जत्रा
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जत्रा
निर्जीव देवतांच्या करतात येथ जत्रा
जातात जीव तरीही भरतात येथ जत्रा
ओझे परंपरांचे ठरतेय जीवघेणे
वेठीस बापुड्यांना धरतात येथ जत्रा
तो देव का दयाळू होई असा कठोर?
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा
झाले ठिकाण जत्रा, चिंता आणि भयाचे
चिरडून सर्व श्रद्धा सरतात येथ जत्रा
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.
-अविनाश ओगले
वाचने
3766
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सुंदर गझल...
भावभक्तीने/मौजमजेने एकत्र येणे, हा मानव्य भाव
In reply to भावभक्तीने/मौजमजेने एकत्र येणे, हा मानव्य भाव by धनंजय
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
हेच म्हणतो..
वा वा ओगलेशेठ!
का हो इतका
सुरेख
जत्रेबद्दल!
गझल
In reply to गझल by ऋषिकेश
सहमत आहे.