महाभारतातील कथा-१
लेखनप्रकार
महाभारतातील कथा -१.
( महाभारतातील काही कथा द्यावयाचा विचार आहे.गोष्ट सुरस व मनोरंजक असेलच पण त्यातून आजही काही विचार करावयास लागावे असे सापडेल.)
मांडव्य ऋषी
मांडव्य ऋषी मोठे तपस्वी होते. रानातील आपल्या झोपडीबाहेरील झाडाखाली ते एकदा मौनव्रत धारण करून तप करीत बसले होते. शेजारच्या राजधानीत चोरी करून काही चोर पळून रानात आले. मागे राजाचे शिपाई पाठलाग करत होते. चोर झोपडीत लपून बसले. शिपाई मागून आले व मांडव्यांना विचारू लागले की "चोरांना पाहिले का ?" मौनव्रत असल्याने माडव्य काही बोलले नाहीत. शिपायांना संशय आला. त्यांनी झोपडीत तपास केला व चोरांना पकडले. धनही मिळाले. मांडव्य काही बोलला नाही म्हणजे तोही चोरांचा साथीदार असला पाहिजे असे समजून त्यालाही पकडून राजधानीत नेले. राजाला कळवल्यावर त्याने चौकशी न करता सगळ्यांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. सुळावर चढवल्यावरही काही न बोलता मांडव्य वेदपठन करत तपच करत होते. काही दिवसांनी रक्षकांच्या ध्यानात आले हा एकच वेदना होत असतांनाही ओरडत नाही व इतके दिवस अन्नपाण्याशिवाय जिवंत आहे. त्यांनी राजाला त्याप्रमाणे कळविले व राजा घाईघाईने तेथे आला व आपली चूक लक्षात आल्यावर हात जोडून मांडव्यांना म्हाणाला "अज्ञानाने माझ्या हातून चूक झाली, मला क्षमा करा." माडव्यांनी "तुझी काही चूक नाही" असे सांगितले. मग त्यांना सुळावरून खाली उतरवले व सूळ काढण्याचा प्रयत्न केला. पण सुळाचे टोक पोटात अडकून बसले होते ते निघेना. शेवटी शूळ तोडून काढला व टोक तसेच पोटात राहिले. त्याच्या वेदना सहन करत मांडव्य तपश्चर्या करत राहिले व त्यांनी तपाने प्राप्त होणारे सर्व दुर्लभ लोक प्राप्त करून घेतले. मग एकदा यमध्रर्माच्या सभेत जाऊन त्यांनी धर्मराजाला विचारले " प्रभो, माझ्या हातून जाणूनबुजून तर काही अपराध घडला नाही, तर मग कोणत्या नकळत घडलेल्या अपराधामुळे मला सुळावर चढण्याची शिक्षा मिळाली ? " यमधर्म म्हणाला " लहानपणी तू एका पतंगाच्या पृच्छाला काडी टोचली होतीस.त्याचे हे फळ. लहानसे दान केले तरी त्याचे नोठे फल मिळते तसे स्वल्प अधर्माचे फल मोठे दु:ख देणारे मिळते. "
मांडव्य म्हणाले " धर्मा ! जन्मापासून बारा वर्षेपर्यंत जीवाच्या हातून जे काय होते त्याबद्दल तो जबाबदार नाही. या वयात त्याच्या हातून पातक होतच नाही. धर्मशास्त्रज्ञ या वयातील कृत्ये हिशेबातच घेत नाहीत. असो. माझा अपराध लहान असतांना तू मला ही असह्य पीडा होईल असा दंड केलास म्हणून मनुष्यजातीच्या शूद्र वर्णात तुला जन्म प्राप्त होईल. मी आजपासून असा धर्मफलाचा उदयकारी नियम बांधून देतो की यापुढे चौदा वर्षेपर्यंत घडलेल्या दुष्कृत्याबद्दल जीवास दंड असू नये, कारण ते त्याचे दुष्कृत्य अज्ञानजन्य असल्याने पापकारक होत नाही,."
(१) मांडव्यांनी वयोमर्यादा १२ पासून १४ पर्यंत वाढवली. आज जगभर असेच बालागुन्हेगारांबद्दल कायदे आहेत. पण आज (कलीयुगांत) परिस्थिती बदलेली दिसते. पुण्यात बालगुन्हेगारांनी जाणीवपूर्वक एका मुलाचा खून केला व नंतर खंडणीही वसूल केली ! बातम्या वाचतांना असे अनेक गुन्हे निदर्शनास येतात. हे गुन्हे अज्ञानजनक नसतात. मग आता उलटे पाऊल टाकणे गरजेचे आहे का ?
