळे,
एकदम झ-का-स.....
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो....जबरी..फुल्ल हसलो..
अवांतर माहीती : अरे पण तु हंगल्,अशोककुमार आणि अनुपकुमार या त्रयींचा "शौकिन" हा चित्रपट पाहीला आहेस का?
तीन वृध्दांचे म्हातारचळ विनोदी पध्दतीने दाखविले आहे त्यात..तो पाहीलास तर "हंगल" ही तुला तुझ्यापेक्षा बरा वाटेल...!
In reply to हा हा हा हा ही ही ही ही by बेचवसुमार
बेचवसुमार,
'शौकीन' त्रयीमध्ये अनुपकुमार नाही तर उत्पल दत्त होते. अनुपकुमार 'चलती का नाम गाडी'च्या त्रयीमध्ये होते.
(सुधारक)बेसनलाडू
होय.शौकीन मध्ये उत्पल दत्त होते.
वा वा