(२) हस्तिनापुरातील दासीला व्यासांपासून झालेला मुलगा म्हणजे यमधर्माचा अवतार, विदूर. दासीपुत्र म्हणून हा सूत. याला राज्याचा अधिकार नाही. हा अर्थ व धर्म या दोन्ही शास्त्रांमध्ये निपुण होता.पण हा राजा होऊ शकला नही. अंध व कपटी धृतराष्ट्राने राज्याधिकार भोगला व विदूर शेवटपर्यंत मंत्रीच राहिला.लहानपणच्या पांडवांना कौरवांपासून वाचविण्यात याचा मोठा भाग होता. लाक्षागृहाची कल्पना यानेच युधिष्ठिराला दिली व भुयार खणणारा माणुसही पुरवला. "दुर्योधनाचा त्याग कर" असे त्याने वारंवार धृतराष्ट्राला बजावले. तेरा वर्षे कुंती याच्याच घरात राहिली. युद्धानंतर धृतराष्ठ्र-गांधारी व कुंती वनात निघाली तेव्हा हा त्यांच्याबरोबर वनात गेला तेथेच त्याने आपला प्राण सोडला. त्या वेळी युधिष्ठिर तेथे होता. विदुराने आपले डोळे त्याच्या डोळ्यात मिळवून योगबलाने आपले प्राण युधिष्ठिराच्या प्राणात व आपली इंद्रिये युधिष्ठिराच्या इंद्रियात मिळवून टाकली.
(३) डॉ. इरावती कर्वे यांच्या मते विदुर हा युधिष्ठिराचा बाप. पण हे पटत नाही. व्यास हे फार रोखठोक लिहणारे लेखक आहेत. त्यांना तसे सुचवावयाचे असते तर त्यांनी तसे सरळ लिहले असते. पण दुसर्या एका विचारसरणीने हे बरोबरही वाटते. विदुर हा यमधर्माचा अवतार व युधिष्ठिर हा कुंतीला यमधर्मापासून झालेला
मुलगा. तेव्हा हे नाते जुळतेही.
शरद
वाचने
15094
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
छान कथा सांगितलीत
असेच म्हन्तो
आवडली..
In reply to आवडली.. by विकास
विदुर असो वा युधिष्ठिर,
In reply to आवडली.. by विकास
शरद'जी.. हा नवा उपक्रम आवडला!
In reply to शरद'जी.. हा नवा उपक्रम आवडला! by मृगनयनी
हे तत्कालीन "राजनियम" काय
In reply to हे तत्कालीन "राजनियम" काय by विकास
हे तत्कालीन "राजनियम" म्हणजे
In reply to हे तत्कालीन "राजनियम" म्हणजे by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to हे तत्कालीन "राजनियम" काय by विकास
खॉडरबर
In reply to शरद'जी.. हा नवा उपक्रम आवडला! by मृगनयनी
त्यामुळे ते ब्राह्मण आणि
कथा माहिती होतीच. पण आवडली.
कथा आवडली.
In reply to कथा आवडली. by पैसा
पैसातै
आयला... हे अवघड आहे !!
एक शंका !!
एवढंच समजलं, कुठंही काड्या
कथा आवडली
रोज गुड नाईट लावून झोपते,
In reply to रोज गुड नाईट लावून झोपते, by किचेन
वय काय तुमचे?
In reply to वय काय तुमचे? by नाना चेंगट
कोणते ?
In reply to कोणते ? by परिकथेतील राजकुमार
बौध्दीक
In reply to रोज गुड नाईट लावून झोपते, by किचेन
तुम्ही प्रत्येक जन्मात
In reply to रोज गुड नाईट लावून झोपते, by किचेन
एका बंद खोलीत मध्यभागी
हं! एकुण अस आहे तर.
In reply to हं! एकुण अस आहे तर. by स्पंदना
विदूर निती
In reply to विदूर निती by विकास
चर्चा??
In reply to चर्चा?? by स्पंदना
है ना.. बोलो बोलो..
In reply to है ना.. बोलो बोलो.. by मस्त कलंदर
अग ! अग ??
In reply to अग ! अग ?? by स्पंदना
म्हणजे?
In reply to म्हणजे? by पैसा
तुझ नावच सांगतय ..
In reply to म्हणजे? by पैसा
अगं दोघी बायांनो.. तिथे खाली
In reply to अगं दोघी बायांनो.. तिथे खाली by मस्त कलंदर
महाभारत
In reply to महाभारत by विकास
बायांनो
In reply to बायांनो by चित्रा
हाहाहाहाहा!
In reply to बायांनो by चित्रा
घ्या!
संसदेत